किसान महापंचायत : जीव देऊ, पण मागे हटणार नाही - राकेश टिकैत

राकेश टिकैत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राकेश टिकैत
    • Author, शहबाज अन्वर
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

शेतकरी मागण्या पूर्ण होईपर्यंत दिल्लीच्या सीमेवरून मागे हटणार नाहीत, असं शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले. ते मुझफ्फरनगरमध्ये आयोजित किसान महापंचायतमध्ये बोलत होते.

मोदी सरकारनं आणलेल्या तिन्ही कृषी कायद्यांवर पुन्हा एकदा राकेश टिकैत यांनी टीका केली आणि तिन्ही कायदे मागे घेण्याची मागणी केली. दिल्लीच्या सीमेवर गेल्या नऊ महिन्यांहून अधिक काळापासून शेतकरी आंदोलन करत आहेत.

एएनआयनुसार, राकेश टिकैत महापंचायतीत म्हणाले की, "आम्ही शपथ घेतो की, तिथं (दिल्लीची सीमा) आमची कबर खोदली गेली, तरी आम्ही आंदोलनाचं ठिकाण सोडणार नाही. गरज पडल्यास जीव देऊ, पण जोपर्यंत जिंकत नाही तोवर आंदोलनातून माघार घेणार नाही."

"भारत सरकार जोपर्यंत चर्चा करत नाही, तोवर आंदोलन सुरूच राहील. सरकारनं चर्चा केल्यास आम्ही चर्चा करू. देशात स्वातंत्र्याची लढाई 90 वर्षे चालली. हे आंदोलन किती वर्षे सुरू राहील, याची कल्पना नाही," असंही राकेश टिकैत म्हणाले.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

किसान महापंचायतीत देशभरातील शेतकरी सहभागी

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये संयुक्त किसान मोर्चा संघटनेच्या वतीने आज (रविवार, 5 सप्टेंबर) किसान महापंचायत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

शहरातील सर्वात मोठ्या GIC मैदानात ही पंचायत आयोजित करण्यात आली आहे. देशातील विविध राज्यातून याठिकाणी शेतकरी सहभागी झाले आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

शहरातील सर्व रस्त्यांवर लोकांची गर्दी आहे. तसंच मैदानांमध्ये वाहनं, ट्रॅक्टर आणि बस यांचीच गर्दी दिसून आली.

महापंचायतीच्या व्यासपीठावर भारतीय किसान युनियन संघटनेचे नेते राकेश टिकैत आणि अध्यक्ष नरेश टिकैत यांच्याशिवाय किसान मोर्चाशी संबंधित सर्व मोठे नेते उपस्थित होते. मुजफ्फरनगर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

भारतीय किसान युनियनचे माध्यम प्रभारी धर्मेंद्र मलिक म्हणाले होते, "देशातील कानाकोपऱ्यातून शेतकरी या महापंचायतीत सहभागी होतील. हरयाणा, पंजाबसह इतर राज्यांमधून महिला जत्थेदारही येणार आहेत. याठिकाणी पाच लाख शेतकरी जमा होतील, असं आम्हाला वाटतं."

महापंचायत

फोटो स्रोत, SHAHBAZ ANWAR/BBC

"पंचायतस्थळी जास्त गर्दी होऊ नये यासाठी शहरात ठिकठिकाणी स्पीकर आणि एलईडी लावण्यात आले आहेत. शेतकरी तिथूनही पंचायतीत सहभागी होऊ शकतील," असं मलिक यांनी सांगितलं.

पण प्रशासनाचं याबाबत वेगळं मत आहे. याठिकाणी 50 हजार शेतकरी जमा होतील, असा अंदाज मुजफ्फरनगरचे उप-जिल्हाधिकारी दीपक कुमार यांनी व्यक्त केला.

शेतकरी नेते आणि BKU पूर्व मंडलचे अध्यक्ष दिनेश कुमार यांनीही मोर्चाविषयी अधिक माहिती दिली.

राजकीय इंटर कॉलेजच्या विशाल मैदानावर ही महापंचायत आहे. याठिकाणी 70 ते 80 हजार शेतकरी बसू शकतात. व्यासपीठही 60 फूट लांब आणि रुंद तयार करण्यात आलं आहे.

ही महापंचायत ऐतिहासिक होईल, असा दावा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी ट्विट करून केला.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

राकेश टिकैत हे गाझीपूर बॉर्डरवरून किसान महापंचायतमध्ये सहभागी होण्यासाठी मुजफ्फरनगरला जातील. हा संपूर्ण परिसर त्यांचे वडील महेंद्र टिकैत यांचं कार्यक्षेत्र मानला जातो. सुमारे 10 महिने सलग आंदोलनानंतर पहिल्यांदाच राकेश टिकैत आणि त्यांचा भाऊ नरेश टिकैत एकत्र दिसतील.

महापंचायतीत जाट शेतकऱ्यांसह मुस्लीम समाजातील शेतकरीही दिसतील.

वरूण गांधींकडून महापंचायतला पाठिंबा

भाजप नेते वरूण गांधी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. महापंचायतीची एक व्हीडिओ क्लिप ट्विटरवर शेअर करताना वरूण गांधी म्हणाले, "मुजफ्फरनगरमध्ये आज लाखो शेतकरी आंदोलनासाठी जमा झाले आहेत. तीसुद्धा आपलीच माणसं आहेत. आपण त्यांच्याशी आदरपूर्वक पद्धतीने संवाद साधण्याची गरज आहे. त्यांचं दुःख आणि मुद्दे समजून घेण्याची गरज आहे. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

वरूण गांधी यांच्या ट्विटचं स्क्रिनशॉट राष्ट्रीय लोकदल पक्षाचे नेते जयंत चौधरी यांनी पोस्ट केलं.

ते म्हणाले, "वरूण भाई यांच्या भूमिकेचं कौतुक व्हायला हवं. पण उत्तर प्रदेशातील खुर्जा मतदारसंघाचे आमदार विजेंद्र सिंह यांचं वक्तव्य बघा. विजेंद्र आपल्या मतदारसंघात जाऊन फालतू वक्तव्य करत आहेत."

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

जयंत यांनी सोबत विजेंद्र सिंह यांचं ट्विटही जोडलं आहे. विजेंद्र सिंह यांनी लिहिलं होतं, "माफ करा वरूणजी. तुम्हाला शेतकरी आणि राष्ट्रविरोधी शक्ती यांच्यात फरक ओळखण्याची गरज आहे."

वाद वाढत असल्याचं पाहून नंतर विजेंद्र सिंह यांनी हे ट्वीट डिलीट केलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)