पाहा फोटो : जगातल्या सगळ्यांत सुंदर उद्यानांचा नजारा

निसर्गाची ही मनमोहक अदाकारी डोळ्याचं पारणं फेडते. हे फोटो आहेत 'गार्डन्स फोटोग्राफर ऑफ द इयर कॉन्टेस्ट'मधले.

ब्राझीलचे मार्सियू कॅबराल हे या जागतिक स्पर्धेत विजेते ठरले. पायापलॅथिस शिक्विटेंसिस असं शास्त्रीय नाव असलेली वेगळ्या जातीची सूर्यफुलं त्यांनी टिपली. सूर्योदयाबरोबर उमलणारी ही फुलं आणि छायाप्रकाशाचा अद्भुत खेळ त्यांना पारितोषिक प्राप्त क्लिक देऊन गेला.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)