पाकिस्तानात हायवेवर अडकलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कारानंतर तीव्र संताप

पाकिस्तानातील हायवेवर मुलांसह अडकलेल्या महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना नुकतीच घडली होती.
या प्रकरणातील दोन संशयितांची ओळख पटवण्यात आली आहे. या आरोपींची नावे आबिद अली आणि वकार उल हसन अशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी 72 तासांच्या आत संशयितांची ओळख पटवण्यात यश मिळवलं. सदर आरोपींना अटक करण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या खबऱ्याला 25 लाख रुपये बक्षीस स्वरूपात दिले जातील, अशी घोषणा पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बाजदार यांनी केली.
काय आहे प्रकरण?
पोलिसांत दाखल FIR नुसार, पाकिस्तानातील लाहोर-सियालकोट महामार्गावर एक महिला आपल्या लहान मुलांना घेऊन गुजरांवालाच्या दिशेने जात होती.
सोमवारी (7 सप्टेंबर) रात्री उशीरा लाहोर-सियालकोट मोटरवेजवळ एक टोलनाका पार केल्यानंतर काही अंतरावर पेट्रोल संपल्यामुळे महिलेची गाडी बंद पडली.
यानंतर संबंधित महिलेने आपल्या परिचिताला फोन केला. त्यांनी पोलिसांकडे मदत मागण्यास सांगितलं. तसंच तेसुद्धा मदतीच्या शोधात त्या दिशेने निघाले.
दरम्यान, ही महिला गाडीतच बसून मदतीच्या प्रतीक्षेत होती. इतक्यात दोन लुटारू त्याठिकाणी आले. त्यांनी कारची काच तोडून महिलेला बाहेर येण्यास भाग पाडलं.

फोटो स्रोत, Reuters
बंदुकीचा धाक दाखवत महिला आणि मुलांना जवळच्या एका शेतात घेऊन गेले. त्याठिकाणी महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यांचे पैसे, दागिने व इतर साहित्य हिसकावून घेण्यात आलं.
पाकिस्तानात वातावरण ढवळलं
हायवेरील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पाकिस्तानात वातावरण ढवळल्याचं दिसून आलं.
माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी ट्वीट करून यावर प्रतिक्रिया दिली.
हायवे बलात्काराच्या घटनेबाबत कळल्यानंतर प्रचंड दुःख झालं. या क्रूर गुन्ह्यात सहभागी लोकांवर कठोर करावाई केली जावी, अशी मागणी मरियम नवाज यांनी केली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या घटनेनंतर सोशल मीडियावरसुद्धा तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचं दिसून आलं.
12 जण ताब्यात
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी आपली कारवाई सुरू केली. पोलिसांनी 20 पथकं तयार करून वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू केला. जिओ-फेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून संशयितांच्या गावाची ओळख पटवण्यात आली, अशी माहिती पंजाब प्रांताचे पोलीस महासंचालक ईनाम गनी यांनी दिली.
खबऱ्यांच्या नेटवर्कमधून माहिती घेत 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. महिलेवर बलात्कार करणाऱ्या दोघांची ओळख पटवण्यातही पोलिसांना यश आलं आहे.

फोटो स्रोत, TWITTER@SHABAZGILL
आरोपींनी कारची काच तोडताना त्यांच्या रक्ताचे काही थेंब दरवाजावर लागले आहेत. त्याच्याशी संबंधित आरोपींच्या रक्ताचे नमुने जुळवून पाहिले जाणार आहेत. दोन्ही आरोपींच्या अटकेची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
या घटनेबाबत पाकिस्तानात उलटसुलट चर्चा रंगल्या असून पीडित महिला आणि आरोपींच्या नावाने चुकीचे फोटो व्हायरल होत आहे.
हे सगळं थांबवण्यात यावं, कुणीही अफवा पसरवू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








