ब्लड मून फोटो : अमृतसर ते अथेन्स टिपलेल्या तपकिरी चंद्रग्रहणाच्या मनोहरी छटा

खगोलप्रेमी, अवकाश निरीक्षक आणि संशोधकांसाठी 21व्या शतकातील सर्वांत प्रदीर्घ चंद्रग्रहण एक पर्वणी ठरले.

'ब्लडमून'च्या विविध छटा जगभरातील कॅमेऱ्यात कैद करण्यात झाल्या आहेत. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका अशा विविध भागातून आकाशातील हा खेळ पाहता आला.

चंद्राची ही मनोहारी छबी कैद झाली आहे ग्रीसमध्ये. अथेन्सपासून जवळ असलेल्या केप सुनियन इथं असलेल्या टेंपल ऑफ पोसायडनच्या पार्श्वभूमीवर चंद्राची प्रतिमा टिपण्यात आली आहे. हे प्राचीन मंदिर ख्रिस्तपूर्व 440 साली बांधण्यात आलं होतं.

चंद्रग्रहणात पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते. यादरम्यान चंद्राला सूर्यापासून थेट प्रकाश मिळत नाही तर पृथ्वीच्या वातावरणातून फिल्टर होऊन परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे चंद्र नारंगी, लाल आणि तपकिरी भासतो.

ग्रहणाच्या निमित्ताने चंद्राच्या या छटा जगातील विविध भागातून पाहाता आल्या.

फ्रान्समधील स्ट्रॅटसबर्ग इथं या शिल्पानजीक चंद्र असा भासमान झाला होता. या प्रसिद्ध शिल्पाची निर्मिती अमेरिकेतील कलाकार जॉनथन बोरोस्की यांनी केली आहे. 'वुमन वॉकिंग टू द स्काय' असं या शिल्पाचं नाव आहे.

स्वित्झर्लंडच्या अल्पाईन पर्वतराजींवर चंद्र असा दिसत होता.

भारतात विविध भागात हा चंद्रग्रहण पाहता आलं. अमृतसर इथं सुवर्ण मंदिराच्या पार्श्वभूमीवर टिपण्यात आलेली ही चंद्राची प्रतिमा.

सूर्यग्रहण पाहण्यासाठी डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहाणे डोळ्यांना हानीकारक असते, त्यामुळे खास प्रकारचे गॉगल वापरून सूर्यग्रहण पाहावं लागतं. पण चंद्रग्रहण मात्र उघड्या डोळ्यांनी पाहता येतं.

अबुधाबी इथल्या प्रसिद्ध शेख झायेज ग्रॅंड मशिदीच्या मिनारांच्या मागे चंद्राचा असा खेळ चालला होता.

सिडनी शहराच्या स्कायलाईनवर आकाशातील या सावल्यांच्या खेळांत चंद्र असा लाल झाला होता.

तैवानच्या तैपेईमध्ये हे चंद्रग्रहण 1 तास 43 मिनिटं पाहता आलं. नागरिकांनी हा सोहळा 'याची देही' अनुभवण्यासाठी नागरिक, खगोलशास्त्रज्ञ, अवकाशप्रेमी नागरिकांनी अशी जय्यत तयारी केली होती.

सर्व छायाचित्र कॉपीराइटने कायद्याद्वारे संरक्षित आहेत.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)