Hagibis: हगीबिस चक्रीवादळाने जपानला झोडपलं, पूर-भूस्खलन

जपानला हगीबिस चक्रीवादळाने जपानला झोडपलं असून, अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना समोर येत आहेत. गेल्या 60 वर्षांतलं हे सगळ्यात विनाशकारी वादळ आहे. तुफान पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा तडाखा जपानच्या अनेक भागांना बसला आहे.

स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता चक्रीवादळाने जपानला लक्ष्य केलं. ताशी 225 किलोमीटर वेगाने हे वादळ आता पूर्व दिशेने सरकतं आहे.

वादळाच्या तडाख्यात एक व्यक्ती मृत्यूमुखी पडला आहे तर 60हून अधिक जण जखमी झाले आहेत.

वादळाची शक्यता लक्षात घेऊन, 740 लाख लोकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावं, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. 50,000 तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहत आहेत.

जपानमधील रेल्वेसेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. हजारहून अधिक फ्लाईट्स खंडित करण्यात आल्या आहेत. वारा आणि पाऊस यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.

जपानमध्ये सध्या रग्बी वर्ल्ड कप सुरू आहे. चक्रीवादळामुळे इंग्लंड-फ्रान्स आणि न्यूझीलंड-इटली हे सामने रद्द करण्यात आले आहेत.

चक्रीवादळाचा जोर जास्त असल्याने प्रचंड प्रमाणावर पावसाची शक्यता पाऊस जपानच्या विविध भागांमध्ये पडत आहे. पूर आणि भूस्खलनाचे प्रकार वारंवार घडत आहेत.

तागालोग या फिलीपिनी भाषेत हगीबिसचा अर्थ 'वेगवान' असा होतो.

वादळ धडकलेलं नसताना सुसाट्याच्या वाऱ्याने चिबा भागात वाहनांचं आणि घराचं नुकसान झालं आहे. यात एका जणाचा मृत्यू झाला आहे.

1958 मध्ये आलेल्या कानोगावा चक्रीवादळानंतरचं हे सर्वांत शक्तिशाली वादळ ठरू शकतो. कानोगावाच्या प्रलयात तेव्हा 1,200 लोकांचा मृत्यू झाला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)