उद्धव ठाकरे : 'स्वबळ हा नारा नाही, आमचा अधिकार आहे', उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 9 मुद्दे

फोटो स्रोत, Getty Images
स्वबळ केवळ निवडणुका लढण्यासाठी असू नये, सत्ता आणि स्वबळ बाजूला ठेवून कोरोनावर लक्ष द्या, असं म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसला टोला लगावला आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख या नात्यानं उद्धव ठाकरेंनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना ऑनलाईन माध्यमातून संबोधलं. यावेळी त्यांनी विरोधकांसह महाविकास आघाडीतल्या काँग्रेसलाही टोले-टोमणे लगावले.
उद्धव ठाकरे म्हणाले, "स्वबळाचा नारा आपणही देऊ. स्वबळ तर पाहिजेच. ताकद तर कमावली पाहिजे. आत्मविश्वास असेल जगाच्या पाठीवर कुठेही मरण नाही. आत्मबळ आणि स्वबळ शिवसेनेनं दिलं."
तसंच, "स्वबळ म्हणजे निवडणुका लढण्यापुरतं नको, न्याय-हक्कांसाठी सुद्धा स्वबळ लागतं," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे 9 मुद्दे :
1) गेल्या 55 वर्षात शिवसेनेनं अनेकांचं रंगही पाहिल आणि अंतरंगही पाहिलेत
2) सत्ता न मिळाल्यानं अनेकांचा जीव कासावीस होतोय.
3) स्वबळ हा नारा नाही, आमचा अधिकार आहे

फोटो स्रोत, Getty Images
4) स्वबळाचा नारा आपणही देऊ. स्वबळ तर पाहिजेच. ताकद तर कमावली पाहिजे. आत्मविश्वास असेल जगाच्या पाठीवर कुठेही मरण नाही. आत्मबळ आणि स्वबळ शिवसेनेनं दिलं.
5) स्वबळ म्हणजे निवडणुका लढण्यापुरतं नको, न्याय-हक्कांसाठी सुद्धा स्वबळ लागतं
6) शिवसेनेनं महाविकास आघाडी केल्यानं हिंदुत्त्व सोडलं का? हिंदुत्त्व म्हणजे पेटंट आहे का? हिंदुत्त्व नेसण्याची-सोडण्याची वस्तू नाहीय. हिंदुत्त्व हृदयात आहे.
7) अनेकजण टीका करतात, घराच्या बाहेर पडत नाही. घरातूनही इतकं काम होतंय, घराबाहेर पडलो तर किती होईल? आणि मी घराबाहेर पडणार आहे.
8) शिवसेनेनं वर्धापन दिनानिमित्त राजकीय कार्यक्रम दिला नाही, तर कोरोनामुक्त गाव करा, असा कार्यक्रम दिला. असं करणारे किती राजकीय पक्ष असतील?
9) एक देश आणि अनेक भाषा असं जगाच्या पाठीवर आपण एकमेव आहोत, एकत्रीकरण ही भारताची ताकद आहे. देशावर प्रेम करा सांगणारा शिवसेनेशिवाय दुसरा पक्ष नाही
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील इतर मुद्दे :
- शिवसैनिकांच्या आयुष्यात तीन सण असतात. बाळासाहेबांचा जन्मदिन, शिवसेनेचा वर्धापन दिन आणि मार्मिकचा वर्धापन दिन, असं प्रमोद नवलकर म्हणायचे.
- स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यासाठी असू नये.
- स्वबळ हे अभिमानाचं आणि स्वाभिमानाचं असावं

फोटो स्रोत, facebook
- मराठी म्हणणं जसं कमीपणाचं लक्षण होतं, तसं हिंदुत्त्वाचा उच्चार करतानाही भल्याभल्यांना कापरं भरत होतं, तेव्हा शिवसेना म्हणाली, गर्व से कहो हम हिंदू है
- हिंदुत्त्व आमचं राष्ट्रीयत्व आहे, हे लक्षात घ्या
- एक देश आणि अनेक भाषा असं जगाच्या पाठीवर आपण एकमेव आहोत, एकत्रीकरण ही भारताची ताकद आहे.
- देशावर प्रेम करा सांगणारा शिवसेनेशिवाय दुसरा पक्ष नाही
- कोरोनाच्या काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हजारो शिवसैनिकांनी रक्तदान केलं
- सत्ता आणि स्वबळ बाजूला ठेवून सर्वांनी कोरोनावर लक्ष द्यावं
- सत्तेसाठी आपण लाचार होणार नाही, हे आपलं व्रत आहे
- शिवसेना हा पक्ष किंवा संघटना नाही, शिवसेना विचार आहे
- स्वबळावर सत्ता आणू कुणी बोललं तर लोक जोड्यानं मारतील
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








