सेक्स लाईफ बिघडतेय? तुमचं लैंगिक जीवन सुधारण्यासाठी या 7 टिप्स वापरून पाहा

फोटो स्रोत, Getty Images
सेक्स हे व्यक्तीच्या हार्मोनवर चालणारे शारीरिक काम आहे. जे वंश वाढवण्याचे काम करते. परंतु हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की लैंगिक समाधान व्यक्तीच्या एकूण मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्याशी निगडित असते.
कामोत्तेजनामुळे ऑक्सिटोसिन हार्मोनची वाढ येतो, यामुळे तुमचा मूड सुधारतो. प्रेम, उत्साह आणि कोमलता ते उत्कट इच्छा, चिंता आणि निराशेपर्यंत भिन्न, फक्त सेक्स हा शब्द भावनांचा कॅलिडोस्कोप निर्माण करू शकतो.
जर काम, मानसिक संतुलन आणि तणाव यासारख्या कारणांमुळे जर सेक्स करणे तुमच्यासाठी एक अवघड काम बनले असेल, तर या सोप्या टिप्स तुम्हाला तुमच्या नीरस लैंगिक जीवनात चांगले बदल घडविण्यास मदत करतील. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.
1) मोकळ्या मनाने वागा-
तुमचे स्वतःचे शरीर आणि लैंगिकता एकट्याने किंवा तुमच्या जोडीदारासोबत एक्सप्लोर करा.
कारण हे तुम्हाला तुमच्या आनंदाचे मुद्दे आणि इच्छांबद्दल जाणीव करून देईल.
तुम्हाला बेडवर अधिक कल्पक व्हायचे असेल, तर तुम्ही वेगवेगळ्या पोझिशन्स, खेळणी आणि अगदी रोल प्ले यासारख्या नवीन कल्पना शोधण्याचा विचार करू शकता.

फोटो स्रोत, Getty Images
2) डर्टी टॉक करण्याचा प्रयत्न करा-
आपल्या शरीराचा सर्वात लैंगिक भाग हा मेंदू आहे कारण लैंगिक इच्छेची सुरुवात तिथून होते. त्यामुळे 'डर्टी टॉक' किंवा सेक्सबद्दल बोलणे किंवा अश्लील बोलणे, खूप उत्तेजित करणारे आहे.
घाणेरड्या शब्दांवर किंवा चर्चेच्या विषयावरील व्यक्तीची प्रतिक्रिया मेंदूच्या हायपोथालेमस आणि अमिग्डावर अवलंबून असते, परंतु पुरुष आणि स्त्रियांमध्ये ते वेगवेगळे असते.
3) पॉप पील-
वियाग्रा सारख्या प्रिस्क्रिप्शन गोळ्या सेक्स संबंधातील कोणत्याही समस्यांसाठी प्रथम श्रेणीचा उपचार आहेत आणि त्या खूप प्रभावी असू शकतात.
तुमचे डॉक्टर किंवा यूरोलॉजिस्ट ती लिहून देऊ शकतात. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
4) फोरप्लेचे महत्त्व समजून घ्या-
काहीवेळा सेक्स स्क्रिप्टेड वाटू शकतो जसे की तुम्ही A कडून B कडून C कडे वेगाने जात आहात.
संभोगात जाण्यापूर्वी घाई करू नका आणि कामुकतेवर लक्ष केंद्रित करा. फोरप्ले हे दोघानांही सारखेच उत्तेजित करते.

फोटो स्रोत, Getty Images
5) मिसमॅच सेक्स ड्राइव्हची जुळवाजुळव-
जोडप्यांमध्ये मिसमॅच सेक्स ड्राइव्ह असणे सामान्य आहे. तसे असल्यास जोडप्यांनी लैंगिकदृष्ट्या त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे, याबद्दल स्पष्टपणे बोलणे आवश्यक आहे.
त्यांनी एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तडजोड करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.
6) धुम्रपान करू नका-
धूम्रपान पेरिफेरल व्हॅस्क्युलर आजारास कारणीभूत ठरते. हे पुरुषाचे जननेंद्रिय, क्लिटॉरिस आणि योनीच्या ऊतींमधील रक्तप्रवाहावर परिणाम करते.
याव्यतिरिक्त, धूम्रपान करणार्या स्त्रिया त्यांच्या नॉन-स्मोकिंग करणाऱ्या इतरांपेक्षा दोन वर्षे आधी रजोनिवृत्त होतात.
7) किगल व्यायाम करा-
पुरुष आणि स्त्रिया दोघेही त्यांच्या पेल्विक फ्लोर स्नायूंचा व्यायाम करून त्यांची लैंगिक फिटनेस सुधारू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
हे व्यायाम करताना तुम्ही लघवी थांबवण्याचा प्रयत्न करताना स्नायू घट्ट केले जातात तसे स्नायू घट्ट करा. दोन किंवा तीन सेकंद ताणून धरा आणि नंतर सोडा.
हे 10 वेळा करा. दिवसातून पाच वेळा हे करण्याचा प्रयत्न करा.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








