अवकाशातला बेस्ट फोटो : अॅस्ट्रॉनॉमी फोटोग्राफी ऑफ द ईअर 2017

या स्पर्धेतील विजेत्यांची नावं जाहीर झाली आहेत. अर्चोम मिरोनोवा यांच्या फोटोला पहिला क्रमांक मिळाला आहे. (सर्व फोटो सौजन्य : इनसाईट फोटोग्राफर ऑफ द ईअर)

तारे आणि नेब्युला

फोटो स्रोत, ARTEM MIRONOV

फोटो कॅप्शन, तारे आणि नेब्युला : इनसाईट अॅस्ट्रॉनॉमी फोटोग्राफी ऑफ द इअर 2017 मिरोनोवा यांनी नेब्युला या दोन्ही प्रकारात आणि सर्वसाधारण विजेतेपद मिळवले आहे. नामिबिया येथील गासबर्ग पर्वतानजीक एका शेतात हा फोटो घेतला आहे. या फोटोसाठी त्यांनी 3 रात्री घालवल्या. नेब्युला पृथ्वीपासून 400 प्रकाश वर्ष दूर असली तरी आपल्या सूर्यमालेपासून ती जवळच आहे. परीक्षक आणि खगोलशास्त्रज्ञ डॉ. मारेक कुकुला यांनी या फोटोंची स्तुती केली आहे.
स्टेलरडे

फोटो स्रोत, ANDRAS PAPP

फोटो कॅप्शन, आपण दिवस 24 तासांत मोजतो. पण प्रत्यक्षात पृथ्वीला स्वतः च्या कला भोवती फिरण्यासाठी 23 तास, 56 मिनिटं आणि 4 सेकंद लागतात. याला साईडरीअल डे किंवा स्टेलरडे म्हणतात. अंड्रास पाप यांनी एका 'स्टेलर डे'मधील ताऱ्यांच्या परिक्रमणेचे फोटो टीपले आहेत. या फोटोला दुसरा क्रमांक मिळाला.
औरोरी

फोटो स्रोत, MIKKEL BEITER

फोटो कॅप्शन, औरोरीः गेल्या ऑक्टोबरमध्ये मिकेल बीटर यांनी समुद्राच्या लाठा काठावर येताना निरीक्षण केलं. त्यावेळी जवळच्या पर्वताच्यामागून येणाऱ्या ढग येत असताना या औराचा फोटो घेता आला. रात्रीच्या आकाशातील हा फोटो स्टॉकन्स येथे घेतलेला आहे. या प्रकारतील हा विजयी फोटो ठरला.
नॉदर्न लाईट्स

फोटो स्रोत, KAMIL NUREEV

फोटो कॅप्शन, कमिल नुरिव्ह यांनी सैबेरियातील जंगलात हा नॉदर्न लाईट्सचा फोटो टीपला आहे.
गॅलेक्जी

फोटो स्रोत, OLEG BRYZGALOV

फोटो कॅप्शन, गॅलेक्जीः ऑलिक ब्रुझगवा यांनी घेतलेला मिझिअर 63 या गॅलेक्जीचा हा फोटो या प्रकारात विजयी ठरला. या गॅलक्जीमधील ताऱ्यांचे फोटो घेणे कठीण समजले जाते. बल्गेरियातील रोझेन ऑब्जरव्हेटरी येथून हा फोटो घेता आला आहे.
गॅलेक्जी

फोटो स्रोत, BERNARD MILLER

फोटो कॅप्शन, बेरनार्ड मिलर यांनी घेतलेला एनजीएस 7371 या गॅलेक्जीचा हा फोटो. ही गॅलेक्जी पृथ्वीपासून 4 कोटी प्रकाश वर्ष दूर आहे.
चंद्र

