पुरुषावर सामूहिक बलात्कार आणि अमानुष मारहाणीनंतर नवी मुंबई हादरलं

फोटो स्रोत, Getty Images
एका छत्तीस वर्षीय पुरुषावर सोमवारी रात्री वाशी येथे बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे या पुरुषाला अनेक शस्त्रक्रियांना सामोरं जावं लागल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस पाच संशयितांचा शोध घेत आहेत. "एका निर्मनुष्य ठिकाणाहून या पुरुषाचे अपहरण करून त्याला झुडुपांमागे नेण्यात आले आणि त्याच्यावर अत्याचार करण्यात आला. हा माणूस घरी जाताना वाटेत सिगरेट पिण्यासाठी थांबला होता,''अशी माहिती वाशी पोलीस स्थानकाचे प्रमुख अनिल देशमुख यांनी दिली.
पीडित पुरुषाच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर, मंगळवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले की, "आम्ही 377 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.''
"संशयितांचे वर्णन आम्हाला मिळाले असून आम्ही त्यांचा तपास करत आहोत. तसंच आसपासच्या भागातून सीसीटीव्ही फूटेजही शोधत आहोत. गुन्हेगारांना लवकरच अटक होईल.'' असेही नवी मुंबईच्या पोलिसांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, "गुन्हेगार दारू आणि अंमली पदार्थांच्या नशेत होते आणि ते सगळेच जण 25 ते 30 वयोगटातील असल्याची माहिती पीडित पुरुषाने दिली आहे.''
पीडित पुरुषाला संशयितांनी मारहाण केली. सध्या पीडित पुरुषाची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








