राज ठाकरेंना बेड्या ठोका आणि अटक करा - अबू आझमी

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राज ठाकरे

"राज ठाकरेंसारख्या लोकांना जनाधार नाही, ज्यांच्याकडे कोणतीही सीट नाहीये अशा नेत्याचं लोकांनी का ऐकायचं? राज्यात धार्मिक तेढ वाढविण्याचं काम मनसे प्रमुख राज ठाकरे करत आहेत. त्यांना तात्काळ अटक करा," अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली आहे.

त्यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर भव्य मेळावा घेतला. त्या सभेमध्ये बोलताना, राज ठाकरे यांनी मशिदीवरचे भोंगे खाली उतरवावेच लागतील, असं सांगितलं. त्याचबरोबर हे भोंगे काढले नाहीत तर त्याच्यासमोर स्पिकरवर हनुमान चालीसा दुप्पट आवाजात लावा असं त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हटलं होतं.

त्यानंतर राज्यात भोंगे विरुद्ध भोंगे असं चित्र निर्माण झालं. काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी भोंगे लावून त्यावर हनुमान चालीसा वाजवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई देखील केली. राज ठाकरे यांच्या विधानाचे पडसाद राज्यभर उमटताना पाहायला मिळाले. अनेक नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका केली.

अबू आझमी यांनी आज राज ठाकरे यांच्या विधानावर भाष्य करताना त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. "ज्या पक्षाला फार महत्त्व दिलं जात नाही. ज्यांना जनाधार नाही. अशा नेत्यांचं लोकांनी का ऐकावं? अशा नेत्यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करुन वातावरण अशांत करणं योग्य नाही. राज ठाकरे यांना अटक करुन जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी माझी मागणी आहे," असं अबू आझमी म्हणाले.

अबू आझमी

फोटो स्रोत, @abuazmisp

फोटो कॅप्शन, अबू आझमी

मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा

राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर मनसेतील काही मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी नाराजी दर्शवत राजीनामे दिले. त्यांच्यापैकीच एक अझरुद्दीन सय्यद आहेत. सय्यद हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष होते.

आपल्या राजीनामा पत्रात ते लिहितात, "मनसेला आज शेवटचा जय महाराष्ट्र. मी ज्या समाजातून येतो त्या समाजाबद्दल चुकीची भूमिका घेऊन ज्या पक्षाला सर्वस्व मानून आजपर्यंत काम केलं त्याच पक्षाच्या पक्षाध्यक्षांनी मला पक्ष सोडायला भाग पाडलं त्यांचे देखील आभार."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर मनसेतील अनेक मुस्लिम पदाधिकारी नाराज आहेत. या नाराजीतून माजिद शेख यांनी शाखा अध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा हा मनसे पक्षातला पहिला राजीनामा होता. पण त्यानंतर राजीनाम्याचं सत्र सुरू झालेलं आहे. पुण्यातील पदाधिकारी, शाखाप्रमुख वाहतूक सेनेचे पदाधिकारीही राजीनामा देत आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)