हाथरस: 'ज्यांना विकास आवडत नाही, ते जातीय दंगली भडकवू इच्छित आहेत' - योगी आदित्यनाथ #5मोठ्याबातम्या

योगी आदित्यनाथ

फोटो स्रोत, MYogiAdityanath/FACEBOOK

फोटो कॅप्शन, योगी आदित्यनाथ

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. 'ज्यांना विकास आवडत नाही, ते जातीय दंगली भडकवू इच्छित आहेत# - योगी आदित्यनाथ

ज्यांना विकास आवडत नाही, ते जातीय दंगली भडकवू इच्छित आहेत, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

हाथरसमधील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणावर ते बोलत होते.

त्यांनी म्हटलं, " ज्यांना विकास आवडत नाही ते लोकं देशात आणि प्रदेशात जातीय दंगली भडकवू इच्छित आहेत. या दंगलीच्या आड विकास थांबेल व त्यांना त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्याची संधी मिळेल. यासाठीच नवनवीन षडयंत्र रचली जात आहेत. मात्र आम्हाला ही सर्व षडयंत्र ओळखून विकासाची प्रक्रिया पुढे न्यायची आहे."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

दरम्यान, हाथरस येथील घटनेमुळे विरोधकांनी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, बसपा नेत्या मायावती यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

तर हाथरसच्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष सोमवारी (5 ऑक्टोबर) राज्यभरात सत्याग्रह करणार आहे, असं महाराष्ट्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

2. 'राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू'

महाराष्ट्रातील शाळा पुन्हा उघडण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर उघडणार आहेत. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात माहिती दिली. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

कोचिंग क्लास

फोटो स्रोत, VikramRaghuvanshi / Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

याविषयी बच्चू कडू म्हणाले, "नववी ते बारावीचे विद्यार्थी वयाने थोडे मोठे असतात, त्यामुळे हे पहिले पाऊल आपण उचलत आहोत. सर्व माहिती घेऊनच आपण शाळा सुरू करू, अधिवेशनात जशा आमदारांच्या तपासण्या केल्या गेल्या, तशा विद्यार्थ्यांच्या करता येतील का, याबाबत चाचपणी सुरू आहे. बाधित शिक्षक शाळेत जाणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. धोरण ठरवून नोव्हेंबरपासून शाळा सुरू करू."

3. आमचे सरकार सत्तेत आल्यावर कृषी कायदे रद्द करू - राहुल गांधी

नवीन कृषी कायद्यांवर निषेध नोंदवणार्‍या शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी पंजाबमध्ये दाखल झाले आहेत.

यावेळी ते म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात या कृषी कायद्यांची अंमलबजावणी करण्याची काय गरज होती? शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला हमी देतो की जेव्हा काँग्रेस सत्तेत येईल तेव्हा आम्ही हे तीन काळे कायदे रद्द करून कचर्‍याच्या डब्यात फेकून देऊ.

टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.

राहुल गांधी

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, राहुल गांधी

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधी पंजाबमध्ये तीन दिवस ट्रॅक्टर रॅली करणार आहेत.

यावेळी ते असंही म्हणाले की, "पंतप्रधानांचं म्हणणे आहे की हे विधेयक शेतकर्‍यांसाठी तयार केले गेले आहे. जर असे असेल तर सभागृहात उघडपणे चर्चा का झाली नाही. जर शेतकरी या कायद्यांमुळे खूश असेल तर तो देशभर का आंदोलन करीत आहे. पंजाबमधील प्रत्येक शेतकरी या विधेयकाला विरोध का करत आहे."

4. 'लोकांमध्ये जाण्याची सवय नसल्यानं राहुल गांधी पडले'

लोकांमध्ये जाण्याची सवय नसल्या कारणानं राहुल गांधी हे धडपडून पडलेत, असं वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे. ते लातूरात बोलत होते.

यावेळी राहुल गांधींविषयी बोलताना त्यांनी म्हटलं, "गर्दीत जाण्याची सवय नसल्या कारणाने गर्दीत कसं चालावं हे त्यांना कळलं नाही. यामुळे राहुल गांधी पडले."

हाथरसमधील कथित बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राहुल गांधी जात असताना त्यांची पोलिसांशी झटापट झाली आणि मग ते खोली पडले होते.

रावसाहेब दानवे

फोटो स्रोत, Raosaheb Patil Danve/FACEBOOK

5. बिहार निवडणुकीपूर्वी एनडीएमध्ये फूट

बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर 'एनडीए'त फूट पडली आहे. रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने नितीश कुमार यांचे नेतृत्व नाकारत या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. NDTV नं ही बातमी दिली आहे.

रविवारी (04 ऑक्टोबर) दिल्लीत पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय लोक जनशक्ती पार्टीकडून घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय पातळीवर लोकसभा निवडणुकीत भाजप व लोक जनशक्ती पार्टीचे भक्कम युती आहे. राजकीय स्तरावर व विधानसभा निवडणुकीत आघाडीतील जनता दल यूनायटेडशी वैचारिक मतभेद असल्यानं बिहारमध्ये लोक जनशक्ती पार्टीनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, लोक जनशक्ती पार्टीकडून सांगण्यात आलं आहे.

याचबरोबर निकालानंतर लोक जनशक्ती पार्टीचे विजयी झालेले आमदार पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या मार्गाबरोबर राहून भाजपा-लोजपा सरकार बनवतील, असं देखील लोक जनशक्ती पार्टीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)