करणजित कौर : सनी लिओनीच्या जीवनपटाला का होतोय विरोध?

फोटो स्रोत, AFP
- Author, अनंत प्रकाश
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
माजी पॉर्नस्टार आणि बॉलिवुड अभिनेत्री सनी लिओनी हिच्या जीवनावर आधारित 'Karenjit Kaur - The Untold Story' ही वेब सीरिज Zee5 या वेब चॅनलवर 16 जुलैपासून सुरू होत आहे. पण रिलीज होण्याआधीच हा जीवनपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
या सीरिजमध्ये सनी लिओनीचा लहानपणापासून पॉर्नस्टार आणि बॉलिवुड अभिनेत्री होण्यापर्यंतचा प्रवास चित्रित करण्यात आला आहे.
या 5 जुलैला या बायोपिकचा ट्रेलर रिलीज झाला, तेव्हापासूनच युट्यूब, ट्विटर आणि फेसबुकवर या सिनेमाच्या समर्थनार्थ तसंच विरोधात चर्चा झडू लागली आहे.
ट्विटर युजर पवन गोगना म्हणतात, "एक पंजाबी शीख मुलगी म्हणून तू फक्त तुझंच नव्हे तर तुझ्या कुटुंबाचंही नाव बदनाम केलंय. एका अयशस्वी व्यक्तीची बायोपिक बघण्यात कुठलाच रस नाही."

फोटो स्रोत, TWITTER/PGOGNA
पण शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने या सिनेमाच्या नावावरच आक्षेप नोंदवला असून या सिनेमाला अधिकृतरीत्या विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.
'सिनमात कौर शब्द का वापरला?'
शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने सिनेमाच्या नावावर आक्षेप नोंदवला आहे. सनी लिओनी हिने बायोपिकच्या नावात 'कौर' हा शब्द का वापरला आहे, असा प्रश्न त्यांनी केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 1
समितीचे प्रवक्ते दलजीत सिंह बेदी यांनी बीबीसीला सांगितलं, "ती पॉर्नस्टार होती. ती लहानपणी शीख जरी असली तरी नंतर तिने आपला धर्म बदलून ख्रिश्चन धर्म स्वीकारला. तिचा पतीही ख्रिश्चन आहे. शीख धर्मात सिंह आणि कौर या नावांना महत्त्व आहे. त्यामुळे शीख धर्मियांच्या भावना दुखावतील, अशा शब्दांचा वापर तिने करायला नको होता. यासाठीच तिने कौर शब्दाचा वापर करू नये, असं तिला सांगण्यात आलं आहे."
हा शब्द वगळला नाही तर विरोध अधिक तीव्र करू, असा इशारा बेदींनी दिला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 2
कौर हा शब्द सनी लिओनी यांच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित असल्यानं ती या शब्दाचा वापर का करू शकत नाही, याबाबतीत बीबीसीने जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
या प्रश्नावर बेदी म्हणतात, "एक ख्रिश्चन म्हणून सनी लिओनी तिला हवं ते करू शकते. पण या शब्दाचा वापर तिने करू नये. 'Sunny Leone- The Untold Story' या नावानं ती बायोपिक का रिलीज करत नाही?"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 3
DNA न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार या वादावर प्रतिक्रिया देताना या बायोपिकचे दिग्दर्शक आदित्य दत्त म्हणाले की ते शीख समुदायाच्या भावनांचा पूर्णतः आदर करतात. ते स्वतः शीख आहेत. पण या आधुनिक काळात एखाद्याला त्याच्या कौटुंबिक नावाचा वापर करण्यापासून रोखणं, हे खरं तर त्यांच्यासाठी आश्चर्यकारक असल्याचं दत्त म्हणाले.
कौर शब्दाचा वापर कोण करू शकतं?
शीख समुदायात महिलांच्या त्यांच्या नावाच्या मागे 'कौर' असा शब्द लावतात, ज्याचा अर्थ राजकुमारी असा होतो.
शीख धर्माचे दहावे गुरू गुरू गोविंद सिंह यांनी लोकांना धर्मात सहभागी करून घेताना महिलांना 'कौर' आणि पुरुषांना 'सिंग' असं नाव दिलं होतं.
शीख धर्माच्या सिद्धांतानुसार महिला आणि पुरुष यांना समान दर्जा देण्यात आलेला आहे. महिलांना आपल्या जीवनात पुरुषांचं आडनाव आपल्या नावामागे लावण्याची गरज नाही.
सिनेमात काय आहे विशेष?
सनी लिओनीच्या या बायोपिकमध्ये सनी स्वतःच्याच भूमिकेत आहे. हे विशेष आहे, कारण खूप कमी लोक स्वतःच्याच बायोपिकमध्ये काम करतात.
शिवाय, सनी लिओनी यांचे पती डेनिअल वेबरची भूमिका मार्क बकर साकारणार आहेत.

फोटो स्रोत, INSTAGRAM/SUNNYLEONE
याआधी बॉक्सर मोहम्मद अली यांच्या जीवनावर आधारित The Greatest - My Own Story या सिनेमात मोहम्मद अली यांनी स्वतः अभिनय केला होता.
2016 साली आलेल्या MD Dhoni - The Untold Story या बायोपिकच्या निर्मितीमध्ये महेंद्र सिंह धोनी बऱ्यापैकी सहभागी होता. तसंच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'संजू'मध्ये संजय दत्तही बघायला मिळतो.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)