अमेरिका म्हणते चीनविरुद्ध आम्ही भारताच्या बाजूने, दोन्ही देशांमध्ये बेका करार

भारत, अमेरिका, करार

फोटो स्रोत, PIB

फोटो कॅप्शन, अमेरिका आणि भारताचे संरक्षण आणि परराष्ट्र मंत्री

भारत आणि अमेरिका यांच्यात मंगळवारी दिल्लीस्थित हैदराबाद हाऊसमध्ये मंत्रिस्तरावरील चर्चेची तिसरी फेरी पार पडली. दोन्ही देशांदरम्यान बेसिक एक्स्चेंज अँड कोऑपरेशन अग्रीमेंट अर्थात बेका करारासह अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

बेकानुसार, दोन्ही देश एकमेकांना अत्याधुनिक लष्करी सामुग्री, अन्य उत्पादनं यांची देवाणघेवाण करतील. बेका करारावर भारताच्या वतीने अतिरिक्त सचिव जिवेश नंदन यांनी स्वाक्षरी केली.

या बैठकीला भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. अमेरिकेकडून परराष्ट्र मंत्री माईक पाँम्पेओ आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर उपस्थित होते.

याव्यतिरिक्त लष्करातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. दोन्ही देशांनी व्यापार, प्रशांत महासागरातील सुरक्षा, लष्करी आणि डावपेचात्मक सहकार्य या मुद्यांवर चर्चा केली.

बैठकीनंतर माईक एस्पर म्हणाले, "दोन्ही देशांमध्ये झालेला करार हा दोन्ही देशांनी जपलेली मूल्यं आणि उद्दिष्टांना अनुसरूनच आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्र सगळ्यांसाठी खुलं असावं यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावून उभे राहू. चीनची वाढती आक्रमकता आणि अन्य देशात वातावरण अस्थिर करण्याचे प्रयत्न लक्षात घेता आम्ही भारताला या मुद्यावर सहकार्य देऊ".

भारत, अमेरिका, करार

फोटो स्रोत, PIB

फोटो कॅप्शन, भारत आणि अमेरिका करार

दोनदिवसीय बैठकीदरम्यान सुरक्षेच्या पातळीवर आपापल्या क्षेत्रात अधिक मजबूत होण्यासाठी, लष्करी उपकरणांचा व्यापार वाढीस लागावा, दोन्ही देशांच्या लष्करादरम्यान सहकार्य वाढावं यावर चर्चा झाल्याचं एस्पर यांनी सांगितलं.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेल्या आरोग्य क्षेत्रातील कराराची घोषणा केली. यावेळी त्यांनी चीनवर टीका केली.

चीन मित्र नाही- माईक पाँम्पेओ

बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केलं. एकमेकांना विविध मुद्यांवर सहकार्य वाढवण्याचा संकल्प केल्याचं सांगण्यात आलं.

माईक पाँम्पेओ म्हणाले, "चीनची कम्युनिस्ट पार्टी, लोकशाही, कायदेशीर नियम, अन्य देशांप्रतीच्या वागणुकीत स्पष्टपणा, नेव्हिगेशन संदर्भात म्हणजेच मुक्त परिवहनासंदर्भात सौजन्याचं धोरण नसणं. खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत".

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

या बैठकीपूर्वी माईक पाँम्पेओ यांनी नॅशनल वॉर मेमोरियलला भेट दिली. तिथल्या भेटीवेळचा फोटो ट्वीट करताना त्यांनी लिहिलं, जगातल्या सगळ्यांत मोठ्या लोकशाही देशाकरता जीव समर्पित करणाऱ्या सैनिकांचं आम्हाला कधीही विस्मरण होणार नाही.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

अमेरिकेच्या मंत्र्यांच्या भाषणात संवेदनशील गलवाना खोऱ्याचाही उल्लेख होता. गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात वीस भारतीय सैनिकांनी जीव गमावला होता. भारतीय मंत्र्यांनी मात्र गलवान खोऱ्याचा उल्लेख करणं टाळलं.

राजनाथ सिंह काय म्हणाले?

