पाहा फोटो : जपानमध्ये मुंबईपेक्षाही भयंकर पाऊस, 141 जणांचा मृत्यू

जपानमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि भूस्लखनामुळे 141 जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या तीन दशकांत प्रथमच पावसामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर जपानमध्ये जीवितहानी झाली आहे.

बचावपथकातले लोक आता चिखलात उतरून बचावकार्य करत आहेत आणि कारण अनेक लोक अजूनही तिथं अडकले आहेत.

वेगवेगळ्या नद्यांना पूर आल्यामुळे 20 लाख लोकांना विस्थापित करण्यात आलं आहे.

"मी माझ्या कुटुंबियांना अगदी वाईट परिस्थितीसाठी तयार राहण्यासाठी सांगितलं आहे," असं 38 वर्षीय कोसुके कियाहोरा म्हणाले. त्यांची दोन मुलं आणि बहीण बेपत्ता आहेत असं त्यांनी AFP या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

पंतप्रधान शिझो आबे यांनी सुद्धा पुराच्या या संकटामुळे आपले परदेश दौरे रद्द केले आहेत.

ओकायामा सारख्या भागात पुराची स्थिती अजूनही अतिशय गंभीर आहे आणि तिथं धोक्याचा इशारा अजूनही कायम आहे. येत्या काही दिवसात तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे बचतकार्याला मदतच होईल, असं सांगण्यात आलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)