जो बायडन आणि शदर पवार यांच्या पावसातल्या सभेची पुन्हा सोशल मीडियावर चर्चा

जो बायडन, शरद पवार

फोटो स्रोत, @JoeBiden/BBC

जो बायडन यांनी अमेरिकेत भर पावसात निवडणूक सभा घेतली. अशीच सभा शरद पवार यांनी 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी घेतली होती.

जो बायडन यांच्या सभेनंतर या शरद पवारांच्या 'त्या' सभेचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले.

आता जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतरही अनेक जण शरद पवार आणि जो बायडन यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार आणि जो बायडन यांच्या पावसातल्या सभेचा फोटो फेसबुकवर पोस्ट करत म्हटलं आहे, "वय जास्त असलं म्हणून काय झालं, लोकांसाठी काम करण्याची ऊर्जा तरुणांनाही मागे टाकणारी आहे. म्हणूनच ते नेहमी विजयी ठरतात.त्यांचा आपल्या मूल्यांवर ठाम विश्वास असतो व ते त्यासाठी संघर्ष करतात. हे आपण महाराष्ट्रात घडताना पाहिलं आणि आता अमेरिकेतही घडलं."

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जो बायडन यांच्या पावसाळी सभेसंदर्भातलं ट्वीट रिट्वीट करताना म्हटलं, "अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय असून अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल अशी अपेक्षा आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

फेसबुक यूझर निलेश लंके यांनी शरद पवार आणि जो बायडन यांच्या सभेचा फोटो फेसबुकवर पोस्ट करत लिहिलं, "वयाच्या 78 व्या वर्षी जो बायडन व्हाइट हाऊसच्या लढाईत सहभागी झाले आणि ते व्हाइट हाऊसमध्ये जाणार हे आता निश्चित आहे. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असतांना बायडन उपाध्यक्ष होते. बराक तेव्हा 47 वर्षाचे होते आणि बायडन 66 वर्षाचे होते.

बायडन हे ओबामा यांच्यापेक्षा मोठे असले तरी ओबामा यांच्या नंतर 12 वर्षांनी 2020 च्या निवडणुकीत ते राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरले आणि जोमात प्रचार केला फ्लोरिडा मध्ये त्यांनी केलेली पावसातील सभा जगभरात गाजली. शेवटी एकच बायडन यांच्याकडून एकच शिकवण मिळते की, संयम सातत्य ठेवा शरीराला जरी वय असलं तरी इच्छाशक्तीला वय नसतं."

राहुल वर्मा यांनी ट्वीट करत म्हटलं, "निवडणुकांमध्ये पावसात सभा घेणारे सगळेच सत्तेत येत आहेत."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

सत्या ट्वीटर हॅँडलवरून ट्वीट केलंय, "कोणी काहीही म्हणो. पावसातल्या सभा मात्र हमखास विजय मिळवून देतात."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

याच ट्वीटला रिट्वीट करत विजय पुंड यांनी लिहिलंय, "मला पण सरपंच निवडणूक लढायची आहे , मी पण एखादी पावसात सभा घेतो . झालो तर झालो सरपंच."

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

अक्षय सोनवणे यांनी ट्वीट करत म्हटलंय, "पावसात घेतलेली सभा सगळीकडे चमत्कार करतेय. महाराष्ट्रात जसा झाला, तसाच काहीसा सातासमुद्रापार US मध्ये सुद्धा बायडन यांच्या पावसातील सभेने चमत्कार केलाय."

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

दीपक कुलकर्णी यांनी ट्वीट करत लिहिलं, "आमच्या इथल्या काही डोक्यावर पडलेल्या लोकांना वाटत आहे जो बायडन यांनी पावसात सभा घेतली म्हणून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. काय एक एक नग आहेत ,अफाट बुद्धिमतेचे आहेत."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)