नरेंद्र मोदी यूएन भाषणः सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हेच आमचं ध्येय

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हेच आमचं ध्येय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरुन बोलताना स्पष्ट केले.

नरेंद्र मोदी यांनी युएन इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिलच्या अधिवेशनात ऑनलाइन सहभाग घेतला. या बैठकीमध्ये त्यांनी आपले विचार मांडले.

अगदी सुरुवातीपासून भारताने संयुक्त राष्ट्राच्या विकासकामासाठी आणि युएन इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिलमध्ये योगदान दिले आहे. युएन इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिलच्या कामाला दिशा देण्यातही भारताचा मोठा वाटा आहे असे ते या भाषणात म्हणाले.

युएन इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिलचे पहिले प्रमुख भारतीय होते याची आठवणही नरेंद्र मोदी यांनी करुन दिली. या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात सुरू असलेल्य़ा विविध विकासकामांची माहिती दिली. 2022 पर्यंत सर्वांना स्वतःचे घर मिळण्यासाठी 'हाऊसिंग फॉर ऑल' ही मोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)