संजय राऊत यांचे वक्तव्य, 'नरेंद्र मोदी हे हिटलरला फॉलो करतात'

संजय राऊत

"नरेंद्र मोदी हे हिटलरप्रमाणे अनेक इव्हेंट करतात, त्यांच्या आणि हिटलरच्या प्रचारातही प्रचंड साम्य आहे. नरेंद्र मोदी हिटलरचा फॉलो करतात," असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई येथे शिवसेनेच्या सोशल मीडिया सैनिक मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात राऊत यांनी नरेंद्र मोदी तसंच भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर आक्रमक भाषेत टीका केली.

"हिटलरच्या आत्मचरित्रात त्याने राष्ट्रनिर्मितीत प्रपोगंडा आणि प्रचाराचं महत्त्व सांगितलं आहे. हिटलरप्रमाणे मोदी इव्हेंट्स फार करतात. खरंतर, नरेंद्र मोदी हिटलरला फॉलो करतात," असा आरोप राऊत यांनी केला.

"हिटलर सुरुवातीच्या काळात अत्यंत लोकप्रिय नेता होता. सध्या आपले पंतप्रधानही हिटलरच्याच प्रेमात आहेत. हिटलरचं कुणी कौतुक करत असेल तर त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा होऊ शकत नाही.

"हिटलर आणि त्याचा गोबेल्स यांच्यानुसार, एखादी गोष्ट लोकांना वारंवार सांगितली गेली तर ती खरी होऊ लागते. पण ती गोष्ट सोपी आणि मुद्देसुद पद्धतीने सांगितली पाहिजे. हा हिटलरचा प्रचाराचा फंडा होता," असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत

फोटो स्रोत, facebook

पण यादरम्यान मोदींवर टीका करत असताना बाळासाहेब ठाकरे यांनासुद्धा हिटलर प्रिय होता, याचा उल्लेखही संजय राऊत यांनी केला, हे विशेष.

यावेळी राऊत म्हणाले, "अल्बर्ट आईनस्टाईनचं एक वाक्य प्रसिद्ध आहे. जे खरं असतं, ते लोकप्रिय असतंच असं नाही आणि जे लोकप्रिय आहे, ते खरं असतंच असं नाही. त्याच पद्धतीचं वातावरण सध्या प्रसिद्धी क्षेत्रात आहे. चांगल्या बातमीला प्रसिद्धी मिळते असंच नाही."

"तुम्ही नैतिकता पाळणार नसाल, युद्धाचे नियम पाळणार नसाल, तर आम्हालाही तसं करण्याचा अधिकार आहे," असं राऊत म्हणाले.

"शिवसेना हा कायम तरुण विचारांना प्राधान्य देणारा पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे 84 वर्षांचं आयुष्य जगले. पण ते त्या वयापर्यंत तरुणांचेच नेते होते. त्यांनीच गरम रक्ताची पीढी राजकारणात आणली," असं राऊत म्हणाले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)