वर्धा अपघात : 'आज काळीज फाटलं, त्यानं आभाळ गाठलं', आमदार बापाची अपघातात मृत्यू पावलेल्या मुलासाठी भावनिक पोस्ट

फोटो स्रोत, Instagram
वर्धा जिल्ह्यातील सेलसुराजवळ 24 जानेवारीच्या रात्री 'झायलो' कार नदीत कोसळली. या अपघातात एमबीबीएसच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.
यात भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचा अविष्कार रहांगडालेचाही समावेश होता.
विजय रहांगडाले गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार आहेत. अविष्कार रहांगडाले सावंगी मेघे मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते.

फोटो स्रोत, NITISH RAUT
विजय रहांगडाले यांनी मुलाच्या मृत्यूनंतर एक भावनिक पोस्ट फेसबुकवर शेयर केली आहे. त्यांनी लिहिलंय,
आज काळीज फाटलं,
त्यानं आकाश गाठलं;
अविष्कार आमचा हिरा,
होता आनंदाचा झरा;
डॉक्टर नव्हते खमारी गावात,
होती खंत आणि हुरहूर आमच्या मनात;
बापाचे स्वप्न पूर्ण करण्या,
गेला होता अविष्कार डॉक्टर बनण्या;
लागली कुणाची नजर,
आज दगडालाही फुटली पाझर;
गेला तरुण वयात सोडून,
केलेले सारे वादे तोडून;
तुझी आई आजही वाट पाही,
तिला तुझ्या डॉक्टर बनण्याची घाई;
कसे समझवू तिला,
तू परत येणार नाहीस मुला;
कुठे हरवलास पाखरा,
परत ये रे आमच्या लेकरा;
गेलास अविष्कार आम्हाला सोडून,
तुझ्यासाठी रंगविलेले सारे स्वप्न मोडून
आज आहे मातम सगळीकडे,
आई बाबा संगे सारा गाव ही रडे.
नेमकं काय घडलं?
सोमवारी (24 जानेवारी) रात्री दीड वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
सर्व मृत विद्यार्थी सावंगी येथेली मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसचे विद्यार्थी होते. यवतमाळहून वर्ध्याकडे परतताना हा अपघात झाला.
यापैकी 6 विद्यार्थी सावंगी मेघे होस्टेलला राहणारे होते. यातील एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते बाहेर गेले होते अशी माहिती सावंगी मेघे मेडिकल कॉलेजचे विशेष कार्यकारी अधिकारी उदय मेघे यांनी दिली.

फोटो स्रोत, NITESH RAUT
ते म्हणाले, "वाढदिवस साजरा करून लवकर परत येऊ अशी माहिती विद्यार्थांनी हॉस्टेल प्रशासनाला दिली होती. पण विद्यार्थी वेळेत आले नसल्याने आम्ही त्यांना आणि त्यांच्या पालकांना कळवले.
"आम्हाला रात्री 2.30 वाजताच्या सुमारास घटनेची माहिती मिळाली. यातील दोन विद्यार्थी MBBS शेवटच्या वर्षी होते, एक विद्यार्थी इंटर्न होता. या सर्व होतकरू विद्यार्थ्यांच्या मृत्यूची घटना दुर्दवी आहे."
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची मदत, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
खासदार रामदास तडस यांनी नुकतीच घटनास्थळी भेट दिली. या घटनेची चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
ही घटना दु:खद असून मृत पावलेल्या मुलांच्या कुटुंबाच्या आणि आमदार रहांगडाले यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








