पंकजा मुंडे - 'OBC आरक्षणाचा मुद्दा निकाली काढल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही'

पंकजा मुंडे

फोटो स्रोत, Getty Images

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली काढल्याशिवाय निवडणुका घेण्यात अर्थ नाही किंबहुना निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची घोषणासुद्धा त्यांनी केली आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज (3 जून) स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने पंकजा मुंडे यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम गोपीनाथ गडावर आयोजित न करता, पंकजा मुंडे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

मराठा समाजाची मोठी निराशा झाली आहे. सरकार आरक्षण देण्यात कमी पडलं आहे, असा आरोपसुद्धा त्यांनी केला आहे.

"गेल्या वर्षभरात मराठा समाजाची घोर निराशा झाली आहे. मराठा समाजाचा प्रत्येक तरुण मला ट्विटरवर, फेसबुकवर मेसेज करत आहेत की, गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडावरून आम्हाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. आज ते असते तर मराठा तरूणाला आरक्षणासाठी असं दारोदार फिरायची वेळ आली नसती," असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

"आज बहुजन समाजाचा मोठा प्रश्न आहे. आरक्षणाच्या माध्यमातून सर्वांनी फक्त आपल्या पोळ्या भाजण्याचं काम केलं आहे. ही नवी पीढी आहे. यांना खोटं सांगू नका, खरं सांगा. मराठा समाजाला किती टक्के आरक्षण देता हे सांगा. तुम्ही सोळा टक्के होत नाही म्हणता, मग आम्हाला टक्के सांगा. आम्ही तयार आहोत," असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

आरक्षणाचा प्रश्न आणि राज्यातली कोरोना स्थिती याबद्दल आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही पंकजा यांनी म्हटलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)