पाहा फोटो : जगातल्या सगळ्यांत सुंदर उद्यानांचा नजारा

निसर्गाची ही मनमोहक अदाकारी डोळ्याचं पारणं फेडते. हे फोटो आहेत 'गार्डन्स फोटोग्राफर ऑफ द इयर कॉन्टेस्ट'मधले.

ब्राझीलचे मार्सियू कॅबराल हे या जागतिक स्पर्धेत विजेते ठरले. पायापलॅथिस शिक्विटेंसिस असं शास्त्रीय नाव असलेली वेगळ्या जातीची सूर्यफुलं त्यांनी टिपली. सूर्योदयाबरोबर उमलणारी ही फुलं आणि छायाप्रकाशाचा अद्भुत खेळ त्यांना पारितोषिक प्राप्त क्लिक देऊन गेला.

ब्राझील

फोटो स्रोत, MARCIO CABRAL

फोटो कॅप्शन, ब्राझील : उगवता सूर्य अशी या फोटोची थीम आहे. मार्सियू कॅबराल यांनी हा नजारा टिपला आहे. ते या स्पर्धेचे विजेते ठरले. पायापलॅथिस शिक्विटेंसिसची ही फुलं सूर्यासोबतच उमलताना देखणी दिसतात.
line
मार्क बाउर

फोटो स्रोत, MARK BAUER

फोटो कॅप्शन, इंग्लंड : मार्क बाउर यांनी टिपलेलं हे दृश्य आहे ब्रिटनमधल्या स्टॅबर्ग हॅथ नॅशनल रिझर्व्हमधलं.
line
ANNIE GREEN-ARMYTAGE

फोटो स्रोत, ANNIE GREEN-ARMYTAGE

फोटो कॅप्शन, जर्मनी : एनी ग्रीन- आर्मीटिज यांनी बवॅरियामधला हा छोटासा दरवाजा टिपला. त्याला 'गेट ऑफ द मून' असंही म्हटलं जातं.
line
SHAOFENG ZHANG

फोटो स्रोत, SHAOFENG ZHANG

फोटो कॅप्शन, चीन : झटियांग प्रांतातल्या या वर्तुळाकार पर्वतांचा नजारा कॅमेराबंद केला आहे शाओफेंग झांग यांनी.
line
YI FAN

फोटो स्रोत, YI FAN

फोटो कॅप्शन, चीन : युआन प्रातांतल्या पर्वतराजीत सापडणाऱ्या या झाडाचे औषधी उपयोग आहेत. ते लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
line
STEVE LOWRY

फोटो स्रोत, STEVE LOWRY

फोटो कॅप्शन, आयर्लंड : आयर्लंडच्या उत्तर भागातल्या स्टीव्ह लॉरी यांनी लाकडाचा अंतर्भाग दाखणारा हा प्रकाश खेळ टिपला आहे.
line
MAURO TRONTO

फोटो स्रोत, MAURO TRONTO

फोटो कॅप्शन, इटली : पीडमॅंटमधल्या बुस्काग्ना भागातले हे दृश्य मौरो ट्रॅन्टो यांनी लोकांसमोर आणलं. त्याचं खूप कौतुक झालं.
line
HENRIK SPRANZ

फोटो स्रोत, HENRIK SPRANZ

फोटो कॅप्शन, ऑस्ट्रिया : जंगली युरोपीय हॅम्स्टरचा हा फोटो व्हिएन्नाच्या हेन्रिक स्प्रांज यांनी काढला आहे.
line
MARIANNE MAJERUS

फोटो स्रोत, MARIANNE MAJERUS

फोटो कॅप्शन, लॅक्झम्बर्ग : एन्सम्बर्गच्या न्यू कॅसलमध्ये मारियाना मॅजेरुस यांनी बर्फाळलेलं उद्यान टिपलं आहे.
line
CATHRYN BALDOCK

फोटो स्रोत, CATHRYN BALDOCK

फोटो कॅप्शन, कॅथरीन बाल्डॉक यांनी ही निळ्या कमळांची दुनिया कॅमेऱ्यात टिपली आहे.
line
JOHN GLOVER

फोटो स्रोत, JOHN GLOVER

फोटो कॅप्शन, इंग्लंड : पूर्व ससेक्समधली ही प्रसन्न सकाळ टिपली आहे जॉन ग्लोव्हर यांनी.
line
ALAN PRICE

फोटो स्रोत, ALAN PRICE

फोटो कॅप्शन, वेल्स : यूकेमधल्या वेल्स प्रांतात मादी ब्लॅकबर्डचं हे रूप अॅलन प्राईस यांनी टिपलं आहे.
line
MINGHUI YUAN

फोटो स्रोत, MINGHUI YUAN

फोटो कॅप्शन, चीन : हा सुरवंट आहे मिख्वैयी युआन यांनी वुखानमध्ये टिपलेला.
line
WILLIAM DORE

फोटो स्रोत, WILLIAM DORE

फोटो कॅप्शन, स्कॉटलंड : विलियम डोर यांनी धुकं आणि पाऊस असताना देवदार वृक्षांचं हे वेगळं रूप टिपलं.
line
FRANTISEK RERUCHA

फोटो स्रोत, FRANTISEK RERUCHA

फोटो कॅप्शन, सुकलेल्या फुलाचं हे सौंदर्य टिपलं आहे फ्रेन्टिशेक रेरुचा यांनी.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)