चीन आणि हाँगकाँग यांना जोडणारा तब्बल 55 किलोमीटरचा भन्नाट पूल

हाँगकाँग, चीन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, दिमाखदार असा हा चीन-हाँगकाँग पूल

हाँगकाँग- झुआई-मकाऊ यांना जोडणारा असा हा 55 किलोमीटरचा प्रशस्त सेतू आहे. पर्ल नदीच्या विस्तीर्ण पात्रातून जाणारा हा पूल अभियांत्रिकी आणि स्थापत्यशास्त्राची किमया मानला जात आहे.

हाँगकाँग, चीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हाँगकाँग-चीन पुलाचे स्तंभ

दोन लिंक रोडसह या पुलाची लांबी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को गेट ब्रिजच्या 20 पटींनी जास्त आहे.

हाँगकाँग, चीन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, या पुलाचं नयनरम्य दृश्य

भूकंप, या भागात येणारी चक्रीवादळं तसंच धडकणारी जहाजं या सगळ्यांचा प्रतिकार करू शकेल, अशा रीतीने या पुलाची उभारणी करण्यात आली आहे.

हाँगकाँग, चीन

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, या पुलाचे विहंगम दृश्य

पुलामुळे जहाजांच्या वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पुलाचा 6.7 किलोमीटरचा टप्पा पाण्याखालून काढण्यात आला आहे. दोन कृत्रिम बेटांद्वारे पाण्याखालून हा मार्ग जातो.

हाँगकाँग, चीन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पुलावर प्रकाशयोजनेची अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

या पुलाचा मार्ग हाँगकाँगमधून जाण्यायेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांच्या क्षेत्रात येतो. त्यामुळे पुलाच्या उंचीला काही विशिष्ट मर्यादा आहेत.

हाँगकाँग, चीन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पुलावर आपात्कालीन परिस्थिती उदभवल्यास संपर्कासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

2009मध्ये या पुलाच्या उभारणीचं काम सुरू झालं. मात्र सुरक्षितता तसंच अन्य कारणांमुळे पुलाचं काम पूर्णत्वास जाण्यास 2018 वर्ष उजाडलं. या पुलासाठीचा खर्च सातत्याने वाढत गेला. पूर्णत्वास जाताना या पुलासाठीचा आलेला खर्च 20 अब्ज डॉलर्स इतका प्रचंड आहे.

हाँगकाँग, चीन

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, पुलाच्या उद्घाटनानिमित्ताने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

या पुलाचं उद्घाटन 2016 मध्ये होणार होतं. यंदाही हा पुलाचं उद्घाटन होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र अवघ्या महिनाभरापूर्वी पुल जनतेसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हाँगकाँग, चीन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पुलाच्या उद्घाटनापूर्वी शेवटचा हात दिला जात असतानाचे दृश्य

या पुलाच्या उभारणीसाठी लागणारा वेळ आणि खर्च सातत्याने वाढत गेलाच. मात्र प्रत्यक्ष उभारणी सुरू असताना नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

हाँगकाँग, चीन

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, प्रशस्त अशा या पुलाचे दृश्य

या पुलामुळे मकाऊ आणि हाँगकाँग या दोन विशेष प्रशासकीय विभागांसह चीनचा मुख्य प्रदेश एकमेकांशी जोडला जाणार आहे. विविध राजकीय आणि कायदेशीर नेतृत्व असलेल्या प्रांतातून या पुलाची वाटचाल होते.

हाँगकाँग, चीन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पुलावरील इलेक्ट्रॉनिक संकेतांक

पुलावरून बस तसेच अन्य खासगी गाड्यांच्या माध्यमातून वाहतूक सुरू होईल. स्थानिक टॅक्सींना या पुलावर प्रवेश असणार नाही. मात्र काही खासगी गाड्यांना या पुलावर प्रवेश असेल.

हाँगकाँग, चीन

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, पुलादरम्यानचे जकात नाके

हाँगकाँगहून चीनच्या मुख्य भागात जाण्यासाठी परवाना लागतो. पुलावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी 55 किलोमीटरच्या मार्गात 2 जकात नाक्यांची उभारण्यात आली आहे.

हाँगकाँग, चीन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पुलावरून जाताना प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक गोष्टी तयार करण्यात आल्या आहेत.

या पुलाच्या उभारणीपूर्वी या प्रवासासाठी चार तास लागत असत. या पुलामुळे अवघ्या अर्ध्या तासात हे अंतर गाठता येणार आहे.

हाँगकाँग, चीन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, संध्याकाळच्या वेळचे पुलाचे दृश्य

हाँगकाँगमधील काही व्यक्तींनी या पूल उभारणीवर टीका केली आहे. या पुलाची आवश्यकता नाही, केवळ हाँगकाँगला चीनच्या जवळ आणण्याच्या दृष्टीने या पुलाची उभारणी करण्यात आल्याचं टीकाकारांचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)