फोटो स्रोत, LASZLO FRANCSICS

फोटो कॅप्शन, आपला चंद्रः लाझलो फ्रान्सिक्स यांनी घेतलेल्या आपल्या चंद्राच्या पृष्ठभागाच हा फोटो चंद्र नव्या रुपात दाखवतो. चंद्रावरील टायको विवरचा हा फोटो या प्रकारात विजयी ठरला.
चंद्र

फोटो स्रोत, JORDI DELPEIX BORRELL

फोटो कॅप्शन, चंद्राचा हा फोटो जोर्डी डेलपिक्स बोरेल यांनी घेतला आहे. चंद्राचा हा क्लोजअप फोटो आहे. चंद्रावरील विवर आणि मैदान यांची शृखंला यात दिसते. या प्रकारातील दुसरा क्रमांक या फोटोला मिळला.
सूर्य

फोटो स्रोत, ALEXANDRA HART

फोटो कॅप्शन, सूर्य : 9 मे 2016 ला सूर्य आणि पृथ्वी यांच्यातून बुध ग्रह जात असतानाचा हा फोटो घेतला आहे, अलेक्झांड्रा हार्ट यांनी घेतलेला हा या प्रकारातील विजेते छायाचित्र.
सूर्य

फोटो स्रोत, ERIC TOOPS

फोटो कॅप्शन, एरिक टूप्स यांनी सूर्याच्या कडेचा टिपलेला हा फोटो. यात सौरडाग ही दिसतात.
मनुष्य आणि अवकाश

फोटो स्रोत, YURI ZVEZDNY

फोटो कॅप्शन, मनुष्य आणि अवकाश : युरी झेव्हेडनि यांनी आकाशगंगा पाहणाऱ्या एका व्यक्तीचा घेतलेला हा फोटो. अर्जेंटिना येथील लॉस ग्लॅसेअर्स नॅशनल पार्क येथे घेतलेला हा फोटो या प्रकारात विजयी ठरला.
मनुष्य आणि अवकाश

फोटो स्रोत, KURT LAWSON

फोटो कॅप्शन, कर्ट लॉसन यांनी त्यांच्या सहकारी फोटोग्राफरच्या सहकार्याने घेतलेला हा फोटो. कॅलिफोर्निया येथील माऊंट वॉट्किन्स यांनी घेतलेला हा फोटो. कॅमेरा 'लाँग एक्सपोजर'ला ठेऊन हा फोटो घेण्यात आला आहे. हा फोटो घेताना एकजण केबल रुटने या खडकावर गेला. त्याने सोबत नेलेल्या हेडलॅंपच्या उजेडाचा हा मनोहारी फोटो.
ग्रह, धूमकेतू आणि अशनी

फोटो स्रोत, ROGER HUTCHINSON

फोटो कॅप्शन, ग्रह, धूमकेतू आणि अशनी : रॉजर हटचिसन यांनी घेतलेली शुक्राची ही कंपोजिट इमेज. पहिला फोटो 25 सप्टेंबर 2016 चा असून त्यात शुक्र 86.6 टक्के प्रकाशित दिसतो. तर सहा महिन्यानंतरच्या फोटोत शुक्र 1 टक्के प्रकाशित दिसतो.
ग्रह, धूमकेतू आणि अशनी

फोटो स्रोत, TUNÇ TEZEL

फोटो कॅप्शन, रात्रीच्या अकाशातील मंगळ आणि शनी यांच्या कक्षांचा हा फोटो घेतला आहे, टंक टुझेल यांनी.
स्कायस्केप

फोटो स्रोत, HAITONG YU

फोटो कॅप्शन, स्कायस्केप : चीन येथील नॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल ऑब्जर्व्हेट्री येथे हैटाँग यू यांनी घेतलेला आकाशगंगेचा हा फोटो.
स्कायस्केप

फोटो स्रोत, ZHONG WU

फोटो कॅप्शन, चीन येथील प्रिन्स स्नो माऊंटिन येथे झोंग ऊ यांनी घेतलेला हा फोटो.