You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कंकणाकृती सूर्यग्रहण: जगभरातून टिपलेले ग्रहणाचे फोटो
पश्चिम आफ्रिका, अरेबियन द्वीपकल्प, दक्षिण आशिया, दक्षिण चीन आणि तैवानमधील आकाश निरीक्षकांना सूर्यग्रहणाची पर्वणी पहायला मिळाली. फोटोग्राफर्सनीही 'Ring of Fire' किंवा अग्निकंकणाचे फोटो कॅमेऱ्यात कैद केले.
अमावस्येला सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्या मध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतातत, तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो. म्हणजे सूर्याला ग्रहण लागतं.
यावेळचे सूर्यग्रहण हे कंकणाकृती होतं. म्हणजे जेव्हा सूर्यग्रहण होतं, तेव्हा चंद्र सूर्यबिंबाच्या मधोमध येतो; पण सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही, तर एखाद कंकणासारखी म्हणजे बांगडीसारखी सूर्याची कडा दिसून येते. त्यालाच 'कंकणाकृती सूर्यग्रहण' म्हणतात.
या सूर्यग्रहणाचं वैशिष्ट्य म्हणजे 21 जून हा उत्तर गोलार्धात सर्वांत मोठा दिवस असतो. त्याच दिवशी हे ग्रहण पहायला मिळालं.
सूर्यग्रहण हे वर्षातून एकदा किंवा दोनदा पृथ्वीच्या ठराविक भागातून पहायला मिळतं. हा भाग सेंटरलाइन म्हणून ओळखला जातो. या सेंटरलाइनपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या लोकांना ग्रहण पहायला मिळत नाही, मात्र दिवसा कमी झालेला सूर्यप्रकाश अनुभवायला मिळतो.
खगोलशास्त्रज्ञांच्या मते, सूर्यग्रहण पाहणं म्हणजे 500 W च्या ब्लबऐवजी 30 W च्या बल्बचा प्रकाश अनुभवणं.
21 जूनला झालेल्या या कंकणाकृती सूर्यग्रहणाचे काही सर्वोत्तम फोटो-
ग्वांगझाऊ, चीन
मनिला, फिलिपिन्स
चैआई, तैवान
मुंबई, भारत
कराची, पाकिस्तान
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)