Delhi Fire: 27 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम

दिल्ली आग

मी पावणेसहा वाजता शेवटदा पाहिलं. तेव्हापासून ती बेपत्ता आहे. असं इस्माईल खान यांनी सांगितलं.

दिल्लीच्या मुंडका भागात एका तीनमजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी (13 मे) सायंकाळी घडली.

या आगीत आगीत किमान 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्ली आऊटर डिस्ट्रीक्ट पोलीस उपायुक्त समीर शर्मा यांनी बीबीसीशी बोलताना दिली.

बीबीसी प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांनी घटनास्थळी जाऊन या घटनेचा आढावा घेतला

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

इस्माईल खान यांची बहीण या आग लागलेल्या इमारतीत होती. शुक्रवारी संध्याकाळी पावणेपाच च्या सुमारास त्यांच्या बहिणीचा त्यांना फोन आला. बीबीसी शी बोलताना ते म्हणाले, "पंधरा मिनिटात मी तिथे पोहोचलो. ती मला दिसली. सगळीकडे आग लागली होती. थोडाच भाग आगीपासून बचावला होता. मी तिला सांगितलं की उडी मार, ती धावत सुटली, मी तिला वाचवायला गेलो तेव्हा मला हाताला काच लागली. मग आम्ही तीन चार मुलं तिथे गेलो. माझी बहीण अजुनही सापडली नाही. मला फार काळजी वाटतेय, तिचा फोन अजुनही बंद आहे. प्रशासनाने कोणतीही माहिती दिलेली नाही."

इस्माईल खान अजुनही त्यांच्या बहिणीचा शोध घेत आहेत.

सध्या या इमारतीची आग विझवण्यात प्रशासनाला यश आलं असून दिल्लीच्या संजय गांधी आणि दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत, असं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं. .

दिल्लीचे उप मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या इमारतीतून एकूण 27 मृतदेह प्राप्त झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

सुरुवातीला याठिकाणी 14 जणांचा बळी गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. पण बचाव कार्यादरम्यान मृतांची संख्या अंदाजापेक्षा दुपटीने जास्त असल्याचं लक्षात आलं.

बहुतांश मृतदेह इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून प्राप्त झाले आहेत. सध्या संपूर्ण इमारतीवर अग्निशमन दलाचं नियंत्रण असून पहिल्या मजल्यावर लागलेली आग विझवण्यात यश आलं आहे, अशी माहिती अग्निशमन दलातील एका कर्मचाऱ्याने दिली.

घटनास्थळी NDRF चं पथकही तैनात करण्यात आलेलं आहे.

दिल्ली आग

फोटो स्रोत, DILNAWAZ PASHA/BBC

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदींनी याबाबत ट्वीट करताना लिहिलं, "दिल्लीत लागलेल्या भीषण आगीत अनेकांचा बळी गेल्याने मला अतीव दुःख झालं आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मीसुद्धा सहभागी आहे. जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं, अशी मी प्रार्थना करतो."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

पंतप्रधान मोदींनी आणखी एक ट्वीट करत आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या लोकांसाठी मदतनिधीची घोषणा केली. जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून पीएम नॅशनल रिलीफ फंडमधून प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल, असं मोदींनी सांगितलं.

रामनाथ कोविंद यांनीही आगीच्या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं.

ते म्हणाले, "दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळील आगीच्या या घटनेमुळे मला प्रचंड दुःख झालं आहे. कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींनी लवकर बरं व्हावं, अशी मी प्रार्थना करतो."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवर लिहिलं, "दिल्लीच्या मुंडकामध्ये घडलेल्या आगीच्या घटनेमुळी मी प्रचंड दुःखी आहे. मी येथील संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. NDRF सुद्धा घटनास्थळी लवकरच दाखल होईल. लोकांना तिथून सुरक्षित बाहेर काढणं आणि जखमींवर तातडीने उपचार करणं, याला आमचं प्राधान्य राहील."

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या घटनेबाबत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

ट्विटरवर ते म्हणाले, "या दुःखद घटनेबाबत मी दुःखी आहे. येथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात मी आहे. आपले धाडसी अग्निशमन कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा, लोकांचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. देव सर्वांचं भलं करो."

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सुमारे पावणेपाच वाजता मुंडका पोलीस ठाण्यात आगीची माहिती देण्यासाठी फोन आला होता. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मुंडका मेट्रो स्टेशनजवळच्या एका तीन मजली इमारतीला ही आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)