महाराष्ट्र लॉकडाऊन: एकीकडे क्रिकेटचे सामने तर दुसरीकडे लॉकडाऊन कसे? - सोशल

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून पुढचे 15 दिवस कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधताना माहिती दिली.

महाराष्ट्रात संचारबंदी म्हणजेच 144 कलम लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही.

सकाळी 7 ते रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. तसंच, सार्वजनिक वाहतूकही सुरू राहील. मात्र, ती अत्यावश्यक सेवेसाठीच असेल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांना उघडपणे लॉकडाऊन नाही. मात्र, लावण्यात आलेले सर्व निर्बंध कडक आहेत. या निर्बंधांच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडल्याचे दिसून येत आहे.

विविध क्षेत्रातील दिग्गजांसह सर्वसामान्य नेटिझन्सही महाराष्ट्रात लावण्यात आलेल्या निर्बंधांवर व्यक्त होऊ लागले आहेत.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय.

वंचित बहुजन आघाडीचे नेते फारूक अहमद यांनी सरकारवर टीका केलीय. "स्वत:च्या निष्क्रियतेचे पाप लॉकडाऊनच्या रुपात जनतेच्या माथ्यावर फोडणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध," असं अहमद म्हणाले आहेत.

वरिष्ठ पत्रकार सिद्धार्थ भाटिया यांनी उद्धव ठाकरे यांनी लावलेल्या निर्बंधांचं कौतुक केलंय.

एकीकडे कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध लावण्यात येत असताना, दुसरीकडे क्रिकेटचे सामने सुरू आहेत. त्यामुळे कुशल मेहरा या युजरने त्यावर प्रश्न उपस्थित केलाय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)