दलेर मेहंदीनं मेटाव्हर्समध्ये खरेदी केली 'बल्ले बल्ले लँड', हे मेटाव्हर्स आहे काय?

दलेर मेहंदी

फोटो स्रोत, Facebook/Daler Mehendi

प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीने मेटाव्हर्समध्ये जमीन खरेदी केलीय आणि जमिनीचं नाव 'बल्ले बल्ले लँड' असं ठेवलंय.

पार्टीनाईट या भारतीय मेटाव्हर्स प्लॅटफॉर्मवर व्हर्च्युअल जमीन खरेदी केली असून, दलेर मेहंदी तिथे स्टोअर उघडणार आहे आणि त्यावरून नॉन-फंजिबल टोकन्स (AFT) द्वारे सामानाची विक्री केली जाईल.

या जमिनीचं उद्घाटन होळीच्या दिवशी झालं. मेटाव्हर्सवर सादरीकरण करणारं दलेर मेहंदी पहिले भारतीय गायक आहेत.

दलेर मेहंदींनी 'बल्ले बल्ले लँड'बद्दल इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून सविस्तर माहिती दिलीय.

या जमिनीवर पुढे गाण्यांचे कार्यक्रमही होतील, अशी माहितीही दलेर मेहंदींनी दिलीय.

"भारतभूमीशी जोडलेला असल्या कारणानं दलेर मेहंदी पार्टीनाईटसाठी आपलं भारतीय मेटाव्हर्स जगासमोर लाँच करण्यासाठी अधिक उत्सुक आहे. हैदराबादस्थित गेम स्टुडिओ गॅमिट्रोनिक्सने या मेटाव्हर्सला गेमसह बनवलंय. अँड्रॉईड आणि विंडो अशा दोन्हींवर हे डाऊनलोड करता येईल."

पार्टीनाईट अत्यंत रंजक डिजिटल पॅरॅलल यूनिव्हर्स आहे. इथं तुम्ही मित्रांसह सहभागी होऊ शकता. किंबहुना, नव्या लोकांना भेटणं, पार्टीत सहभागी होणं, गेम खेळणं, खेळण्यायोग्य एनएफटी विकणं इत्यादी गोष्टी करू शकतात.

'मेटाव्हर्स' (Metaverse) काय आहे?

पाहणाऱ्या एखाद्याला कदाचित ही VR म्हणजेच व्हर्च्युअल रिएलिटी (Virtual Reality) ची सुधारित आवृत्ती वाटू शकेल. पण मेटाव्हर्स हे इंटरेनेटचं भविष्य असेल, असं काहींनी वाटतंय.

मेटाव्हर्स म्हणजे व्हर्च्युअल रिएलिटीद्वारे उभं करण्यात आलेलं असं एक जग जिथे तुमचा एक डिजिटल अवतार असेल आणि कम्प्युटरने निर्माण केलेल्या या जगाचा इतर युजर्ससोबत तुम्ही अनुभव घेऊ शकाल.

मेटाव्हर्स

फोटो स्रोत, Getty Images

थोडक्यात सांगायचं झालं तर 1980च्या दशकातल्या बोजड हँडसेट्सची जागा जशी आजच्या आधुनिक स्मार्टफोन्सनी घेतली तसंच काहीसं VR आणि मेटाव्हर्सबद्दल म्हणता येईल.

म्हणजे कॉम्प्युटरऐवजी एखादा हेडसेटवापरून तुम्ही या मेटाव्हर्सचा अनुभव घेऊ शकता. हा हेडसेट तुम्हाला सगळ्या प्रकारचे डिजीटल अनुभव असणाऱ्या एका व्हर्च्युअल वर्ल्ड म्हणजे आभासी जगताशी जोडेल.

सध्या व्हर्च्युएल रिएलिटी म्हणजेच VR चा वापर हा जास्त गेमिंगसाठी केला जातो. पण मेटाव्हर्स मात्र काम, टाईमपास, कॉन्सर्ट्स, सिनेमा किंवा नुसती मजामस्ती करायलाही वापरता येईल.

या मेटाव्हर्सची अजून नेमकी अशी एक व्याख्या नाही. पण यामध्ये तुमचं प्रतिनिधित्वं करणारा तुमचा एक 3D अवतार असेल, असं बहुतेकांना वाटतंय.

अचानक मेटाव्हर्सची चर्चा का सुरू आहे?

आभासी जग आणि ऑगमेंटेड रिएलिटी (augmented reality) याविषयीची चर्चा सुरूच असते.

ऑक्युलस क्वेस्ट 2 VR गेमिंग हेडसेट

फोटो स्रोत, Oculus

फोटो कॅप्शन, 2020च्या ख्रिसमस गिफ्ट्साठी ऑक्युलस क्वेस्ट 2 VR या गेमिंग हेडसेट्सना मोठी मागणी होती.

पण मोठ्या टेक कंपन्या आणि श्रीमंत गुंतवणूकदारांमध्ये सध्या या मेटाव्हर्सबद्दल प्रचंड उत्सुकता आहे आणि हेच जर इंटरनेटचं भविष्य असेल तर आपण त्यात मागे राहू नये, असा या सगळ्यांचा प्रयत्न आहे.

शिवाय VR वापरून सुरू असलेलं अॅडव्हान्स गेमिंग आणि कनेक्टिव्हिटीमध्ये होत असलेली सुधारणा यामुळे टेक्नॉलॉजीतल्या या नव्या पुढच्या टप्प्याच्या आपण अगदी जवळ असल्याचं म्हटलं जातंय.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)