व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम जगभरात डाऊन, सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस

जगभरात व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक मॅसेंजर हे अॅप मोठ्या प्रमाणात वापरले जातात. पण काल (शुक्रवार, 19 मार्च) रात्री हे अॅप वापरण्यात भारतासह जगभरात सर्वत्र अडचणी येत होत्या.

याची सुरुवात काल रात्री साडेदहाच्या सुमारास झाली. काही वेळ जगभरात हे साईट्स डाऊनचे होते, अशी माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिली.

एका तासाने व्हॉट्सअॅप पुन्हा सुरु झालं. त्यानंतर काही वेळाने इन्स्टाग्राम आणि फेसबुक मॅसेंजर हे अॅपही पूर्ववत सुरू झाले.

हे तिन्ही अॅप वापरणाऱ्या लोकांमध्ये तरुणांची संख्या प्रचंड आहे.

अशा स्थितीत या सगळ्यांची प्रतिक्रिया उमटणार नाही तरच नवल.

अॅप डाऊन झाल्याचं कळताच काल रात्रीपासूनच #WhatsAppDown हे हॅशटॅग ट्रेंग होऊ लागलं.

दरम्यान, काही युझर्सच्या सर्जनशील विचारांना मोकळीक मिळून अनेक मीम्स आणि विनोद केले जाऊ लागले.

भारतीय प्रशासनातील अधिकारी प्रवीण कासवान यांनी ट्विटरवर लिहिलं की व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम बंद झाल्यामुळेच लोकांनी ट्विटरवर गर्दी केली आहे.

शाहबाज जादून या युझरने सध्याची व्हॉट्सअॅप आणि ट्विटर मालकांची स्थिती यामधील फरक दर्शवला.

पंजाबी यू नामक एका व्यक्तीने ऋतिक रोशनच्या संवादाच्या माध्यमातून ही स्थिती समजावून सांगितली.

प्रियंक पांडे यांनी हेराफेरी चित्रपटातील डायलॉगवरून बनवण्यात आलेलं मीम यासाठी वापरलं.

इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप पुन्हा सुरू झाल्याने आता निरोप घ्यायची वेळ आली, असं एकाने म्हटलं.

व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यामुळे आता लवकर झोपावं लागेल, असं एकाने म्हटलं.

दिवसातून एक-दोनवेळा व्हॉट्सअॅप उघडणाऱ्या लोकांना याची काहीच कल्पना नसेल, असं एकाने सांगितलं.

वरील तिन्ही प्लॅटफॉर्म पुन्हा पूर्ववत सुरू झाल्यावर इथले युझर्स कशा प्रकारे परतले, ते या फोटोत पाहा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)