ब्लड मून फोटो : अमृतसर ते अथेन्स टिपलेल्या तपकिरी चंद्रग्रहणाच्या मनोहरी छटा

दक्षिण जर्मनीत दिसलेला चंद्रग्रहण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दक्षिण जर्मनीत दिसलेला चंद्रग्रहण

खगोलप्रेमी, अवकाश निरीक्षक आणि संशोधकांसाठी 21व्या शतकातील सर्वांत प्रदीर्घ चंद्रग्रहण एक पर्वणी ठरले.

'ब्लडमून'च्या विविध छटा जगभरातील कॅमेऱ्यात कैद करण्यात झाल्या आहेत. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका अशा विविध भागातून आकाशातील हा खेळ पाहता आला.

अथेन्स जवळच्या केप युनियन इथं टेंपल ऑफ पोसायडन इथं चंद्राची टिपलेली प्रतिमा

फोटो स्रोत, Reuters

चंद्राची ही मनोहारी छबी कैद झाली आहे ग्रीसमध्ये. अथेन्सपासून जवळ असलेल्या केप सुनियन इथं असलेल्या टेंपल ऑफ पोसायडनच्या पार्श्वभूमीवर चंद्राची प्रतिमा टिपण्यात आली आहे. हे प्राचीन मंदिर ख्रिस्तपूर्व 440 साली बांधण्यात आलं होतं.

ग्रीसमध्ये दिसलेल्या चंद्रग्रहण

फोटो स्रोत, Getty Images

चंद्रग्रहणात पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते. यादरम्यान चंद्राला सूर्यापासून थेट प्रकाश मिळत नाही तर पृथ्वीच्या वातावरणातून फिल्टर होऊन परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे चंद्र नारंगी, लाल आणि तपकिरी भासतो.

ग्रहणाच्या निमित्ताने चंद्राच्या या छटा जगातील विविध भागातून पाहाता आल्या.

फ्रान्स चंद्रग्रहण

फोटो स्रोत, Getty Images

फ्रान्समधील स्ट्रॅटसबर्ग इथं या शिल्पानजीक चंद्र असा भासमान झाला होता. या प्रसिद्ध शिल्पाची निर्मिती अमेरिकेतील कलाकार जॉनथन बोरोस्की यांनी केली आहे. 'वुमन वॉकिंग टू द स्काय' असं या शिल्पाचं नाव आहे.

स्वित्झर्लंड, चंद्रग्रहण

फोटो स्रोत, EPA

स्वित्झर्लंडच्या अल्पाईन पर्वतराजींवर चंद्र असा दिसत होता.

भारतात अमृतसर इथं चंद्रग्रहण पाहाता आला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतात अमृतसर इथं चंद्रग्रहण पाहता आला.

भारतात विविध भागात हा चंद्रग्रहण पाहता आलं. अमृतसर इथं सुवर्ण मंदिराच्या पार्श्वभूमीवर टिपण्यात आलेली ही चंद्राची प्रतिमा.

सिंगापूर इथं जमलेले खगोलप्रेमी नागरिक

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, सिंगापूर इथं चंद्रग्रहण पाहण्यासाठी जमलेले नागरिक

सूर्यग्रहण पाहण्यासाठी डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहाणे डोळ्यांना हानीकारक असते, त्यामुळे खास प्रकारचे गॉगल वापरून सूर्यग्रहण पाहावं लागतं. पण चंद्रग्रहण मात्र उघड्या डोळ्यांनी पाहता येतं.

अबू धाबी इथून पाहाता आलेलं चंद्रग्रहण

फोटो स्रोत, Reuters

अबुधाबी इथल्या प्रसिद्ध शेख झायेज ग्रॅंड मशिदीच्या मिनारांच्या मागे चंद्राचा असा खेळ चालला होता.

सिडनी, चंद्रग्रहण

फोटो स्रोत, Getty Images

सिडनी शहराच्या स्कायलाईनवर आकाशातील या सावल्यांच्या खेळांत चंद्र असा लाल झाला होता.

तैवान, चंद्रग्रहण

फोटो स्रोत, Getty Images

तैवानच्या तैपेईमध्ये हे चंद्रग्रहण 1 तास 43 मिनिटं पाहता आलं. नागरिकांनी हा सोहळा 'याची देही' अनुभवण्यासाठी नागरिक, खगोलशास्त्रज्ञ, अवकाशप्रेमी नागरिकांनी अशी जय्यत तयारी केली होती.

सर्व छायाचित्र कॉपीराइटने कायद्याद्वारे संरक्षित आहेत.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)