हाँगकाँग : 68 मजली गगनचुंबी इमारतीवर चढून फ्रेंच 'स्पायडरमॅन'कडून शांततेचं आवाहन

अॅलन रॉबर्ट

गेल्या काही महिन्यांपासून प्रत्यार्पण विधेयकावरून हाँगकाँग धुमसतंय. अशांत हाँगकाँगमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून फ्रेंच 'स्पायडरमॅन' अॅलन रॉबर्ट यांनी पुढाकार घेतलाय.

च्युंग काँग सेंटर या 68 मजल्यांच्या गगनचुंबी इमारतीवर चढून शांततेचं आवाहन करणारं बॅनर लावत, अॅलन रॉबर्ट यांनी चीन आणि हाँगकाँगचे झेंडेही फडकावले.

विशेष म्हणजे, अॅलन रॉबर्ट यांनी यावेळी दोरी किंवा सुरक्षापट्ट्यांचा वापर केला नव्हता.

अॅलन रॉबर्ट हे जगप्रसिद्ध गिर्यारोहक आहेत. उंच उंच इमारतींवर कुठल्याही आधारविना चढाई करण्यात ते वाकबगार मानले जातात. 'स्पायडरमॅन' म्हणून जगभर ते प्रसिद्ध आहेत. ते आता 57 वर्षांचे आहेत.

"मी जे करतोय, त्याने कदाचित वातावरण थोडं निवळेल आणि लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटेल, अशी मला आशा आहे," असं अॅलन रॉबर्ट माध्यांशी संवाद साधताना म्हणाले.

सरकारशी संवाद साधत हाँगकाँगमधील जनतेने त्वरित शांतता प्रस्थापित करावी, असा उद्देश अॅलन यांचा होता.

अॅलन रॉबर्ट

फोटो स्रोत, AFP

अॅलन रॉबर्ट यांच्या या धाडसी कृतीनंतर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया पाहायाला मिळाल्या.

ऑस्ट्रोलियात राहणारे चिनी कलाकार बॅडिएत्झाओ यांनी ट्विटरवर म्हटलं, "हाँगकाँग आणि चीनबद्दल पाश्चिमात्य देश किती अनभिज्ञ आहेत, हेच या झेंड्यावरून दिसून येतं. तुम्हाला कसाई आणि हुकूमशहांसोबत हातमिळवणी करायचीय का?"

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

अॅलन रॉबर्ट हे कुठलीही पूर्वसूचना न देता किंवा परवानगी न घेता असे धाडसी प्रयोग करत असतात.

याआधीही त्यांनी हाँगकाँगमधील च्युंग काँग सेंटरसह इतर गगनचुंबी इमारतींवर चढाई केली होती.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात हाँगकाँग कोर्टाने अॅलन रॉबर्ट यांच्यावर 365 दिवसांची बंदी आणली होती. त्या बंदीची मुदत संपली की अजून आहे, हे अद्याप कळू शकलं नाही.

यंदाच फिलिपाईन्सची राजधानी मनिलामध्ये 47 मजल्यांच्या इमारतीवर चढाई केल्याने अॅलन रॉबर्ट यांना अटक करण्यात आली होती.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

याआधी अॅलन रॉबर्ट यांनी जगातील सर्वांत उंच इमारत अर्थात दुबईतील बुर्ज खलिफा टॉवर, क्वालालंपूरमधील पेट्रोनस टॉवर, तैवानमधील तैपाई 101 इमारत आणि लंडनमधील हेरॉन इमारतीवर यशस्वी चढाई केलीय.

अॅलन रॉबर्ट ज्या इमारतीवर चढले होते, ते च्युंग काँग सेंटर ही इमारत ली का शिंग यांच्या मालकीची आहे.

ली का शिंग यांनी शुक्रवारी वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन, हिंसा रोखण्याचं आवाहन केलं. 'चीनवर प्रेम करा, हाँगकाँगवर प्रेम आणि स्वत:वर प्रेम करा', 'रागाला प्रेमाने आळा घाला' आणि 'हिंसा थांबावा' अशी आवाहनं त्यांनी वृत्तपत्रांमधून केली.

च्युंग काँग सेंटर

फोटो स्रोत, AFP

ली का शिंग यांनी एक पत्रकही जारी केलं. त्यात ते म्हणतात, 'एक देश, दोन यंत्रणा' यामुळेच आपली सर्वांची भरभराट होऊ शकते.

हाँगकाँगमधील आंदोलकांचा आवाज स्पष्टपणे सरकारपर्यंत पोहोचला असल्याचंही त्यांनी म्हटलं.

हाँगकाँग का धुमसतंय?

हाँगकाँगमध्ये राहणाऱ्या आरोपींना चीनच्या मुख्य भूमीत पाठवण्यासाठी मांडलेल्या विधेयकाविरोधात हाँगकाँगचे रहिवासी आक्रमक झालेत.

संशयित गुन्हेगारांवर खटला चालवण्यासाठी त्यांना चीनच्या मुख्य भूमीमध्ये पाठवणं या वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकामुळे शक्य होऊ शकतं. चीनच्या राजकीय विरोधकांनाही या विधेयकामुळे लक्ष्य करणं या विधेयकामुळे चीनला शक्य होईल.

त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून लाखो लोक हाँगकाँगमध्ये या विधेयकाविरोधात निदर्शनं करत आहेत.

चीनच्या न्याय व्यवस्थेविषयी अनेक शंका व्यक्त केल्या जातात. या विधेयकामुळे हाँगकाँगच्या सध्याच्या स्वतंत्र न्याय व्यवस्थेवर घाला येईल आणि ब्रिटिशांच्या या जुन्या कॉलनीतील लोकांना याचा फटका बसेल, असं टीकाकारांचं म्हणणं होतं.

हाँगकाँग आंदोलन

फोटो स्रोत, MARCIO MACHADO/GETTY

धार्मिक किंवा राजकीय आरोप असणाऱ्या व्यक्तीचं चीनला प्रत्यार्पण करण्यात यावं यासाठी या कायद्यात तरतूद करण्यात आली असून या विधेयकामुळे पळवाटा बंद होण्यास मदत होणार असल्याचं या विधेयकाला समर्थन देणाऱ्यांचं म्हणणं आहे.

पण हाँगकाँग चीनी राजवटीचाच भाग आहे ना?

हाँगकाँग पूर्वी ब्रिटिश राजवटीचा भाग होतं. 1997मध्ये चीनकडे हाँगकाँगचं हस्तांतरण झालं. त्यानंतर हाँगकाँगला ''एक देश-दोन प्रणाली'' या तत्त्वानुसार निम-स्वायत्त दर्जा मिळाला.

या शहराचे स्वतःचे नियम आहेत आणि इथे राहणाऱ्या नागरिकांना मिळणाऱ्या नागरी सवलती चीनच्या मुख्य भूमीत राहणाऱ्या नागरिकांनाही मिळत नाहीत.

हाँगकाँग आणि चीन

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिका आणि युनायटेड किंग्डमसह एकूण 20 देशांसोबत हाँगकाँगने प्रत्यार्पण करार केला आहे. पण गेली दोन दशकं वाटाघाटी सुरू असूनही चीनसोबत अशा प्रकारचा कोणताही करार करण्यात आलेला नाही.

बचाव करणाऱ्याला चीनी कायद्यांनुसार स्वतःचं कायदेशीर संरक्षण करण्याची जी अल्प संधी मिळते, त्यामुळेच प्रत्यार्पण करार करण्यात हे अपयश आल्याचं टीकाकारांचं म्हणणं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)