You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2021 : कोरोनामुळे आयपीएल रद्द झाल्यानं सोशल मीडियावर मीम्सना उधाण
आयपीएलचा चौदावा हंगाम पुढे ढकलण्यात आल्यानंतर क्रिकेट चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलं आहे. यामुळे मीम्स, कोट्या यांना उधाण आलं आहे.
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचा चौदावा हंगाम खेळाडू पॉझिटिव्ह आढळू लागल्याने स्थगित करण्यात आला आहे.
दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेकडे क्रिकेटविश्वाचं लक्ष असतं. देशात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. अशा परिस्थितीत ही स्पर्धा होणार का यासंदर्भात प्रश्नचिन्ह होतं. मात्र बायोबबलमध्ये होणार असल्याने धोका नाही यावर ठाम राहत बीसीसीआयने आयपीएल भारतातच खेळवण्याचा निर्णय घेतला.
यंदा या स्पर्धेचा हंगाम निम्म्यावर आलेला असताना रद्द झाल्याने सोशल मीडियावर मीम्स, कोट्या, खोचक टिप्पण्यांना उत आला आहे.
आयपीएलचा यंदाचा हंगाम हळूहळू रंगात येऊ लागला होता. मात्र कोरोना केसेस आढळल्याने हंगाम स्थगित करण्याची वेळ ओढवली. हे लक्षात घेऊन, ट्वीटेरा नावाचे युझर यांनी मीम शेअर केला आहे -
आयपीएल नसताना खेळाडूंचा दिवस कसा असेल, याचं कल्पनाचित्र या फोटोतून या युजरनं रंगवलं आहे.
जब नशीब ही हो खोटा तो क्या करेगा लोटा असं म्हणत घनश्याम यांनी विराट कोहलीचा फोटो शेअर केला आहे.
सचिन खेडेकर यांचा संवाद असलेला हा फोटोही आयपीएलच्या निमित्ताने शेअर केला जातोय.
हेराफेरी सिनेमातील दृश्यांचा मीमसाठी हमखास वापर केला जातो. आयपीएल रद्द झाल्यानंतरही तसा वापर करण्यात आलाय.
सिद्धार्थ जाधवची भूमिका असलेलं हे दृश्यही मीम्सचा भाग बनलंय.
विशाल राजपूत या युजरनं आईची प्रतिक्रिया काय असेल, हे या फोटोतून सांगितलं आहे.
ज्यांनी आयपीएलसाठी हॉटस्टारची सबस्क्रिप्शन घेतलीय, त्यांच्यासाठी खास मीम -
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)