You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
SSC Result : दहावीचा निकाल जाहीर, इथं पाहा निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा राज्याचा निकाल आज (29 जुलै) जाहीर झाला. एकूण निकाल 95.30 टक्के लागला.
बारावीच्या निकालांप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली. मुलींचा दहावीचा निकाल 96.91 टक्के लागला. तर मुलांचा निकाल 93.90 टक्के लागला.
यंदा दहावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून त्यांचा निकाल सर्वाधिक म्हणजे 98.77 टक्के लागला. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी 92 टक्के लागला.
गेले काही दिवस बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरले. CBSE आणि HSC बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची लगबग सुरू झालीय.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर SSC बोर्डाचा निकाल विद्यार्थ्यांसाठी अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. कारण कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून खबरदारी म्हणून दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्यात आला होता. तेव्हा याचे सरासरी गुण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.
याबाबतची अधिकृत माहिती तुम्हाला mahahsscboard.maharashtra.gov.in आणि mahresult.nic.in या वेबसाईट्सवर उपलब्ध होऊ शकेल.
राज्यातीलनिकालीची टक्केवारी
कोकण सर्वाधिक - 98.77 टक्के पुणे, कोल्हापूर - 97.64 टक्के, मुंबई 96.72 टक्के, अमरावती - 95.14 टक्के, लातूर -93.09 टक्के, नागपूर - 93.84 टक्के, नाशिक -92.16 टक्के, औरंगाबाद - 92 टक्के. अशाप्रकारे राज्याचा एकूण निकाल 95.30 टक्के लागला आहे.
- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी, तर 7 लाख 89 हजार 898 विद्यार्थिनी आहेत. यातल्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 15 लाख 1 हजार 105 आहे. 3 मार्च 2020 ते 23 मार्च 2020 दरम्यान ही परीक्षा पार पडली होती.
निकाल कुठे पहायचा?
राज्य सरकारच्या शिक्षण विभाग आणि राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.
खालील लिंकवर तुम्हाला निकाल पाहता येईल.
निकाल कसा पहायचा?
बुधवार (29 जुलै) दुपारी नंतर तुम्हाला ऑनलाईन निकाल पाहता येईल. तुम्हाला या निकालाची प्रत ऑनलाईन उपलब्ध असेल.
वेबसाईटवर गेल्यानंतर SSC Result 2020 यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
पुढील टप्प्यात तुम्हाला तुमचे नाव, रोल नंबर लिहायचे आहे. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला निकाल दिसू शकेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)