सोनू निगमला धक्काबुक्की, शिवेसेनेच्या आमदारपुत्राविरुद्ध गुन्हा दाखल

सोनू निगम

फोटो स्रोत, Getty Images

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका म्युझिक कॉन्सर्टनंतर प्रसिद्ध गायक सोनू निगमला धक्काबुक्की केल्याप्रकरणी एका आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनू निगमने दाखल केलेल्या तक्रारीनंतर चेंबूर पोलिस स्थानकात स्वपनील फातर्फेकरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

स्वप्नील शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आमदार प्रकाश फातर्फेकर यांचा मुलगा आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील यांनी भारतीय दंडसंहितेच्या कलम 323, 341 आणि 337 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान सोनू निगमच्या फॅन्सने त्याच्यासोबत सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात धक्काबुक्की केली.

ही घटना सोमवारी (20 फेब्रुवारी) रात्री 11 वाजता घडली. सोनू निगम मुंबईतल्या चेंबूरच्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी आला होता, तेव्हा हा प्रकार घडला.

एका पोलास अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं की, कार्यक्रम संपल्यानंतर सोनू निगम जेव्हा जात होते, तेव्हा फॅन्सचा एक ग्रुप सोनू निगमच्या दिशेने आला. त्यांच्या स्टाफने या गटाला अडविण्याचाही प्रयत्न केला होता.

सोनू निगमने या सगळ्या घटनेबद्दल एएनआय या वृत्तसंस्थेशसोबत बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार सोनू निगमने म्हटलं की, "कॉन्सर्टनंतर मी स्टेजवरून उतरत होतो, तेव्हा स्वप्नील प्रकाश नावाच्या एका व्यक्तीने मला पकडलं. त्याने माझ्या मदतीसाठी आलेल्या हरी आणि रब्बानी यांनाही धक्का दिला. मी पायऱ्यांवर कोसळलो. मी यासंबंधी तक्रारही दाखल केली आहे. लोकांनी जबरदस्तीने सेल्फी काढण्याबद्दल तसंच झटापट न करण्याबद्दल विचार करावा."

सोनू निगमच्या तक्रारीवर मुंबई पोलिसांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

एएनआयच्या मते झोन 6चे डीसीपी हेमराज सिंह राजपूत यांनी म्हटलं, "सोनू निगम जेव्हा स्टेजवरून उतरत होते, तेव्हा स्वप्नील नावाच्या एका माणसाने त्यांना पकडलं. जेव्हा सोनू निगम यांनी नकार दिला, तेव्हा त्याने आणि दोन लोकांनी त्यांना पायऱ्यांवरून धक्का दिला. यांपैकी एका व्यक्तीलाही दुखापत झाली आहे."

पोलिसांनी एएनआयशी बोलताना पुढे म्हटलं, "सोनू निगमशी जे बोलणं झालं, त्यावरून तरी असं वाटतंय की हा प्रकार हेतूपुरस्सर करण्यात आला नाही. हे एका व्यक्तीचं काम आहे. पण स्वयंसेवकांनी हे सगळं प्रकरण सांभाळून घेतलं. एफआयआरमध्ये केवळ एकाच व्यक्तीचं नाव आहे. आरोपी गायकाला केवळ फोटो काढण्यासाठीच अडवत होता, एवढंच यातून दिसतयं."

सोनू निगम प्रसिद्ध गायक आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. अनेक प्रतिष्ठित पुरस्कांरांनी त्यांना गौरविण्यात आलं आहे.

सोनू निगम यापूर्वी वेगवेगळ्या विषयांवर घेतलेल्या भूमिकांमधून चर्चेत आला होता.

नेपोटिझमबद्दल घेतलेली भूमिका

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर चर्चा सुरू झाली होती.

त्यावेळी सोनू निगमने म्युझिक इंडस्ट्रीमधील गटबाजी संपली नाही तर या क्षेत्रातूनही आत्महत्येची बातमी येऊ शकते, असं म्हटलं होतं. त्याने एक व्हीडिओ करून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.

सोनू निगम

फोटो स्रोत, Getty Images

साडेसात मिनिटांच्या व्हीडिओमध्ये सोनूने म्हटलं होतं की, गेल्या काही दिवसांपासून माझा मूड चांगला नसल्यामुळे मी व्हीडिओ केला नाही, सगळा भारत तणावाखाली आहे. सुशांत सिंह राजपूत गेल्यामुळे मानसिक आणि भावनिक ताण आला होता. एका तरुणाचा असा मृत्यू पाहिल्यामुळे दुःख होणं साहजिकच आहे.

माझ्या मुलाने भारतात काम करू नये

माझ्या मुलाला मी गायक करणार नाही. किमान भारतात तरी त्याने काम करू नये अशी माझी इच्छा आहे, असं मत गायक सोनू निगमने व्यक्त केलं आहे.

सोनू निगमच्या एका म्युझिक अल्बम रिलीजच्या वेळी त्याने हे विधान केलं होतं.

"खरं सांगायचं तर त्याने व्यवसायिक गायक होऊ नये अशी माझी इच्छा आहे. अन् व्हायचंच असेल तर त्याने भारतात काम करू नये असं वाटतं. तो भारतात राहात नाही तो सध्या दुबईमध्ये आहे. त्याने तिथंच करिअर करावं असं वाटतं. त्याला गाण्याची आवड आहे. तो देखील खूप छान गातो. पण त्याला गाण्यापेक्षा अधिक गेमिंग करायला आवडतं. मला वाटतं त्याने आपलं करिअर निवडलं आहे," असं सोनूने म्हटलं आहे.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)