पंकजा मुंडे : मला रिप्लेस करणारा माणूस उभा राहिला तर स्वतःहून जागा सोडेन

पंकजा मुंडे

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा आज 3 जून रोजी सहावा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या कन्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यशी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी संवाद साधला.

प्रश्न - 3 जून हा गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने तुम्ही एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यात #संघर्षदिन म्हटलंय. या दिवसानंतर तुमचा संघर्ष खऱ्या अर्थाने सुरू झाला असं तुम्हाला वाटतं का?

पंकजा मुंडे - 3 जून हा मुंडेवर प्रेम करणार्‍या सर्व कार्यकर्त्यांसाठी काळा दिवस आहे. आम्ही या दिवशी गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी जमतो. पण यंदा कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे मी ती पोस्ट लिहिली.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

जे कराल ते सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून करा. जो सदैव काही ना काही करत असतो तो बिनासंघर्षाचा नाही राहू शकत. त्यामुळे संघर्ष हा कायम असणारचं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

प्रश्न - गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर तुम्ही 'संघर्ष यात्रा' काढली. तुम्ही लोकांमध्ये गेलात. पंकजा मुंडे यांना आता पुन्हा 'संघर्ष यात्रा' काढून लोकांमध्ये जाण्याची वेळ आलीय असं वाटतं?

पंकजा मुंडे - गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर मी 'संघर्ष यात्रा' काढली आणि ती यशस्वी झाली. सध्या कोरोनाच्या संकटात ते शक्य नाही. पण हे सर्व संपल्यानंतर मी नक्की लोकांमध्ये जाईन.

पंकजा मुंडे

फोटो स्रोत, Getty Images

प्रश्न - गोपीनाथ मुंडे आणि तुमच्या राजकीय वाटचालीमध्ये तुम्हाला साम्य दिसतं? कारण त्यांना बराच राजकीय संघर्ष करावा लागला होता आणि तो तुम्हालाही करावा लागतोय?

पंकजा मुंडे - एका मोठ्या राजकीय व्यक्तीचं मूल असणं ही खूप मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे. एका लेव्हलपर्यंत पोहचणं हे गरजेचं असतं. त्यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. मोबाईल नव्हता. अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते.

विलासराव देशमुखांसारखा नेता त्यांचा विरोधक असून मित्र होता. तेव्हाच्या राजकीय संस्कृतीमध्ये आणि आताच्या राजकीय संस्कृतीमध्ये खूप फरक आहे. मी थोडी मागासलेली असल्यामुळे मला ते दिवस खूप आवडतात.

प्रश्न - तेव्हाचा भारतीय जनता पक्ष आणि आताचा यात काय फरक जाणवतो तुम्हाला?

पंकजा मुंडे - प्रत्येक पक्ष हा काळानुसार बदलत असतो. मग तो कॉंग्रेस, राष्ट्रवादी असो किंवा भाजप... तेव्हा भाजपकडेही सोशल मीडिया नव्हता. मुंडे साहेबांनी नांगरधारी शेतकरी होऊन निवडणूक लढली. स्वत: सतरंजी अंथरून, भोंगे लावून प्रचार केला. त्या भाजपमध्ये आणि आताच्या भाजपमध्ये जमीन-आसमानचा फरक आहे. आता एका ट्वीटवर लाखो कार्यकर्त्यांपर्यंत भाजप पोहचतेय. पण लोकांमध्ये जाणं हे कमी झालंय.

प्रश्न - गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षाचा वारसा तुम्हालाही लाभलाय असं तुम्हाला वाटतं का? कारण त्यांना पक्षाअंतर्गत आणि पक्षाबाहेर संघर्ष करावा लागला?

पंकजा मुंडे - हो निश्चितपणे..! त्यांनी गोपीनाथ पांडुरंग मुंडे म्हणून सुरवात केली आणि मी पंकजा गोपीनाथ मुंडे... त्यांची सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवात झाली. माझ्याकडे तसं सगळं होतं. वडील होते, आमदारकी होती. पण ते गेल्यानंतर मला घरातच संघर्ष करावा लागला. माझ्यासाठी तो 'इमोशनल बस्ट' होता. पराभवाला तेही सामोरे गेले. पण मी राजकीय वाटचालीच्या एका वरच्या स्तरावर पोहचल्यावर मला पराभव पत्करावा लागला तो त्यांना नव्हता लागला.

पंकजा मुंडे

फोटो स्रोत, PANKAJA GOPINATH MUNDE/FB

प्रश्न - गोपीनाथ मुंडे यांनी पक्षात राहू नये म्हणून अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. त्यांच्याबरोबरही पक्षाअंतर्गत राजकारण झालं आणि आता तुम्ही स्ट्रगल करताय. हे दोन बिंदू तुमच्या आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दिला जोडतात असं वाटत?

