मलखान सिंग : चंबळ खोऱ्यातल्या 'मोस्ट वॉन्टेड' डाकूच्या शरणागतीची गोष्ट...

मलखान सिंग (समोर खाली बसलेले)

फोटो स्रोत, Prashant panjir

फोटो कॅप्शन, मलखान सिंग (समोर खाली बसलेले)

1980 च्या दशकाच्या सुरुवातीला फोटोग्राफर प्रशांत पंजीर मध्य प्रदेशात चंबळ परिसरात गेले होते. तिथं ते एका डोंगरावर चढून पलिकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. देशात सक्रिय असलेल्या डाकूंचं त्यांनी सचित्र वर्णन करायचं होतं.

त्यावेळी चंबळ परिसरात देशातले बहुतांश डाकू आढळून यायचे. इथूनच ते आपला कारभार चालवत असत.

पुलित्झर पुरस्कारप्राप्त लेखक पॉल सॅलोपेक यांनी त्यांच्या पुस्तकात याचं वर्णन उत्तमरित्या केलं होतं. ते लिहितात, निर्मनुष्य डोंगराळ भाग, गाळाने भरलेल्या नदीच्या किनाऱ्यावर इथं ठग, खूनी आणि गँगस्टर आढळून येतात. त्यांना डाकू संबोधलं जातं."

काही महिन्यांच्या प्रयत्नांनंतर पंजीर हे डाकूंशी संपर्क साधण्यात यशस्वी ठरले. नंतर ते आणि त्यांच्या काही पत्रकार मित्रांना मलखान सिंग यांना भेटण्याची परवानगी मिळाली.

मे 1982 चा तो काळ होता. मलखान सिंग त्यावेळी भारतात 'डाकूंचा राजा' म्हणून ओळखले जात असत.

मध्य प्रदेशासह शेजारच्या उत्तर प्रदेशातूनही काही डाकू कार्यरत होते. एका वर्षापूर्वीच या परिसरात फूलन देवी ही महिला डाकू कुप्रसिद्ध झाली होती. तिने उच्चवर्णीय जातीतल्या तब्बल 22 पुरुषांची हत्या केली होती.

मलखान सिंग

फोटो स्रोत, Prashant panjir

फोटो कॅप्शन, मलखान सिंग यांची गँग

पण चंबळमध्ये मलखान सिंग आणि त्यांच्या गँगची सर्वाधिक दहशत होती. ते पायी फिरायचे. परिसरातल्या खड्ड्यांमध्ये एक तात्पुरता निवारा बांधून राहत प्रामुख्याने ते नदी किनाऱ्यावर खोलगट आणि अरूंद ठिकाणांचाच लपण्यासाठी आधार घेत असत.

आपल्या 13 वर्षांच्या कार्यकाळात मलखान सिंग यांनी 100 जणांची गँग बनवली होती. तेच न त्यांना डाकूंचा राजा असं संबोधण्यात येत असे.

1982 पर्यंत मलखान सिंग यांच्यावर दरोडा, अपहरण आणि हत्या यांच्यासारखे एकूण 94 गुन्हे दाखल होते.

मलखान सिंग यांना पकडण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्यांची माहिती देणाऱ्याला 70 हजार रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं होतं.

ही रक्कम आता कमी वाटत असेल. पण आजच्या आर्थिक स्थितीचा विचार केल्यास ही रक्कम त्यावेळी खूपच जास्त होती.

मलखान सिंग यांच्या गँगमधील एक सदस्य

फोटो स्रोत, Prashant panjir

फोटो कॅप्शन, मलखान सिंग यांच्या गँगमधील एक सदस्य

बक्षीस जाहीर करण्यासोबतच प्रशासनाने मलखान सिंग यांना शस्त्र खाली ठेवण्याच्या सूचना पाठवणंही सुरू ठेवलं.

दरम्यान, 1982 च्या मे महिन्यात छायाचित्रकार पंजीर, त्यांचे सहकारी कल्याण मुखर्जी आणि बृजराज सिंग यांचीही मध्यप्रदेशच्या तत्कालीन काँग्रेस सरकारने मदत घेतली.

मलखान सिंगसोबत बोलणी करण्यासाठी मध्यस्थ म्हणून त्यांना पाठवलं गेलं. त्यांनी मीत सिंग यांच्याशी संपर्क प्रस्थापित केला होता.

शरणागती पत्करण्यापूर्वी मलखान सिंग यांनी सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.

फोटो स्रोत, PRASHANT PANJIAR

फोटो कॅप्शन, शरणागती पत्करण्यापूर्वी मलखान सिंग यांनी सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.

पंजीर सांगतात, "मला गँगसोबत काही दिवस घालवावे लागले. पण त्यांचा बंधक बनून मी खुश होतो. विश्वासघाताच्या सावटाखाली त्यांची गॅरंटी होती. मला माझे फोटो मिळत होते."

