You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: साथीच्या काळात सेक्स करणं किती सुरक्षित?
कोरोनाच्या संकटातून वाट काढताना 'न्यू नॉर्मल' हा शब्द आता सर्वांच्याच परिचयाचा झाला आहे. कामावर जाताना किंवा अगदी शॉपिंग करायला जाताना कोरोना विषाणूची लागण होणार नाही, याची सर्व खबरदारी घेणं, याला 'न्यू नॉर्मल' म्हणण्यात आलं आहे.
मात्र, हे न्यू नॉर्मल केवळ एवढ्याच गोष्टींसाठी मर्यादित नाही तर आता सेक्ससुद्धा न्यू नॉर्मल पद्धतीने करण्याची गरज आहे.
द टेरेंस हिगिंस ट्रस्ट (The Terrence Higgins Trust) या संस्थेने कोरोना काळात सुरक्षित सेक्ससंबंधीच्या काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.
किस करणं टाळावं, चेहऱ्याला मास्क बांधावे आणि संभोगावेळी चेहेरा समोरासमोर येणार नाही, अशाच पोझिशन्स असाव्या, अशा काही सूचना या संस्थेने दिल्या आहेत. THT ही युकेतली HIV आणि सेक्च्युअल हेल्थ याविषयांवर काम करणारी नामांकित स्वयंसेवी संस्था आहे.
ऐकायला अवघड वाटत असलं तरी "कामेच्छा, शारीरिक आणि भावनिक जवळीकीची नैसर्गिक इच्छा पूर्ण करणं आणि हे करताना कोव्हिड-19 चा फैलाव होणार नाही याची खबरदारी घेणं आवश्यक आहे," असं या संस्थेचं म्हणणं आहे.
सुरक्षित सेक्स
कोरोना साथीच्या काळात तुम्ही स्वतःच स्वतःचे सर्वोत्तम सेक्स पार्टनर आहात, असं या संस्थेचं म्हणणं आहे. शिवाय, एकाच घरात राहणारेच सर्वांत सुरक्षित सेक्स पार्टनर आहेत.
या संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सेक्स टॉय किंवा ऑनलाईन सेक्सच्या माध्यमातून मास्टरबेशन (हस्तमैथुन) हा सध्या सेक्ससाठीचा सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र, याचा अर्थ जोडीदाराबरोबर सेक्स करूच नये, असा होत नाही. तर तुमच्या घरातच तुम
च्या सोबत एकत्र राहणाऱ्या जोडीदारासोबतच संभोग करावा, कारण ते अधिक सुरक्षित आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
जगभरात अजूनही सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र, इतक्या महिन्यांच्या लॉकडाऊननंतर लोकांनी अनिश्चित काळासाठी सेक्स करणं थांबवावं, अशी अपेक्षा चुकीची असल्याचं संस्थेचं म्हणणं आहे.
घराबाहेरच्या जोडीदाराबरोबर सेक्स करणार असाल तर खूप जास्त लोकांबरोबर करू नका. त्यांची संख्या अगदीच मोजकी असायला हवी, असा सल्ला देण्यात आला आहे.
तसंच स्वतःला किंवा आपल्या जोडीदाराला कोव्हिड-19 आजाराची काही लक्षणं आहेत का, याकडे लक्ष ठेवा आणि लक्षणं आढळल्यास स्वतःला विलग करा, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
शिवाय, नव्या जोडीदाराबरोबर वेळ घालवणार असाल तर सेक्सआधी त्याला किंवा त्याच्या कुटुंबातल्या इतर कुणाला कोव्हिडची लक्षणं आहेत का, त्यांच्या घरी कुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळलं आहे का, याची विचारपूस जरूर करा.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
सेक्समधून विषाणूची लागण होते का?
कोरोना विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तीचा सलाईव्हा (लाळ), म्युकस (श्लेष्मा) आणि श्वासातून या विषाणूची लागण होऊ शकते. तसंच संक्रमित पृष्ठभागावरूनही संसर्ग होऊ शकतो.
सेक्शुअल हेल्थविषयक तज्ज्ञ डॉ. अॅलेक्स जॉर्ज यांनी रेडियो-1 न्यूजबीटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, "तुम्ही एकमेकांच्या गुप्तांगांना स्पर्श करणार असाल तर तुम्ही एकमेकांचं चुंबन घेण्याचीही शक्यता नाकारता येत नाही आणि लाळेतून कोरोनाच्या विषाणूची लागण होते."
ते म्हणतात, "तुमच्या तोंडातून तुमच्या हातात, गुप्तांगांत, दुसऱ्या व्यक्तीच्या नाकात किंवा तोंडात कोरोनाचे विषाणू स्पर्श करण्याची शक्यता असल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता बळावते."
आणि म्हणूनच THT संस्थेने किस न करणे, संभोगावेळीसुद्धा चेहऱ्याला मास्क बांधणे आणि चेहरा समोरासमोर येईल अशा सेक्च्युअल पोझिशन्स न घेणे, असा सल्ला दिला आहे.
वीर्य (semen) आणि विष्ठेतही कोरोनाचे विषाणू असतात. त्यामुळे सेक्सवेळी काँडम आणि ओरल सेक्स करताना कॉंडमचा वापर करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे .
आपण कुठलंही काम करण्यापूर्वी आणि केल्यानतंर 20 सेकंदांपर्यंत हात स्वच्छ धुतो. तसंच संभोगाच्या आधी आणि नंतरही हात स्वच्छ धुवावे.
कोरोना काळात सेक्स पुन्हा सुरू करण्यापूर्वी आपल्याला सेक्सश्युली ट्रान्समिटेड इन्फेक्शन झालं आहे का, याची चाचणी करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
"लॉकडाऊनच्या काळात शरीरसंबंधांचं प्रमाण कमी झालं आहे आणि म्हणूनच आपल्याला संभोगातून होणारं इन्फेक्शन किंवा HIVची लागण झालेली नाही ना, हे जाणून घेण्याची ही उत्तम संधी आहे", असं THT संस्थेचं म्हणणं आहे.
हेही नक्की वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)