प्राणीविश्वाची गंमतजंमत!

'द कॉमेडी वाईल्डलाइफ' ही छायाचित्रकारांच्या कलेला आव्हान देणारी स्पर्धा यंदाही पार पाडली. यंदा या स्पर्धेचं तिसरं वर्षं आहे.

या स्पर्धेत फांदीवरून पडणाऱ्या आणि तरीही स्वत:ला सावरणाऱ्या या घुबडाच्या फोटोनं बाजी मारली.

तब्बल 3500 स्पर्धकांमधून निवडलेली ही काही छायाचित्रं!

घुबड, वन्यजीव, पर्यावरण

फोटो स्रोत, Tibor Kercz / Barcroft Images

फोटो कॅप्शन, एका झाडाच्या फांदीवर बसलेल्या या घुबडाच्या त्रिकुटापैकी एक घुबड खाली पडलं. तोल सावरून पुन्हा फांदीवर येण्याचा प्रयत्न करणाऱ्या या घुबडाची मुद्रा टिपली आहे तिबोर कर्स्झ यांनी. हंगेरीतील ओप्युस्झटेझर इथल्या या अद्भुत फोटोने पहिला क्रमांक पटकावला नसता तरच नवल.
रानउंदीर, वन्यजीव, पर्यावरण

फोटो स्रोत, Andrea Zampatti / Barcroft Images

फोटो कॅप्शन, आंद्रेआ झंपाटी यांनी इटलीतल्या इटुकल्या रानउंदीराचा फोटो 'ऑन द लँड' विभागात विजेता ठरला.
बीव्हर, वन्यजीव, पर्यावरण

फोटो स्रोत, Penny Palmer

फोटो कॅप्शन, अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातलं हे बीव्हर निवांत पहुडलेल्या क्षणी आळस देतानाचा हा फोटो टिपला आहे पेनी पाल्मर यांनी.
पेंग्विन, वन्यजीव, पर्यावरण.

फोटो स्रोत, Carl Henry

फोटो कॅप्शन, दक्षिण जॉर्जियातील दक्षिण अटलांटिक बेटावरील चर्चवारीसाठी सज्ज झालेल्या या पेंग्विन मंडळींचा फोटो टिपला आहे कार्ल हेन्री यांनी.
ससा, वन्यजीव, पर्यावरण

फोटो स्रोत, Olivier Colle

फोटो कॅप्शन, भरपूर गवत घेऊन निघालेला हा बेल्जियममधला ससा टिपला आहे ऑलिव्हर कोल.
माकड, वन्यजीव, पर्यावरण

फोटो स्रोत, Katy Laveck-Foster

फोटो कॅप्शन, बाइक सफारीला निघालेले ही मर्कटांची दुक्कल आपल्याला अचंबित करते. केटी लाव्हेक-फोस्टर यांनी ही भावमुद्रा टिपली आहे.
आफ्रिकन रानगवा, वन्यजीव, पर्यावरण

फोटो स्रोत, Jean-Jacques Alcalay

फोटो कॅप्शन, केनियातल्या मसाई मारा इथे आपल्या कळपाचं निरीक्षण करणाऱ्या रानगव्याचं चित्र टिपलं आहे जीन जॅक अल्कले यांनी.
सील, सागरी जीव, पर्यावरण.

फोटो स्रोत, George Cathcart

फोटो कॅप्शन, विचारमग्न अशा सील प्राण्याची ही चिंतनशील मुद्रा टिपली आहे जॉर्ज कॅथकार्ट यांनी. कॅलिफोर्नियातल्या सॅम सिमोइन इथलं हे दृश्य आहे.
ध्रुवीय अस्वल, वन्यजीव, पर्यावरण

फोटो स्रोत, Daisy Gilardini

फोटो कॅप्शन, आपल्या आईशी खेळणाऱ्या या लहानग्या ध्रुवीय अस्वलाचा फोटो. कॅनडातल्या मॅनितोबा इथलं हे मोहक दृश्य टिपलं आहे डेसी गिलार्डिनी यांनी.
मडसीपर्स, सागरी जीव, पर्यावरण

फोटो स्रोत, Daniel Trim

फोटो कॅप्शन, थायलंडमधली बेडकासारखी दिसणाऱ्या मडसीपर्सची ही जोडगोळी टिपली आहे डॅनियल ट्रीम यांनी.
कोल्हा, निसर्ग, पर्यावरण,

फोटो स्रोत, Douglas Croft

फोटो कॅप्शन, अमेरिकेतल्या सॅन जोस इथल्या कोल्ह्याने नैसर्गिक विधीसाठी हिरव्यागार गोल्फ कोर्सची निवड केली.
A sea turtle slapping a fish. Photo: Troy Mayne

फोटो स्रोत, Troy Mayne / Bancroft images

फोटो कॅप्शन, समुद्री कासवाकडून थप्पड खाल्लेल्या माशाची ही अवस्था कॅमेऱ्यात कैद केली आहे ट्रॉय मेय यांनी. अंडर द सी विभागात या फोटोने प्रथम क्रमांक पटकावला.
वन्यजीव, पक्षी, पर्यावरण

फोटो स्रोत, John Threlfall

फोटो कॅप्शन, विमानापाठोपाठ आकाशात भरारी घेणाऱ्या पक्ष्याचे हे छायाचित्र अप इन द एअर विभागात सर्वोत्कृष्ट ठरले. जॉन थ्रेलफॉल यांनी हे सुरेख दृश्य टिपलं आहे.

हे वाचलं का-

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)