You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
..जेव्हा 'डीप ब्लू शार्क'सोबत डायव्हर्सची भेट होते
हवाईच्या बेटांवर काही डायव्हर्स मादी शार्कच्या इतक्या जवळ आले की ते तिला स्पर्श करू शकत होते.
तिचं वजन 2.5 टन इतकं आहे. ती डायव्हर्सपासून फक्त 6 मीटर अंतरावर होती.
20 वर्षांपूर्वी संशोधकांनी तिचा उल्लेख Deep Blue असा केला होता, असं म्हटलं जातं.
व्हेल माशाच्या मृत शरीराकडे ती आकर्षित झाली होती.
यापैकी एक डायव्हर्स ओसन रॅम्से यांनी Honolulu Star Advertiserला सांगितलं की, "ते एका चित्रपटाचं चित्रिकरण करत होते तेव्हा ती त्यांनी दिसली. आम्ही काही टायगर शार्क पाहिले आणि मग काही कालावधीनंतर ती तिथं आली. ती आल्याआल्या बाकीच्या माशांनी तिला रस्ता करून दिला. नंतर ती आमच्या बोटीजवळ आली.
"ती एकदम मोठी आणि दिसायला सुंदर होती, तिला आमच्या बोटाविषयी आकर्षण वाटलं असावं. आम्ही सूर्योदय झाल्यानंतर तिथं गेलो होतो. दिवसभर ती आमच्याबरोबरच होती."
रॅम्से यांनी म्हटलं की, "तिचं शरीर खूपच मोठं दिसत होतं, कदाचित ती प्रेग्नंट असावी."
डीप ब्लू जवळजवळ 50 वर्षांची आहे, असं मानलं जातं. तिचं स्वतःचं ट्वीटर अकाउंट आहे.
ग्रेट व्हाईट शार्क हवाईच्या बेटावर क्वचितच दिसतात कारण त्यांचं प्राधान्य अतिथंड समुद्राला असतं.
"शार्कजवळ पोहणं सर्वांत सुरक्षित होतं. पण जिथं जिथं शार्क आहार घेत होते, तिथं तिथं आम्ही पोहताना सावधगिरी बाळगली," रॅम्से सांगातात.
"त्यांनी म्हटलंय, माणसांबद्दल उत्सुकता वाटल्यास अथवा लोकांच्या वर्तनाचा चुकीचा अर्थ लावल्यास शार्क हल्ला करतात," असं Honolulu Star Advertiserनं म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)