You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC Marathi : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख, खास तुमच्यासाठी..
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी काळजी नको. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख खास तुमच्यासाठी..
1. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनात गाजले 'हे' 5 मुद्दे
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेलं बंड, त्या बंडाला 50 आमदारांनी दिलेली साथ, त्यातून घडलेल्या राजकीय नाट्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार दीड महिन्यापूर्वी स्थापन झालं.
या स्थापनेनंतर महिनाभरांनंतर शपथविधी झाला आणि 14 ऑगस्टला मंत्र्यांचं खातेवाटप करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांत 17 ऑगस्टला विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं.
शिंदे फडणवीस सरकारचं हे पहीलं अधिवेशन असल्यामुळे या अधिवेशनात महाविकास आघाडी विरोधक म्हणून कसं सरकारला धारेवर धरणार? आणि त्या सत्ताधाऱ्यांमधला समन्वय कसा असेल? याबाबत सगळ्याचं लक्ष लागलं होतं. मग शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन कसं झालं?
2. NDTV आणि अदानी समुह व्यवहार : वाचा संपूर्ण घटनाक्रम
अदानी ग्रुप ने एनडीटीव्ही मध्ये 29 टक्के शेअर घेतल्याच्या प्रकरणात प्रश्नोत्तरांचा सिलसिला अद्यापही थांबलेला नाही. 25 ऑगस्टला एनडीटीव्हीने संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि एक जाहीर निवेदन दिलं होतं की सेबीच्या एका जुन्या निर्णयामुळे अदानी एनडीटीव्हीमधले शेअर खरेदी करू शकत नाही.
एनडीटीव्हीचे संस्थापक राधिका आणि प्रणॉय रॉय यांच्यावर 2020 पासून शेअर खरेदी करण्यासाठी आणि विकण्यासाठी बंदी घातली आहे.
त्यामुळे ते लोक अदानी समूह ते शेअर्स ट्रान्सफर करू शकणार नाही. त्याच आधारे अदानी एनडीटीव्हीवर ताबा मिळवू पाहत होते.
ही सगळी प्रक्रिया एनडीटीव्हीवर अदानी समुहाने ताबा मिळवू नये यासाठीचे प्रयत्न आहे. आता अदानी ग्रुपने आणखी एक ताजं निवेदन जारी केलं आहे. काय आहे हे प्रकरण, वाचा संपूर्ण घटनाक्रम..
3. टोमॅटो फ्लू: 7 प्रश्न आणि त्यांची उत्तंर, लहान मुलांना होणारा हा आजार नेमका काय आहे?
देशभरात गेल्याकाही दिवसांपासून 'टॉमेटो फ्लू'ची जोरदार चर्चा सुरू आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आजाराचा आणि टॉमेटोचा काही संबंध नाही.
लहान मुलांना होणाऱ्या या आजारात, अंगावर लाल रंगाचे पुरळ किंवा फोड उठतात. हे फोड हळूहळू वाढत जातात. केरळमध्ये या आजाराला 'तक्काली पनी' म्हणतात. ज्याचा इंग्रजीत अर्थ होतो 'टॉमेटो फ्लू'.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, 'टॉमेटो फ्लू' काही वेगळा आजार नाही. लहान मुलांना विषाणूसंसर्गामुळे होणारा 'हॅंड फूट माऊथ' (HFMD) आजार आहे.
मुंबईच्या सर जे.जे.रुग्णालयाच्या अधीष्ठाता आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. पल्लवी सापळे म्हणतात, "हॅंड फूट माऊथ' सिझनल आजार आहे. काही दिवसात आपोआप बरा होतो." त्यामुळे घाबरून जाण्यचं कारण नाही.
'टॉमेटो फ्लू' किंवा 'हॅंड फूट माऊथ' आजार नेमका काय आहे? आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
4. हृतिक रोशन-सैफ अली खानचा सिनेमा बॉलिवूडसाठी महत्त्वाचा का आहे?
हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला विक्रम वेधा चित्रपट येत्या 30 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचा टीझर बुधवारी (24 ऑगस्ट) प्रदर्शित झाला. त्यानंतर सोशल मीडियावर विक्रम वेधाची चर्चा सुरू झाली आहे.
विक्रम वेधा हा चित्रपट याच नावाच्या मूळ तमीळ चित्रपटाचा रिमेक आहे. तमीळ विक्रम वेधा चित्रपट 21 जुलै 2017 रोजी केवळ तमीळ भाषेत प्रदर्शित झाला होता. केवळ 11 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तब्बल 70 कोटी रुपयांचा गल्ला केला होता.
त्यामुळे सर्वांचं लक्ष या चित्रपटाकडे लागलं आहे. पण हृतिक आणि सैफचा हा चित्रपट बॉलिवूडसाठी इतका महत्त्वाचा का आहे?
5. रशिया युक्रेन युद्धाची सहा महिन्यानंतर काय परिस्थिती आहे?
रशिया युक्रेन युद्ध सुरू होऊन सहा महिने झालेत. 24 फेब्रुवारीला टीव्हीवर दिलेल्या एका संदेशात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या डोनबास भागात हल्ला करण्याची घोषणा केली. त्याच वेळी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने ही कारवाई थांबवण्याचा आग्रह केला होता.
युक्रेनची राजधानी कीव्ह च्या आकाशात सायरन ऐकू येत होते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्सिकी यांनी इशारा दिला, "कोणी आमची जमीन, आमचं स्वातंत्र्य, आमचं आयुष्य आमच्यापासून हिरावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमचं संरक्षण करू."
हाच तो क्षण होता जेव्हा इथल्या लोकांचं आयुष्य नेहमीसाठी बदललं.
सहा महिन्यांनंतर युद्ध संपायची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत, आपण सहा ग्राफिक्सच्या माध्यमातून या युद्धाचा सहा महिन्यानंतर काय परिणाम झाला आहे ते पाहणार आहोत.
रशियाने कोणत्या भागावर ताबा मिळवला ते किती लोक मारली गेली, स्थलांतरित झाली या सगळ्या बाबींवर आपण प्रकाश टाकणार आहोत.
पाहा बीबीसी मराठीचे व्हीडिओ
भारतीय अर्थव्यवस्थेतील GST ची 5 वर्षं, कोणाचा फायदा? कोणाचं नुकसान?
आदित्य ठाकरेंच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणतात...
अख्खं घरच या माणसानं उचलून दुसरीकडे नेलं...
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)