चीनमध्ये दिसले आतापर्यंतचे जगातले सर्वांत जुने पावलांचे ठसे

पायांचे ठसे

फोटो स्रोत, AFP

चीनच्या दक्षिणेकडील भागात प्राण्यांच्या पायाचे सर्वांत जुने ठसे आढळले आहेत.

जवळपास 546 दशलक्ष वर्षांपूर्वी उमटलेले हे ठसे नेमके कोणत्या प्राण्याचे आहेत, हे अजून समोर आलेलं नाही. पण सर्वांत जुने प्राणी उत्क्रांत झाले त्या काळातले हे ठसे असल्याचं म्हटलं जात आहे.

सापडलेल्या अवशेषांमध्ये दिसून येणारे ठसे हे प्राण्यांच्या पायाचे असल्याचं दिसत आहे.

Science Advances journalनं केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

पण हा प्राणी 2 पायांचा होता की त्याहून जास्त पायांचा याबद्दल टीममधल्या सदस्यांमध्ये अस्पष्टता आहे. असं असलं तरी हा प्राणी 2 पायांचा असावा, असं या सदस्यांना वाटत आहे.

सर्वांत जुने पायाचे ठसे?

अवयवांची जोड (Paired Appendages) असलेला हा प्राणी असू शकतो, जसं की पायांची जोड. आज अस्तित्वात असलेले सर्वांत जास्त प्राणी या गटात मोडतात. आजूबाजूला फिरणाऱ्या प्राण्याच्या पायांचे हे ठसे आहेत.

दक्षिण चीनच्या यांगत्झे जॉर्ज्स भागात हे ठसे आढळले आहेत. 551 दशलक्ष ते 541 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या खडकावर हे ठसे आहेत.

"यापूर्वी आढळलेले पायाचे ठसे 540 ते 530 दशलक्ष वर्षांपुर्वीचे होते. यापेक्षाही 10 दशलक्ष वर्षांहून अधिक काळ हे ठसे जुने असल्याचं समोर आलं आहे," असं Chinese Academy of Sciencesचे अभ्यासक झे चेन यांनी AFP या वृत्तसंस्थेला सांगितलं.

हे ठसे पाहता हा प्राणी चालताना वेळोवेळी थांबलेला दिसून येतो, कदाचित तो अन्नाच्या शोधात असावा.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)