You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
धनत्रयोदशी: सोने खरेदी करण्याचा बेत आहे? भारतात एवढे सोने येते कुठून?
सोनं हा प्रत्येक भारतीयाच्या जिव्हाळ्याचा विषय. वर्षभरात येणाऱ्या वेगवेगळ्या मुहूर्तांवर सोन्याची खरेदी करण्याचा मोह होत नाही असे भारतीय कमीच आहेत. पण आपण ज्या सोन्यावर एवढा जीव ओततो ते सोनं येतं तरी कुठून,कुठे आहेत त्याच्या सर्वांत मोठ्या खाणी, कुणाची आहे त्यावर पकड आणि कसं आहे त्याचा व्यापार करणाऱ्या कंपन्यांमधलं राजकारण?
कॅनडाची बॅरिक गोल्ड कॉर्पोरेशन ही जगभरातील सर्वाधिक सोनं उत्खनन करणारी कंपनी आहे. बाजारात या कंपनीची किंमत 18 अब्ज डॉलर्स आहे.
या कंपनीन नुकतंच जर्सीतल्या रेंडगोल्ड कंपनीला खरेदी केलं आहे. रेडगोल्ड कंपनी मालीमध्ये सोनं उत्खननाचं काम करते.
बॅरिक गोल्डचं मुख्यालय कॅनडाची राजधानी टोरंटोमध्ये आहे आणि कंपनीचं सर्वांत मोठं मायनिंग कॉम्प्लेक्स अमेरिकेतल्या नेवाडामध्ये आहे.
ही कंपनी 10 देशांत सोनं उत्खनन करते. 2017मध्ये या कंपनीनं 10 टन सोन्याचं उत्खनन केलं आणि 1400 मिलियन डॉलरची नफा कमावला.
बॅरिक गोल्ड आणि रेंडगोल्ड या कंपन्यांचं एकत्रिकरण पुढच्या वर्षीच्या तिमाहीत पूर्ण होईल. पण यानंतर कंपनीला जागतिक बाजारात काही आव्हानांनाही सामोरं जावं लागणार आहे.
2012पासून जागतिक बाजारपेठेतील सोन्याचा साठा 12 टक्क्यांनी घटला आहे. यात यंदा 8 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
लॅटिन अमेरिका, अर्जेंटिना, चिली, पेरू आणि डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये कंपनीची पकड मजबूत आहे. पण आता दक्षिण अमेरिकेत पाय पसरण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत.
रेंडगोल्डचे संस्थापक मार्क ब्रिस्तो यांनी सांगितलं की, "लॅटिन अमेरिकेत अजून बरंच काम बाकी आहे."
2019मध्ये ब्रिस्तो बॅरिक यांनी गोल्ड कंपनीचे कार्यकारी संचालक पदाची सूत्रे हाती घेतली.
लॅटिन अमेरिकेचा 'गोल्ड बेल्ट'
लॅटिन अमेरिकेच्या एल इंडियो गोल्ड बेल्टमध्ये मोठ्या प्रमाणावर सोनं मिळतं. अर्जेंटिना आणि चिली यांच्यामध्ये हा प्रदेश येतो. कंपनीसाठी हा भाग महत्त्वाचा बनला आहे. पण इथं उत्खनन करणं सोपं काम नाही.
गेल्या काही वर्षांत पर्यावरणाचं उल्लंघन केल्याचा आरोप बॅरिक गोल्डवर लागला आहे. यामुळे पोलीस चौकशी आणि निदर्शनांचा कंपनीला सामना करावा लागला आहे.
याचं एक उदाहरण आहे अर्जेंटिनातल्या वेलाडेरो खाणीचं. जिथं डिसेंबर 2015मध्ये अर्जेंटिनाच्या इतिहासतली सर्वांत मोठी दुर्घटना घडली. लाखो टन धातूनं पाण्याला प्रदूषित केलं.
सद्याच्या घडीला अर्जेंटिनातील जवळपास 50 टक्के सोन्याच्या खाणी बॅरिक गोल्डच्या ताब्यात आहेत आणि उरलेल्या 50 टक्के शेंडॉन्ग गोल्ड ग्रूपच्या ताब्यात आहेत.
गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात दोन्ही कंपन्यांनी पार्टनरशिप केली आणि एकत्रीतपणे नवीन प्रकल्पावर काम करू, असं सांगितलं होतं.
याशिवाय चिलीतल्या पासकुआ लामा खाणीशई निगडीत काही पर्यावरणीय समस्यांमुळे कोर्टानं कंपनीवर काही प्रतिबंध लादले होते. याच कारणामुळे कंपनी अर्जेंटिनात काम करेल.
खाणींचं महत्त्व
बिझनेस न्यूज अमेरिकेच्या वरिष्ठ विश्लेषक लॉरा सुप्रेनो यांनी बीबीसीला सांगितलं की, जेव्हा ब्रिस्तो खाणींना हत्तींचं विशेषण देतात तेव्हा ते नवीन खाणींच्या शोधाकडे इशारा करत असतात. लॅटिन अमेरिकेतल्या काही भागांना अजून व्यवस्थितरित्या खोदण्यात आलेलं नाही.
पासकुआ लामा प्रकल्पात कंपनीला झालेल्या नुकसानामुळे या भागांत उत्खनन सुरू झालेलं नाही. बॅरिक आणि शेंडॉन्ग यांच्या पार्टनरशिपवर सर्वांची नजर आहे.
दोन्ही कंपन्या त्यांची भागीदारी थोडी-थोडी वाढवत आहे, असं जाणकारांचं म्हणणं आहे. वेलाडेरो खाणींतली पार्टनरशिप याचाच भाग आहे.
दक्षिण अमेरिकेतील बॅरिक गोल्डची खाण
लगुनास नोर्टे - ही खाण उत्तर पेरुमध्ये आहे. समुद्रतटापासून उंची 3700 ते 4200 मीटर आहे.
वेलाडेरो - अर्जेंटिनातील सोनं आणि चांदीच्या या खाणीत बॅरिक गोल्डचा 50 टक्के वाटा आहे. सान जुआनपासून 370 किमी दूर आणि एंडिज पर्वतापासून 4000 मीटर अंतरावर ती आहे.
जैलडिवर - चिलीतल्या या तांब्याच्या खाणीत सोन्याचा वाटा 50 टक्के तर एंटोफगास्टा मिनरलचा 50 टक्के वाटा आहे.
भविष्यातील प्रकल्प
चिलीमधील नॉर्थ ओपन प्रकल्प. ही सोनं आणि तांब्याची खाण आहे. हा एक पार्टनरशिपमधील प्रकल्प आहे. बॅरिक गोल्डची भागीदार गोल्डक्रॉप ही कंपनी आहे. यासाठी अजून पर्यावरणाची परवानगी बाकी आहे.
अर्जेंटिनातल्या पासुका लामा या खाणीमध्ये कंपनी पुन्हा उत्खनन सुरू करणार आहे.
चिलीतल्या हाइट्स या खाणीत बऱ्याच दिवसांपासून उत्खनन झालेलं नाही. बॅरिक गोल्ड लवकरच ते सुरू करेल, अशी आशा आहे.
जाणकारांच्या मते, एकत्रीकरण पूर्ण झाल्यानंतर कंपनी व्यापार गतीनं वाढवेल. आफ्रिकेत माली, सेनेगल, काँगो गणराज्य इत्यादी ठिकाणी रेंडगोल्डची चांगलीच पकड आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)