मिसोप्रॉस्टल : पोटातील अल्सरसाठी शोधलेली गोळी गर्भपातासाठी कशी वापरली जाऊ लागली?

गर्भपात हा मुद्दा अनेक देशांमध्ये वादग्रस्त आहे. काहींसाठी हा महिलांचा अधिकार आहे तर काही जण हे दुष्कृत्य किंवा पाप मानतात. गर्भपाताला अनेक देशांमध्ये बंदी आहे. या मुद्याचा अनेक महिलांच्या आयुष्यावर थेट परिणाम होतो.

नको असलेल्या गर्भावस्थेपासून सुटका करून घेण्याच्या दोन पद्धती आहेत. गर्भपात किंवा औषधं देऊन शस्त्रक्रिया.

शस्त्रक्रिया करून गर्भ स्त्रीच्या गर्भाशयातून काढण्यात येतो. या पद्धतींमध्ये गर्भपात केला जातो किंवा मग प्रसृतीप्रक्रियेप्रमाणेच गर्भाशयचं मुख मोठं करून गर्भ काढला जातो.

दुसऱ्या पद्धतीत गर्भपातासाठी गोळ्या घेतात. यात दोन प्रकारच्या गोळ्यांचा समावेश असतो. एक असते मिफेप्रिस्टन आणि दुसरी असते मिसोप्रॉस्टल. याला म्हणतात वैद्यकीय गर्भपता.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, मिफेप्रिस्टन उपलब्ध नसेल तरच मिसोप्रोस्टल घ्यावी.

पण, मिसोप्रोस्टल ही गर्भपतासाठी शोधलेली गोळी नव्हे. पोटातील अल्सरवर उपचार करण्यासाठी ही गोळी विकसित करण्यात आली. 1980 च्या दशकाच्या मध्यात ही गोळी बाजारात आली. त्यावेळी तिचे नाव सायटोटेक होते.

या गोळीचा इतर प्रकारेही वापर होऊ शकतो हे सर्वात आधी लॅटिन अमेरिकन स्त्रियांना समजले. या गोळीचा वापर गर्भपातासाठीही होऊ लागला.

पाहता पाहता हे नाव सर्वतोमुखी झाले

1980 च्या दशकात स्त्रियांना, विशेषतः मर्यादित स्रोत असलेल्या स्त्रियांना या उपयोगाचा शोध लागला. तिने मेक्सिकोमध्ये रिअॅलिटीज अँड चॅलेंजेस ऑफ मेडिकेशन अॅबॉर्शन इन मेक्सिको हे पुस्तक लिहिले

"ही माहिती अशीच पसरली. ही गोळी पोटाच्या अल्सरवरील उपचारांसाठी घेतली जाते. त्यामुळे ही तितकीशी महाग नाही..", असं मेक्सिकोमधल्या कॉलेजिओ डे ला फ्रंटेरा सर चे तज्ज्ञ सांगतात.

मिसोप्रोस्टल ही गोळी 1973 मध्ये सर्ल फार्मास्युटिकल्सने विकसित केली. पोटाच्या व आतड्यांशी संबंधित आजारांच्या उपचारांसाठी या गोळीचा शोध लावण्यात आला. गर्भपात हा या गोळीचा एक साइड इफेक्ट आहे, असे लवकरच लक्षात आले.

1980 च्या अखेरीस स्त्रिया ही गोळी वापरू लागल्या. ब्राझीलमध्ये गर्भपात हा गुन्हा समजला जातो. त्यामुळे, उतारा म्हणून स्त्रिया मिसोप्रॉस्टल घेऊ लागल्या. डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय या गोळ्या विकल्या जाऊ लागल्या.

1987 मध्ये फ्रान्समधील संशोधकांनी खास गर्भपातासाठी मिफेप्रिस्टन या गोळीचा शोध लावला. ही गोळी मिसोप्रॉस्टलसोबत घेतली जाते आणि गर्भस्त्राव होण्याची जोखीम कमी होत असल्याचे निदर्शनास आले.

डॉ. जॉर्जिना सांचेझ म्हणाल्या की, लॅटिन अमेरिकेतील स्त्रिया मिसोप्रॉस्टल मोठ्या प्रमाणावर वापरत होत्या. लॅटिन अमेरिकेतील बहुतेक देशांमध्ये गर्भपातावर बंदी आहे. "फ्रान्समध्ये मिफेप्रिस्टनचा शोध लागण्याआदी लॅटिन अमेरिकेतील स्त्रियांना मिसोप्रॉस्टल ही गोळी किती प्रमाणात घ्यावी याचा शोध लागला होता. पोटातील अल्सरसाठी या गोळीचा शोध लावण्यात आला होता आणि ही गोळी मोठ्या प्रमाणात वापरली जात होती.

