Harbhajan Singh : हरभजन सिंगचा क्रिकेटला 'अलविदा', राजकारणात प्रवेशाची शक्यता

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय क्रिकेट संघातील फिरकी गोलंदाज हरभजन सिंह यानं क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. तशी घोषणाच हरभजन सिंहनं ट्विटरच्या माध्यमातून दिली.
काही दिवसांपूर्वीच हरभजन सिंह काँग्रेसचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांची भेट घेतली होती.
या भेटीचा फोटोही नवज्योत सिंह सिद्धू यांनी ट्विटरवर शेअर केला होता. या फोटोसह नवज्योतसिंह सिद्धू यांनी म्हटलं होतं की, "अनेक शक्यतांनी भरलेला फोटो."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
या ट्वीटनंतर असे अंदाज केले जाऊ लागले की, हरभजनसिंह राजकारणात प्रवेश करू शकतो.
2022 मध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नवज्योतसिंह सिद्धू यांच्यासोबतच्या भेटीला अनेक राजकीय अर्थ प्राप्त झाले होते.
3 जुलै 1980 रोजी पंजाबमधील जालंधर इथं जन्मलेल्या हरभजन सिंह यांनी भारतातर्फे 103 कसोटी सामने आणि 236 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
हरभजन सिंहने कसोटी क्रिकेटमध्ये 417 विकेट्स आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 269 विकेट्स घेतल्या आहेत.
भारतासाठी हरभजन सिंहने 28 टी-20 सामनेही खेळले आहेत. यात 25 विकेट्स त्याच्या नावावर आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये दोन शतकं हरभजनच्या नावावर आहेत.
1998 च्या मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात हरभजन सिंहनं कारकीर्दीतला पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याच वर्षी एप्रिल महिन्यात न्यूझीलंडविरोधात पहिला एकदिवसीय सामना खेळला होता.
2007 साली टी-20 विश्वचषकाच्या संघात, तर 2011 साली एकदिवसीय विश्वचषकाच्या संघात हरभजन सिंहचा समावेश होता.
IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या संघासाठी हरभजन सिंह खेळला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)