You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण
कोरोना व्हायरसच्या तडाख्यातून सामान्यांसह राज्याचे मंत्रीही वाचत नाहीयेत. कापड उद्योग आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. याबद्दल स्वतः शेख यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
अस्लम शेख यांना लागण झाल्यानंतर राज्यातल्या महाविकास आघाडीच्या चौथ्या मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
मात्र, या तिघांनीही मुंबईतल्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. अस्लम शेख मात्र घरीच राहणार असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलेलं नाही.
मुंबईचे पालकमंत्री कोरोना पॉझिटिव्ह
अस्लम शेख यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "मी कोरोना पॉझीटिव्ह झालो आहे. मात्र, सध्या कोरोनाची कोणतीही लक्षणं माझ्यात आढळलेली नाहीत. मी स्वतः विलगीकरणात असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपापली कोरोनाची चाचणी करून घ्यावी. मी राज्यातील लोकांची घरीच राहून सेवा करणार आहे."
मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आहेत. अस्लम शेख यांनी मुंबईतल्या कोरोना बाधित भागांचा पाहणी दौरा यापूर्वी केला होता. त्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा झाली असावी अशी चर्चा आहे. मात्र, याला अस्लम शेख यांनी दुजोरा दिलेला नाही.
मुंबईत रविवारी (19 जुलै) कोरोनाचे 1 हजार 38 रुग्ण आढळले आणि 64 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईची एकूण रुग्णसंख्या 1 लाखांच्यावर पोहोचली असून मृतांचा आकडा 5 हजार 714 झाला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)