केरळ विमान अपघात : दीपक साठे, ज्यांचा एअर इंडिया कोळीकोड अपघातामध्ये प्रवाशांना वाचवताना जीव गेला

फोटो स्रोत, Nitin Jadhav
केरळच्या कोळीकोडमध्ये झालेल्या विमान अपघातात मुंबईकर दीपक साठे या अनुभवी पायलटचा मृत्यू झाला.
माझ्या मुलानं जगभर विमानं नेली पण कसलीही घमेंड त्याला नव्हती अशा शब्दांमध्ये दीपक साठे यांच्या आई लीलाताई साठे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
"माझ्या मुलाने स्वतःचे प्राण देऊन इतर लोकांचे प्राण वाचवले. तो आणि त्याचा भाऊ दोघेही लष्कर आणि वायूसेनेत कार्यरत होते. दीपक यांना सर्वच ठिकाणी पहिले पदक मिळाले. वायूसेनेची आठही पदकं त्यांना मिळाली. घोडेस्वारीसकट सर्व खेळांमध्ये ते निपुण होते" अशा शब्दांमध्ये दीपक साठे यांच्या आईने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
नागपुरातील भरत नगरात दीपक साठे यांचे आई-वडील राहतात. कॅप्टन दीपक साठे यांच्या आईचा आज वाढदिवस आहे आणि आजच त्यांना आपल्या मुलाच्या अपघाती मृत्युची माहिती कळली.
"माझा मुलगा अतिशय कर्तृत्ववान होता आणि सर्व गोष्टीत तो परिपूर्ण होता, देव चांगल्या लोकांनाच आधी घेऊन जातो"अशी भावना लीलाताई साठे यांनी व्यक्त केली.
दीपक यांचे वडील कर्नल वसंत साठे हे सैन्यात होते तर मोठा भाऊ सुद्धा सैन्यात होता. दीपक साठे यांच्या वृद्ध आईवडिलांना धीर देण्यासाठी त्यांचे चुलत भाऊ सुनील साठे इतर कुटुंबीय आणि नातेवाईकांसह आज दाखल झाले.
दीपक साठे यांचे चुलत भाऊ सुनील साठे यांनी दीपक यांच्या आईवडिलांना आज या घटनेची माहिती दिली.
बीबीसी मराठीशी बोलताना सुनील साठे म्हणाले, "काल रात्री साडेनऊ वाजता आम्हाला टीव्हीवर विमानाला अपघात झाल्याचे कळले. या विमानाचे वैमानिक दीपक साठे होते हेही कळले. नंतर वैमानिक अपघातात ठार झाल्याचे कळल्यावर आम्ही हादरलो. नंतर 12 वाजता बातमी कन्फर्म असल्याचे समजल्यावर आम्हाला धक्का बसला.
काका काकूंना धक्का बसेल म्हणून काल सांगितले नाही. शेवटी एअर इंडियाकडून निरोप आला आणि आम्ही दादा आणि काकू यांना आज सांगितले आज सर्व आलो त्यांना धीर देतोय."
एअर इंडिया एक्स्प्रेसचं हे विमान होतं. या अपघातात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पायलट दीपक साठे यांचा सुद्धा समावेश आहे. अपघातग्रस्त विमानाचं त्यांनी दोन वेळा लँडिंग करण्याचा प्रयत्न केला होता. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी विमान उतरवलं पण त्याला अपघात झाला.
धावपट्टीवर पाणी साचलं होतं, तसंच सतत पाऊस सुरू होता. त्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे.
माजी मंत्री अल्फान्सो के. जे. यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये पायलटचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. त्यांनी याआधी एअर फोर्समध्येसुद्धा काम केलं होतं.
दीपक साठे अनुभवी पायलट होते, त्यांचं वय 58 होतं. त्यांना पेसिंडेंट गोल्ड मेडेलसुद्धा मिळलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
एनडीच्या त्यांच्या बॅचचे ते टॉपर होते. प्रतिष्ठित Sword Of Honor ते विजेते होते. टेस्ट पायलट म्हणून ते ओळखले जात. कुठल्याही प्रकारचं विमान उडवण्यात त्यांचा हातखंडा होता.
"कॅप्टन दीपक साठे भारतीय वायू दलातील एक निपुण पायलट होते. मी त्यांना चांगला ओळखत होतो. कॅप्टन साठे एक निष्णात टेस्ट पायलट होते. प्रोटो टाईप एअरक्राफ्ट उडवण्यासाठी त्यांना ट्रेनिंग मिळालं होतं. भारतीय वायू दलात एक सक्षम पायलट म्हणून त्यांची ओळख होती," असं विपुल सक्सेना यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं आहे. सक्सेना माजी पायलट आणि एव्हिएशन एक्सपर्ट आहेत.
दीपक साठे 1981 मध्ये हवाई दलात वैमानिक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी पुण्यातील एनडीएमधून प्रशिक्षण घेतलं होतं. 2003 पर्यंत त्यांनी लढाई वैमानिक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर निवृत्ती घेऊन ते एअर इंडियात कार्यरत होते. सुरुवातीला त्यांनी एअर इंडियाच्या ताफ्यातील मोठ्या आकाराचे एअरबस 310 हे विमान चालवले. त्यानंतर ते बोईंग विमानावर रुजू झाले होते. साठे हे हवाई दल अकादमीतील प्रशिक्षणात अग्रेसर होते.
DGCA म्हणजेच नागरी उड्डाण संचलनालयाने या घटनेची पूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
केरळमधील कोळीकोड येथे झालेली विमान दुर्घटना दुःखद आहे. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याशी मी संपर्क साधून स्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेले प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.
"कॅप्टन, आम्ही तुमच्याबद्दल कृतज्ञ राहू ! केरळ येथील अपघातात मुख्य वैमानिक कॅप्टन दीपक वसंत साठे मृत्युमुखी पडले. मुसळधार पावसात, वादळाच्या तडाख्यात सापडलेलं विमान ३० फूट उंचीवरून रनवेवर आपटल्यानंतरही कॅप्टन साठे यांनी प्रवाशांना वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मृत्यू समोर दिसत असतानाही त्यांनी आपले कर्तव्य बजावले. कॅप्टन साठे हे विंग कमांडर या हुद्द्यावर भारतीय हवाई दलामध्ये लढाऊ विमानाचे निष्णात पायलट होते. ते प्रतिष्ठीत Sword Of Honor विजेते होते. कॅप्टन तुमच्या कार्याला सलाम. भावपूर्ण श्रद्धांजली!", अशा शब्दात जलसंसाधन मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