पंजीर सर्वप्रथम अमावस्येच्या दिवशी चंबळमध्ये मलखान गँगला भेटले.

मलखान सिंग यांची आठवण सांगताना ते म्हणतात, "सडपातळ बांधा आणि जाडजूड मिशा अशी त्यांची ठेवण होती. त्यांनी हातात अमेरिकन बनावटीची एक स्वयंचलित रायफलही पकडलेली होती. ते मितभाषी होते. पण एक ठाम आणि महत्त्वाकांक्षी व्यक्ती ते होते.

गँगमधील एक सदस्य

फोटो स्रोत, Prashant panjir

फोटो कॅप्शन, गँगमधील एक सदस्य

त्यावेळी त्यांच्या गँगमध्ये 2025 दणकट माणसं होती. रात्रीच्या वेळीच ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणचा प्रवास करायचे.

आवश्यक सामान, गाद्या, शस्त्र, पावसापासून वाचण्यासाठी ताडपत्री तसंच काही प्रमाणात धान्य असं साहित्य त्यांच्याकडे असे. ते उघड्यावरच झोपत.

त्यांच्यापैकी एका व्यक्तीकडे एके 47 तर बाकीच्यांकडे कार्बाईन आणि इतर रायफल्स होते.

पंजीर म्हणतात, "मलखान सिंग हे चंबळच्या कहाणीचं उत्तम उदाहरण होते. दलित समाजातील एक तरूण. स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी ज्याने शस्त्र उचललं. स्वयंसंरक्षणासाठी तसंच न्याय मिळवण्याच्या उद्देशाने उच्चवर्णीय समाजातील लोकांविरुद्ध मोहीम उघडली."

सुमारे एक आठवडा पंजीर यांनी मलखान सिंग गँगचे फोटो काढले. यांपैकी काही फोटो त्यांच्या 'दॅट व्हिच इज अनसीन' या पुस्तकात छापण्यात आलेले आहेत.

अखेरीस, 1982 च्या जून महिन्यात मलखान सिंग यांनी शरणागती पत्करली. त्यासाठी त्यांनी काही अटी-शर्थीही घातल्या.

मलखान सिंग

फोटो स्रोत, Prashant panjir

फोटो कॅप्शन, मलखान सिंग

आपल्या गँगमधील कोणत्याच सदस्याला मृत्यूदंड दिला जाऊ नये, ही त्यांची प्रमुख अट होती.

ते एका विजयी नायकाप्रमाणे आले होते. सडपातळ बांध्याच्या मलखान यांनी पोलिसांची वर्दी घातली होती. त्या वर्दीतच त्यांनी वर्षानुवर्षे कारभार केला होता. डाकूंचा राजा संबोधले जाणारे मलखान सिंग यांनी शस्त्र खाली ठेवताना 30 हजारांची गर्दी त्यांच्यासमोर जमा झाली होती. ते एका विजयी जत्रेप्रमाणे होतं, असं 'इंडिया टुडे' मासिकाने त्यावेळी छापलं होतं.

पण मलखान सिंग वाक्चातुर्यात निष्णात नव्हते, असं पंजीर म्हणाले.

त्यांनी शरणागती स्वीकारल्यानंतर त्यांना अनेक पत्रकारांनी आता कसं वाटत आहे, हा प्रश्न विचारला.

उत्तरादाखल सिंग तेच तेच वाक्य पुन्हा बोलायचे, असं त्यांनी सांगितलं.

अखेरीस, मलखान सिंग आणि त्यांच्या गँगमधील सदस्यांना त्यांच्यावर दाखल असलेल्या काही गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने त्यांना दोषी मानलं. त्यांना शिक्षा होऊन त्यांना मध्य प्रदेशातील ओपन जेलमध्ये पाठवण्यात आलं.

पुढची काही वर्षे मलखान यांनी तुरुंगातच घालवली.

बाहेर पडल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. गेल्या काही वर्षांत ते भारतीय जनता पक्षासाठी प्रचार करतानाही दिसून आले.

2019 मध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.

"मी डाकू नव्हतो तर एक बंडखोर होतो. मी स्वयं-संरक्षण आणि स्वतःची प्रतिष्ठा राखण्यासाठी शस्त्र उचललं होतं. खरे डाकू कोण आहेत, ते मला माहीत आहे. त्यांच्याशी कशा पद्धतीने व्यवहार करायचं हे मला चांगलंच माहीत आहे," असं ते त्यावेळी म्हणाले होते.

प्रशांत पंजीर हे भारतातले आघाडीचे छायाचित्रकार आणि लेखक आहेत. त्यांचं दॅट व्हिच इज अनसीन हे पुस्तक नुकतंच नवजीवन ट्रस्टकडून प्रकाशित करण्यात आलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)