बेका करार अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले, "अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर आमची चर्चा झाली. अमेरिकेच्या लष्कराशी आमचं सहकार्य वाढतं आहे याचा आनंद आहे. लष्करी उपकरणांसंदर्भात संयुक्त विकासाकरता आम्ही काही गोष्टी निश्चित केल्या आहेत. इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि सुरक्षितता यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत".

भारत, अमेरिका, करार

फोटो स्रोत, Nurphoto

फोटो कॅप्शन, राजनाथ सिंह

दोन्ही देशांदरम्यान झालेल्या महत्त्वपूर्ण करारांनुसार अमेरिका-भारतीय लायजन अधिकाऱ्यांची नियुक्ती, कॉमसेट अकाऊंट, दोन्ही देशांदरम्यान युद्धअभ्यासाला चालना देणं यांचा समावेश आहे.

दोन्ही देश पुढील महिन्यात मालाबार एक्सरसाईज उपक्रमात सहभागी होतील. इंडो पॅसिफिक क्षेत्रात हा उपक्रम राबवला जातो. यामध्ये क्वाडलॅटरल सिक्युरिटी डायलॉग अंतर्गत भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असेल.

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर म्हणाले, "बैठकीदरम्यान शेजारी देशांमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवरही चर्चा झाली. सीमेपलीकडून दहशतवादी कारवायांना अजिबात थारा देणार नाही."

अफगाणिस्तानसह अन्य देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर करणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले.

संयुक्त वक्तव्यानंतर राजनाथ सिंह यांना अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी करण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राजनाथ सिंह म्हणाले, कोणत्याही देशाने अन्य कोणत्याही देशाकडून शस्त्रास्त्रं विकत घेणं हे दोन्ही देशांदरम्यानच्या चर्चेवर अवलंबून असतं.

बेका काय आहे?

बेसिक एक्स्चेंज अँड कॉर्पोरेशन अग्रीमेंट अर्थात बेका हा अमेरिका आणि भारतदरम्यान होणाऱ्या चार मूलभूत करारांपैकी अंतिम करार आहे. या कराराअंतर्गत दोन्ही देशांदरम्यान लॉजिस्टिक्स आणि सैन्य सहकार्याला चालना मिळेल.

2002 मध्ये पहिला करार झाला होता. त्यानंतर 2016 आणि 2018 मध्ये लॉजिस्टिक्स आणि सुरक्षित दळवळणासंदर्भात करार झाले.

ताज्या करारानुसार भारत आणि अमेरिका यांच्यात भू-स्थानिक सहकार्य असणार आहे. आपापल्या क्षेत्रात सहकार्य करणं, लष्करी पातळीवर एकमेकांना माहिती देणं, लष्करी व्यापार हे मुद्दे सामील आहेत.

भारत, अमेरिका, करार

फोटो स्रोत, @MEAINDIA

फोटो कॅप्शन, पॉम्पेव्ह आणि एस.जयशंकर

या करारावर स्वाक्षरी झाल्याने भारताला अमेरिकेशी संलग्न अशा जियोस्पेशियल-जियोस्पेटिकल डेटा मिळेल. लष्करी कारावाईसाठी हा डेटा उपयुक्त ठरेल. दोन्ही देशांदरम्यान लष्करी सहकार्य वाढणार असल्याने भारताला अमेरिकच्या उपग्रहांद्वारे टिपलेली माहिती उपलब्ध होऊ शकेल. भारतीय उपग्रह प्रणालीला याचा उपयोग होईल.

हजार किलोमीटरपर्यंत लक्ष्याचा अचूक वेध घेणाऱ्या क्षेपणास्त्र ताफ्यात असणाऱ्या मोजक्या देशांच्या श्रेणीत भारताचा समावेश होईल.

याव्यतिरिक्त भारताला अमेरिकेकडून प्रिडेटर-बी सारखं सशस्त्र ड्रोन उपलब्ध होईल. शस्त्रास्त्रांनी युक्त असा हा ड्रोन शत्रूचे तळ हुडकून ते उद्धव्स्त करू शकतो.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)