हे औषध कसे काम करते?

यासाठी शस्त्रक्रिया लागत नाही. गर्भपात घरच्या घरी केला जाऊ शकतो. मिफेप्रिस्टन आणि मिसोप्रॉस्टल या गोळ्या एकत्रितपणे घेतल्या तर गर्भस्त्राव (मिसकॅरेज) होऊ शकतो.

आधी मिफेस्ट्रोन घ्यायची. ही गोळी शरीरातील प्रोजेस्टरॉन हा हार्मोन ब्लॉक करते, जो गर्भधारणा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असतो.

त्यानंतर 24 ते 48 तासांमध्ये मिसोप्रॉस्टल घेतली जाते. ही गोळी घेतल्यानंतर गर्भाशयातील अस्तर तुटते. वेदना होतात आणि रक्तस्त्राव होतो आणि गर्भाशय रिकामे होते. जागतिक आरोग्य संघटना सागते की जेव्हा मिफेप्रिस्टन उपलब्ध नसते तेव्हा फक्त मिसेप्रॉस्टल घेतलेली चालू शकते.

डॉ. जॉर्जिना सांचेझ म्हणतात की, ज्या देशांमध्ये गर्भपात बेकायदेशीर आहे तिथे मिफेप्रिस्टनवर बंदी आहे. पण, मिसोप्रॉस्टल मात्र मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. अगदी ज्या देशात मिफेप्रिस्टन कायदेशीर आहे, तिथेही मिसोप्रॉस्टलचा जास्त वापर होत असल्याचं त्या सांगतात.

"मिफेप्रिस्टन ही खास गर्भपातासाठी विकसित करण्यात आलेली असल्याने जिथे गर्भपातावर बंदी आहे तिथे ही गोळी मिळणे कठीण असते", असे डॉ. जॉर्जिना सांचेझ यांनी सांगितले.

'ही क्रांतिकारी आहे'

ज्या देशांमध्ये गर्भपाताला कायद्याने परवानगी आहे तिथे गर्भपात हा बहुधा औषधांच्या माध्यमातून केला जातो. शस्त्रक्रिया करून गर्भपात करणे क्वचितच घडते. उदा. अमेरिकेत निम्म्याहून अधिक गर्भपात हे वैद्यकीय गर्भपात म्हणजे गोळ्या घेऊन केलेले गर्भपात असतात.

अनेक अभ्यासांमध्ये असेही दिसून आले आहे की, वैद्यकीय गर्भपाताचा मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने स्त्रियांकडून स्वेच्छेने केल्या जाणाऱ्या गर्भपातांच्या संख्येत वाढ झाली आहे आणि गर्भस्त्राव आणि शस्त्रक्रियेने केल्या जाणाऱ्या गर्भपातांची संख्या बरीच कमी झाली आहे.

गर्भपात कायदेशीर करणे आणि त्यासाठी अनेक औषधे उपलब्ध करून देणे आणि घरच्या घरी सुरक्षित गर्भपात करू शकल्याने मृत्यू व आरोग्याच्या समस्या कमी होतील," असं मेक्सिकोमधल्या कॉलेजिओ डे ला फ्रंटेरा सर चे तज्ज्ञ सांगतात.

गर्भपात करण्याचा निर्णय पुढे ढकलण्याचं प्रमाण याने कमी झालंच पण गर्भधारणा झाल्या झाल्या गर्भपात करण्यासाठी या गोळीसारख्या वैद्यकीय गर्भपात पर्यायांची मदत झाली.

डॉ. जॉर्जिना सांचेझ म्हणाल्या की, वैद्यकीय गर्भपाताचा व्यापक प्रमाणावर वापर होऊ लागल्याने गर्भपात ही बहुतेक स्त्रियांसाठी डॉक्टरविना करता येण्याजोगी खासगी बाब झाली.

"आधुनिक काळातील वैद्यकीय गर्भपाताबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांना हॉस्पिटलमध्ये जावे लागत नाही. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राच्या महत्त्वाला आणि सरकारच्या वर्चस्वाला मर्यादा येते. हे औषध कसे वापरावे याचीही माहिती उपलब्ध आहे.", असेही त्या म्हणाल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)