जया बच्चन नव्याला म्हणाल्या, 'जर तुला लग्नाशिवाय मूल झालं तर माझी काहीच हरकत नाही'

फोटो स्रोत, Instagram
सध्या समाजवादी पार्टीच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्या जया बच्चन यांचे एक वाक्य सगळीकडे गाजत आहे. त्यांची नात नव्या नंदा नवेलीसोबत केलेल्या एका पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी हे वाक्य म्हटल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे.
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही 'व्हॉट द हेल नव्या' हा पॉडकास्ट चालवते. त्या पॉडकास्टमध्ये नव्याची आई श्वेता नंदा, जया बच्चन या सहभागी झाल्या.
विषय होता 'मॉडर्न लव्ह अॅंड रोमान्स.' या विषयावर तिघींच्या हलक्या फुलक्या स्वरूपाच्या गप्पा सुरू असताना जया बच्चन यांनी आपली भूमिका मांडली.
आमच्या काळात नातेसंबंधातील प्रयोगांना वाव नव्हता. नातं जपण्यासाठी तडजोडी कराव्या लागायच्या, तुमच्या काळात तुम्ही हे करू शकता, असं जया बच्चन म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, "की अनेक जण या बोलण्यावर नाक मुरडू शकतात आणि माझ्याकडून ही गोष्ट आली त्यामुळे तर त्यावर गदारोळही होऊ शकतो. पण मला असं वाटतं की नातं टिकण्यासाठी शारीरिक आकर्षण आणि अनुरूपता या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. आमच्या काळात आम्ही प्रयोग करू शकत नव्हतो. पण आताची पिढी मात्र हे करत आहे, आणि त्यांनी का करू नये?"
"नातं दीर्घकाळ टिकावं यासाठीर शारीरिक आकर्षण आवश्यक आहे. तसं नसेल तर नातं फार काळ टिकू शकत नाही. केवळ प्रेम, खुली हवा आणि तडजोडीवर नातं टिकू शकत नाही."

जया बच्चन पुढे म्हणाल्या की "आमच्या काळात तर आम्ही हा विचार देखील करू शकत नव्हतो. श्वेताच्याही काळात होऊ शकत नव्हता पण नव्याची पिढी वेगळी आहे."
"नव्या पिढीला आपल्या शारीरिक नात्यांबद्दल एक प्रकारची अपराधीपणाची भावना आलेली देखील मी पाहते. तसं वाटण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हाला वाटत असेल की नातं टिकवण्यासाठी शारीरिक संबंध आवश्यक आहेत आणि ते झाले तर त्यासाठी अपराधीपणाची भावना बाळगण्याची गरज नाही. हे तुमच्यावर अवलंबून आहे," जया बच्चन म्हणाल्या.

फोटो स्रोत, NAvya naveli
पुढे त्या म्हणाल्या, की "या गोष्टींकडे मी अगदी वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहते. सध्याच्या प्रेमसंबंधांमध्ये भावनेचा ओलावा दिसत नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या जिवलग मित्र किंवा मैत्रिणीशी लग्न करायला हवं."
"जर मुलीला एखादा चांगला मित्र असेल तर तिने म्हणायला हवं की मला तू आवडतोस, मला तुझ्यासोबत मूल हवं आहे. मला वाटतं तू चांगला आहेस आणि चल आपण लग्न करूया. कारण समाजही तेच म्हणतो."
पुढे त्या नव्याला म्हणाल्या "जर तुला लग्नाशिवाय मूल झालं तर माझी काही हरकत नाही. काहीच हरकत नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