पंकजा मुंडे - कोणत्याही पक्षात सारखी गुणवत्ता असलेले लोक असतात त्यामुळे एक स्पर्धाही असतेच. आम्ही काही जीवाचे शत्रू नसतो. ते एक पुरुष होते आणि मी एक स्त्री आहे ही एक आमच्यातली भिन्नता आहे. मी खूप चांगल्या महिला सचिवांबरोबर काम केलं. पण आपल्याकडे अजून एकही महिला मुख्य सचिव झाली नाही. त्यामुळे स्त्रीला बराच संघर्ष असतो. तुमच्यामध्ये मेरीट आहे तर तुम्हाला संघर्ष चुकत नाही.

प्रश्न - विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं?

पंकजा मुंडे - मला काही वाईट वगैरे वाटलं नाही किंवा दुख: झालं नाही. राज्यातल्या पक्षश्रेष्ठींनी सांगितलं की, तुमचं नाव असल्यामुळे तुमची तयारी असावी. पण जे झालं त्यांना मी शुभेच्छा दिल्या. माझे कार्यकर्ते नाराज झाले. पण मी त्यांना धीर दिला. मी राजकारणात कुठल्या सक्रिय पदावर नाही. त्यामुळे मी समाजकारणात आहे. एखादी एनजीओ चालवणारी व्यक्ती जितकी सक्रिय समाजकारणात असते. तितकी मी आहे.

प्रश्न - गोपीनाथ मुंडे हे वंजारी समाजाचे एकमेव नेते होते. आता पंकजा मुंडे सक्रिय राजकारणात नसल्यामुळे वंजारी समाजातील नेतेपद हे अनेकांमध्ये विभागलं गेलंय असं तुम्हाला नाही वाटत?

पंकजा मुंडे - धनंजय मुंडे यांनी मुंडेसाहेब असतानाच वेगळी चूल मांडली होती. त्याच्याबरोबर किती लोक गेले याचा अभ्यास त्यांच्या नेत्यांनीही केलाय. एखादा समाज दोन-दोन दशकं एकाच व्यक्तीच्या मागे असतो तेव्हा ते तोडणं इतकं सोप नसतं. मला रिप्लेस करणारा माणूस उभा राहिला तर मी स्वत:हून म्हणेन आता माझी जागा तू घे. रमेश कराड आणि भागवत कराड हे मलाचं नेते मानून पुढे जातायेत. त्यामुळे कार्यकर्ते कसे विभागले जातील.

पंकजा मुंडे

फोटो स्रोत, PANKAJA GOPINATH MUNDE/FB

प्रश्न - रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी तुम्ही आग्रह धरल्याची चर्चा झाली.

पंकजा मुंडे - मी रमेश कराड यांच्या उमेदवारीबाबत आग्रह धरला नव्हता. भागवत कराडांच्या बाबतीत माझा थोडा आग्रह होता. जेव्हा मी संभाव्य उमेदवारांच्या यादीत असताना मी रमेश कराडांचं नाव सुचवणं शक्य नाही. मी त्या निर्णय प्रक्रियेत नव्हते. रमेश कराडांच्या वेळी शिवसेनेला जागा सोडली होती, तेव्हा मी भांडले होते. मी उद्धव ठाकरेंनाही त्यांना तिकीट द्या, असं फोन करून सांगितलं होतं. पण आमचा समाज हा पसरलेला आहे. विभागीय संतुलन राखलं पाहीजे होतं. पण ठीक आहे. लॉटरी लागली वंजारी समाजाची..

प्रश्न - कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रात राजकारण तापतंय. सरकार अस्थिर आहे, राष्ट्रपती राजवट लागू करा असं म्हटलं जातंय. तुम्ही या राजकारणाकडे कसं बघता?

पंकजा मुंडे - कोरोनाच्या जागतिक संकटात सरकार अस्थिर असणं म्हणजे लोकांना अस्थिर करणं आहे. मला वाटतं विरोधी पक्षाने सरकारवर अंकुश ठेवला पाहिजे आणि सरकारने नीट काम केलं पाहिजे.

प्रश्न - भाजपने 'महाराष्ट्र बचाव' आंदोलन केलं. त्या आंदोलनात तुम्ही कुठे दिसला नाहीत. त्यामुळे तुम्ही नाराज असल्याची चर्चा झाली. का नव्हता तुम्ही आंदोलनामध्ये?

पंकजा मुंडे - मी सध्या फक्त समाजकारणात आहे. त्यामुळे मी आंदोलनात नव्हते.

प्रश्न - गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीदिनानिमित्त काय संकल्प करणार आहात?

पंकजा मुंडे - मानवतेच्या पलिकडे जाऊन राजकारण करायचं नाही ही मुंडे साहेबांची शिकवण आहे. ती कायम राहील. अनेकदा या संस्कारांमुळे गोपीनाथ मुंडे यांना पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यावी लागली. तो खंबीरपणा माझ्यातही आहे. पराभव आणि माझ्यावर झालेले राजकीय हल्ले यातून ती खंबीरता जाता कामा नये, हा संकल्प मी स्मृतीदिनानिमित्त करेन.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)