पंकजा मुंडेंचं प्रमोशन झालं की त्यांना राज्यापासून दूर केलं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातून पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया राहटकर, सुनील देवधर यांची राष्ट्रीय सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
यानंतर पंकजा मुंडे यांनी म्हटलं, "भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मला जबाबदारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जी जबाबदारी दिली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. या पदाच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वोतपरी योगदान देण्याचा मी निश्चय करते."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्रातील निवड झालेल्या सदस्यांचं अभिनंदन केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
पण, महाराष्ट्राच्या राजकारणात पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांना एकमेकांचे प्रतिस्पर्धी मानले जातात.
यापूर्वी पंकजा मुंडे यांना विधान परिषद तसंच भाजपच्या राज्य कार्यकारिणीतून डावलण्यात आलं होतं.
त्यानंतर आता भाजपनं त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत जागा दिली आहे.
ही जागा देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे. पण हे पंकजा मुंडेंचं प्रमोशन आहे की त्यांना राज्यापासून दूर ठेवण्यात आलं आहे?

फोटो स्रोत, Twitter
'सामावून घ्यायचा प्रयत्न'
पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देऊन त्यांना पक्षात सामावून घ्यायचा प्रयत्न करण्यात आल्याचं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात.
त्यांच्या मते, "पंकजा मुंडे यांनी सात ते आठ महिन्यांपूर्वी बंडाचा स्वर लावला होता. मराठवाड्यातील पाणी प्रश्नावरुन त्यांनी औरंगाबादेत आंदोलन केलं होतं. मी महाराष्ट्रभर फिरून दौरा करणार, असंही त्या म्हणाल्या होत्या. त्याचवेळी चंद्रकांत पाटील यांनी तिथं उपस्थित राहून पंकजा मुंडे यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल, असं वक्तव्य केलं होतं आणि आता ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
"पंकजा मुंडे या भाजपचा ओबीसी चेहरा आहे. त्यांच्या मागे समाजाचं पाठबळ आहे. भाजपलाही पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळे त्यांना आता चांगला वाव दिलेला आहे. पक्षानं त्यांना सामावून घ्यायचा प्रयत्न केला आहे."

फोटो स्रोत, PANKAJA GOPINATH MUNDE/FB
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारेही असंच मत व्यक्त करतात.
ते म्हणतात, "भाजप पंकजा मुंडेंना अजिबात बाजूला ठेऊ शकत नाही. कारण त्यांच्यामागे एका समाजाची ताकद आहे. त्या समाजासाठी दुसरा कोणता नेताही भाजपकडे नाही. त्यामुळे पंकजा यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती होणं यात अनपेक्षित असं काहीच नाही."
ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांच्या मते, "राजकारणात महिला नेत्या फार कमी आहेत. त्यामुळेही पंकजा मुंडेंना संधी मिळाली आहे. खरं तर विधानसभा निवडणुकीत मोदी-शहा यांची सभा होऊनही पंकजा यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भाजपला नक्कीच वाईट वाटलं असेल, पण त्यांच्यातली क्षमता घेत महाराष्ट्राच्या बाहेर संधी दिली गेली आहे."
राज्याच्या राजकारणापासून दूर नेण्याचा प्रयत्न?
पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्षाच्या बातम्या अनेकदा छापून आल्या आहेत.
त्यामुळे पंकजा मुंडेंच्या निवडीतून देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय भाजप नेतृत्व काही मेसेज देऊ पाहत आहे काय, असा प्रश्न आम्ही हेमंत देसाई यांना विचारला.
ते सांगतात, "देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. तसंच त्यांना संसदीय मंडळात घेण्यात येईल, अशाही बातम्या येत आहे. एकंदरीत काय तर देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रीय नेतृत्वाकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे या निवडीतून फडणवीसांना केंद्र काही संदेश देऊ पाहत आहे, असं वाटत नाही."

फोटो स्रोत, PANKAJA GOPINATH MUNDE/FB
पण, पंकजा मुंडे यांच्या निवडीतून महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी रान मोकळं केल्याचं ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी सांगतात.
ते म्हणतात, "पंकजा मुंडे यांना देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांची उचलबांगडी करण्यासाठी पंकजा मुंडेंना केंद्रात ही जबाबदारी देण्यात आली आहे. या माध्यमातून नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी महाराष्ट्रातील रान मोकळं केलं आहे.
"एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवून राष्ट्रीय राजकारणात स्थान दिलं आहे, तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिव पद देऊन देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रातील स्थानाला कुणी हात लावू शकणार नाही, याची सोय केली आहे. पुढे महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच राहणार असा स्पष्ट संदेश भाजपनं यातून दिला आहे."
विजय चोरमारे यांच्या मते, "पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेत स्थान देण्यात आलं नाही आणि नंतर राज्य कार्यकारिणीतही त्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे मग कदाचित राज्य पातळीवर संघर्ष नको, म्हणून भाजपनं त्यांना आता केंद्रात जबाबदारी दिली असावी."

फोटो स्रोत, Getty Images
विधान परिषद उमेदवारीवर पंकजा काय म्हणाल्या होत्या?
महाराष्ट्र भाजपकडून मे महिन्यात विधान परिषद निवडणुकीसाठीचे उमेदवार जाहीर करण्यात आले.
यात गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके आणि डॉ. अजित गोपछडे यांना संधी देण्यात आली होती.
या यादीत पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या नेत्यांची नावं नव्हती.
यावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडेंनी नाराजी व्यक्त करणारं ट्वीट केलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
त्यांनी म्हटलं होतं, "आईंना, ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय, ठीक आहे. पण वाघांनो, असं रडताय काय? मी आहे ना! 'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही' बस साहेबांचे आशीर्वाद आहेत. दिवसभर फोन उचलले नाही, कुणाकुणाला उत्तर देऊ? या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नाही. भाजपच्या त्या चार ही उमेदवारांना आशीर्वाद!"
यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या सहाव्या स्मृतिदिनावेळी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं का, असा सवाल पंकजा मुंडेंना विचारला तेव्हा त्या म्हणाल्या,
"मला काही वाईट वगैरे वाटलं नाही किंवा दुख: झालं नाही. राज्यातल्या पक्षश्रेष्ठींनी सांगितलं की, तुमचं नाव असल्यामुळे तुमची तयारी असावी. पण जे झालं त्यांना मी शुभेच्छा दिल्या. माझे कार्यकर्ते नाराज झाले. पण मी त्यांना धीर दिला. मी राजकारणात कुठल्या सक्रिय पदावर नाही. त्यामुळे मी समाजकारणात आहे. एखादी एनजीओ चालवणारी व्यक्ती जितकी सक्रिय समाजकारणात असते. तितकी मी आहे."
याच मुलाखतीत त्यांनी पुढे सांगितलं होतं,
"मानवतेच्या पलिकडे जाऊन राजकारण करायचं नाही ही मुंडे साहेबांची शिकवण आहे. ते कायम राहील. अनेकदा या संस्कारांमुळे गोपीनाथ मुंडे यांना पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यावी लागली. तो खंबीरपणा माझ्यातही आहे. पराभव आणि माझ्यावर झालेले राजकीय हल्ले यातून ती खंबीरता जाता कामा नये, हा संकल्प मी स्मृतीदिनानिमित्त करेन."
पंकजा मुंडे यांनी जूनमध्ये बीबीसीला दिलेली ही संपूर्ण मुलाखत तुम्ही इथं वाचू शकता - गोपीनाथ मुंडे स्मृतिदिनानिमित्त पंकजा मुंडे म्हणाल्या...
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








