ऑस्कर : 'द ग्रीन बुक' दोन मित्रांची गोष्ट ठरली सर्वोत्तम

फोटो स्रोत, Getty Images
91वा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस इथल्या डॉल्बी थिएटरमध्ये आज झाला. 'रोमा' आणि 'द फेव्हरिट' हे दोन चित्रपटांना मागे टाकत द ग्रीन बुक या चित्रपटाने सर्वोत्तम सिनेमाचा पुरस्कार मिळवला.
10 नॉमिनेशनसह रोमा आणि द फेव्हरिट सर्वोत्तम चित्रपटाच्या स्पर्धेत आघाडीवर होते. पण द ग्रीन बुकने या दोन्ही सिनेमांना मागे टाकत सर्वोत्तम सिनेमाचा पुरस्कार मिळवला. 'स्टार इज बॉर्न' आणि 'व्हाईस' या सिनेमांना प्रत्येकी 8 नॉमिनेशन मिळाले होते. बोहेमिअन ऱ्हाप्सोडीला 4 ऑस्कर पुरस्कार मिळाले. तर ब्लॅक पॅँथर आणि ग्रीन बुक यांना प्रत्येकी 3 पुरस्कार मिळाले.
रोमा या सिनेमासाठी दिग्दर्शक अलफोन्सा क्युरॉन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. तर बोहेमिअन ऱ्हाप्सोडीतील भूमिकेसाठी रामी मलेक याला सर्वोत्तम अभिनेत्याचा तर ऑलिव्हिया कोलमन हिला द फेव्हरिट या सिनेमासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

फोटो स्रोत, Getty Images
विविध 24 प्रकारांत ऑस्कर पुरस्कार दिले जाणार आहेत. सहकलाकार, मेकअप आणि हेअर स्टायलिंग, डॉक्युमेंट्री, वेशभूषा, संकलन, प्रॉडक्शन डिझाईन, सिनेमॅटोग्राफी, साउड एडिटिंग, साऊड मिक्सिंग, परदेशी भाषेतील सर्वोत्तम सिनेमा, महिला सहकलाकार, अॅनिमेटेड फिल्म, लाईव्ह अॅक्शन शॉर्ट, अॅनिमेटेड शॉर्ट, डॉक्युमेंट्री शॉर्ट, व्हिज्युअल इफेक्ट, ओरिजनल स्क्रीनप्ले, अडॅप्टेड स्कीनप्ले, ओरिजन स्कोअर, गीत, सर्वोत्तम अभिनेता, सर्वोत्तम अभिनेत्री, सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम सिनेमा या प्रकारात ऑस्कर पुरस्कार दिले जातील.
यंदाचा ऑस्कर सोहळा विविध वादांनी चर्चेत आहेत. सुरुवातीला काही प्रकारांतील पुरस्कार वगळण्यात आले होते, तर काही नवीन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. तसेच वेळ वाचवण्यासाठी अॅडब्रेकमध्ये काही पुरस्कारांची घोषणा होणार होती. पण यातील बरेच बदल नंतर मागे घेण्यात आले. यंदाचा सर्वांत मोठा बदल म्हणजे सूत्रसंचालकाशिवाय पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
पुरस्कार असे :
1. सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफी - अल्फोन्सो क्युरॉन , (सिनेमा - रोमा)

फोटो स्रोत, Getty Images
2. हानाह बिच्लर (प्रॉडक्शन डिझाईन ), जे हार्ट (सेट डेकोरेशन) - सिनेमा ब्लॅक पँथर
3. एलिझाबेथ चाई वासरहेलि, जिम्मी चिन, इव्हान हेज आणि शॅनॉन डिल्ली (डॉक्युमेंट्री, फ्री सोलो)
4. साऊंड एडिटिंग - जॉन वॉरहस्ट, निना हार्टस्टोन (बोहेमिअन ऱ्हाप्सोडी)
5. साऊंड मिक्सिंग - पॉल मेसी, टिम कॅव्हागिन, जॉन कसाली (बोहेमिहान राहप्सोडी)

फोटो स्रोत, Getty Images
6. मेकअप, हेअर स्टाईलिंग - ग्रेग कॅनॉम, बिस्को, पॅट्रिसिया डेहानी (व्हाईस)
7. वेशभूषा - रुथ कार्टर (ब्लॅक पँथर)
8. सहअभिनेत्री - रेजिना किंग (ईफ बील स्ट्रीट कुड टॉक)
9. सहअभिनेता - मेहेरशाला अली (ग्रीन बूक)
10. संकलन - जॉन ऑटमॅन (बोहेमिअन ऱ्हाप्सोडी)

फोटो स्रोत, Getty Images
11. परेदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट सिनेमा - रोमा (मेक्सिको, अलफोन्सो क्युरॉन)
12. अॅनिमेटेड फिचर फिल्म - स्पायडर मॅन, इनटू द स्पाईडर-व्हर्स
13. डॉक्युमेंट्री शॉर्ट सबजेक्ट - पिरियड : एंड ऑफ सेन्टेन्स, (रायका जेहटब्ची, मेलिसा बेर्टन)
14. डॉक्युमेंट्री (फिचर) - फ्रि सोलो (एलिझाबेथ चाई वासरेलि, जिमि चिन, इन्हान हायेस, शॉनॉन डिली)
15. शार्ट फिल्म (लाईव्ह अॅक्शन) - स्किन (गाय नट्टिव, जैमी राय न्यूमन)
16. शॉर्ट फिल्म अनॅमिटेड - बाओ (डॉमी शी, बेकी नियमन कॉब)

फोटो स्रोत, Getty Images
17. व्हज्युअल इफेक्टस - फर्स्ट मॅन (पॉल लाम्बर्ट, ईअॅन हंटर, ट्रिस्टन माईल्स, जे. डी. शॉवलम)
18. अडॅप्टेड स्क्रीन प्ले - ब्लॅकक्कक्समॅन
19. ओरिजन स्क्रीन प्ले - ग्रीन बूक
20. सर्वोत्तम गीत - लेडी गागा (शॅलो, ए स्टार ईज बॉर्न)
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








