'रोमा'ला मिळालेल्या ऑस्करवर स्टीव्हन स्पीलबर्ग यांना आक्षेप का?

फोटो स्रोत, NETFLIX
'रोमा' चित्रपटाला यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये मिळालेल्या नामांकनांवरून सुरू असलेल्या वादावर नेटफ्लिक्सनं स्वतःची बाजू मांडली आहे.
"जे लोक थिएटरपर्यंत जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी आम्ही चित्रपट हे माध्यम अधिक सोपं केलं आहे," असं ट्वीट करून नेटफ्लिक्सनं आपली निर्मिती असलेल्या 'रोमा'ला मिळालेल्या ऑस्करचं समर्थन केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
नेटफ्लिक्सची निर्मिती असलेल्या 'रोमा' या चित्रपटाला यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी सर्वाधिक दहा नामांकनं होती. 'रोमा' परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला तर अल्फोन्सा क्युरॉन यांना 'रोमा'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. मात्र 'रोमा'च्या ऑस्करमधील समावेशावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. यामध्ये एक नाव दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांचंही आहे.
दोन वेळा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं ऑस्कर मिळवणाऱ्या स्पीलबर्ग यांनी नेटफ्लिक्सच्या निर्मितीला चित्रपटांच्या पुरस्कार सोहळ्यात स्थान कसं मिळालं, असा आक्षेप घेतला होता.
काय आहे स्पीलबर्ग यांचा आक्षेप?

फोटो स्रोत, Getty Images
'नेटफ्लिक्सच्या चित्रपटांनी टीव्ही शोसाठी असलेल्या एमी पुरस्कारांसाठी आपले चित्रपट पाठवावेत,' असं विधान स्पीलबर्ग यांनी गेल्यावर्षी केलं होतं. नेटफ्लिक्स 'टीव्ही चित्रपटां'ची निर्मिती करत असल्याचं स्पीलबर्ग यांचं म्हणणं आहे.
"मला स्वतःला टीव्ही आवडतो. पण चित्रपटाच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा एक भव्य अनुभव देत असतो. तो महत्त्वाचा असतो," असं स्पीलबर्ग यांनी म्हटलं होतं.
स्टीव्हन स्पीलबर्ग हे ऑस्कर पुरस्कार देणाऱ्या अॅकॅडमीचे सदस्य आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या अॅकॅडमीच्या बैठकीत स्पीलबर्ग हा मुद्दा पुन्हा उपस्थित करू शकतात.
नेटफ्लिक्स आपले ठराविक चित्रपट काही आठवड्यांसाठी चित्रपटगृहात प्रदर्शित करते. त्यामुळे त्यांची निर्मिती असलेले चित्रपट हे ऑस्करसारख्या पुरस्कारांसाठी पात्र ठरू शकतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
स्पीलबर्ग यांच्या मताशी सहमत नसलेले अन्य दिग्दर्शकही आहेत. ए रिंकल इन टाइम आणि सेल्मा सारखे चित्रपट बनविणाऱ्या एव्हा ड्युवेर्नाय हिनं स्पीलबर्ग यांचं मत आपल्याला मान्य नसल्याचं ट्वीट केलं होतं.
एव्हानं नेटफ्लिक्ससाठीच बनविलेल्या माहितीपटाला 2017 च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नामांकन होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)