You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'माझ्या थडग्यावर पुरुषाच्या लिंगाचा मोठा स्टॅच्यू बसवा'
मेक्सिकोतील एका आजीने तिच्या मृत्यूपूर्वी नातवंडांसमोर एक विचित्र इच्छा बोलून दाखवली होती. तिने आपल्या नातवंडांना सांगितलं होतं की, माझ्या मृत्यूनंतर माझ्या थडग्यावर पुरुषाच्या लिंगाचा मोठा स्टॅच्यू बसवावा.
ही विचित्र इच्छा बोलून दाखवणाऱ्या आजीचं नाव आहे कॅटरिना ऑर्डुना पेरेझ.
आता तिच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी त्यांच्या आजीची इच्छा पूर्ण केली आहे. त्यांनी आजीच्या थडग्यावर साडेपाच फूट उंच आणि सुमारे 272 किलो वजनाचा पुरुषी लिंगाचा स्टॅच्यू बसवलाआहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, कॅटरिना ऑर्डुना पेरेझ या महिलेचं 20 जानेवारी 2021 रोजी वयाच्या 99 व्या वर्षी निधन झालं. तिच्या कुटुंबाने तिच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक स्मारक बनवलं आहे.
'व्हाइस' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत या महिलेचा नातू अलवारो मोटा लिमोन आपल्या आजीबद्दल सांगतो की, "ती उदार विचारसरणीची पुरस्कर्ती होती. विचार स्वातंत्र्याला न मानणारे मॅक्सिन लोकांनी बनवलेले आदर्श तिला मान्य नव्हते."
आजीच्या कुटुंबियांना माहीत होतं की तिला तिच्या थडग्यावर पुरुषी लिंग बसवण्याची इच्छा आहे. पण तिच्या मृत्यूपर्यंत कोणीच तिची इच्छा गांभीर्याने घेतली नाही. मात्र तिच्या मृत्यूनंतर तिचा नातू मोटा लिमोनने पुढाकार घेत तिच्या इच्छेबद्दल कुटुंबातील लोकांना सांगितलं आणि आपल्या आजीचं स्वप्न सत्यात उतरवण्याचा निर्णय घेतला.
या पुरुषी लिंगाचा स्टॅच्यू बनवण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी इसिड्रो लावोइग्नेट या इंजिनिअरला गाठलं. हा स्टॅच्यू बनवणारा इंजिनिअर सांगतो, पहिल्यांदा जेव्हा मला असं काहीतरी बनवायचं आहे असं सांगण्यात आलं तेव्हा तर मला ही चेष्टाच वाटली. कारण असा स्टॅच्यू शक्यतो कोणी बनवत नाही.
पण आजीचे कुटुंबिय आपल्या म्हणण्यावर अडून राहिले. शेवटी लावोइग्नेटने आपल्या 12 सहकाऱ्यांसह हे पुरुषी लिंग तयार केलं. यासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी लागला. 23 जुलै रोजी या स्टॅच्यूचं अनावरण झालं.
यावेळी मोटा लिमन यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं, 'या निर्णयामुळे आमच्या टीका होणार हे आम्हाला माहीत होतं म्हणून या टीकेसाठी आम्ही आधीच तयार होतो. 10 पैकी 7 लोकांनी या मूर्तीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं आहे. काही लोकांना ते चांगले वाटत नसेलही पण तरीही त्यांनी माझ्या आजीच्या शेवटच्या इच्छेचा आदर करावा.'
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)