मध्य प्रदेश : कमलनाथ सरकार पुन्हा संकटात?

कमलनाथ

फोटो स्रोत, Getty Images

मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार धोक्यात असल्याचं चित्र आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार सत्ताधारी काँग्रेसचे 17 आमदार कर्नाटकात दाखल झाले आहेत. हे सर्व आमदार ज्योतिरादित्य शिंदे गटाचे असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये सहा मंत्र्यांचाही समावेश आहे.

पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, काँग्रेसच्या आमदारांना बेंगळुरूतल्या एका रिसॉर्टवर ठेवण्यात आलं आहे. आरोग्य मंत्री तुलसी सिलावत, कामगारमंत्री महेंद्रसिंग सिसोदिया, वाहतूक मंत्री गोविंद सिंह राजपूत, महिला आणि बालकल्याण मंत्री इमरती देवी, अन्न आणि नागरी पुरवठा प्रद्युम्न सिंग तोमर, शालेय शिक्षण मंत्री डॉ. प्रभुरा चौधरी अशी मंत्र्यांची नावं आहेत.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य सिंदिया आणि कमलनाथ यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी कमलनाथ रविवारी रात्री दिल्लीसाठी रवाना झाले होते. मात्र राज्यातल्या घडामोडींनंतर ते मध्य प्रदेशला परतल्याची चर्चा आहे.

सध्या राज्य विधानसभेत एकूण 228 आमदार आहेत. दोन जागा संबंधित आमदारांचं निधन झाल्याने रिक्त आहेत. काँग्रेसकडे 114 आमदार आहेत आणि भाजपकडे 107. उर्वरित 9 आमदारांपैकी बहुजन समाज पक्षाचे 2, समाजवादी पक्षाचा 1 तर 4 अपक्ष आमदार आहेत.

News image

दरम्यान काही दिवसांपूर्वी काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांच्या 8 आमदारांना भाजपने बळजबरीने गुडगावमधल्या एका हॉटेलवर ठेवल्याचं काँग्रेसचं म्हणणं होतं.

या 8 आमदारांमध्ये 4 काँग्रेसचे होते तर सपा आणि बसपा या पक्षाचे प्रत्येक 1-1 आमदार होते तर 2 अपक्ष आमदार होते, ज्यांचा मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस सरकारला पाठिंबा आहे.

मध्य प्रदेशचे अर्थमंत्री तरुण भनोट यांनी टिव्ही चॅनलशी बोलताना दावा केला आहे की त्यांच्या 4 आमदारांपैकी एक आणि माजी मंत्री असलेले बिसाहुलाल सिंह यांनी फोन करून सांगितलं आहे की त्यांना गुडगावमधल्या आयटीसी मराठा हॉटेलमध्ये बळजबरीने ठेवण्यात आलं आहे आणि बाहेर पडू दिलं जात नाहीय.

मध्य प्रदेशच्या काँग्रेस सरकारमधले दोन मंत्री जीतू पटवारी आणि जयवर्धन सिंह हे हॉटेलजवळ आहेत. मात्र, त्यांना आत प्रवेश करू देण्यात आला नाही, असंही भनोट यांचं म्हणणं आहे.

भनोट म्हणाले, "हरियाणात भाजप सरकार आहे आणि त्यांनी हॉटेलमध्ये पोलीस तैनात केले आहेत. इथे भाजपचे माजी मंत्री नरोत्तम मिश्रा आहेत आणि ते आमच्या दोन्ही मंत्र्यांना हॉटेलच्या आत जाऊ देत नाहीय."

दिग्विजय सिंह

फोटो स्रोत, Getty Images

आमदार गुडगावला जाण्यासंबंधी बोलताना मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी आरोप केला होता की भाजप त्यांच्या आमदारांना लाच देऊ इच्छिते.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांनी आपल्या आमदारांना 25 ते 35 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवल्याचा दिग्विजय सिंह यांचा आरोप आहे.

गेल्यावर्षी मध्य प्रदेशचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते गोपाल भार्गव विधानसभेत कमलनाथ सरकारवर हल्लाबोल करत म्हणाले होते की आमच्या पक्षनेतृत्त्वाने एक इशारा करताच मध्य प्रदेशातलं कमलनाथ सरकार 24 तासात कोसळू शकतं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

गेल्या वर्षी 24 जुलै रोजी गोपाल भार्गव विधानसभेत म्हणाले होते, "आमच्या वरच्या नंबर 1 किंवा 2च्या नेत्याने आदेश दिला तर तुमचं सरकार 24 तासदेखील चालणार नाही."

गोपाल भार्गव यांच्या या दाव्यानंतर विधानसभेत क्रिमिनल लॉवर मतदान घेण्यात आलं होतं आणि यात कमलनाथ सरकारच्या बाजूने 122 आमदारांनी मतदान केलं होतं. 231 आमदारांच्या विधानसभेत सत्ताधारी काँग्रेसला बहुमतापेक्षा 7 मतं अधिक मिळाली होती. इतकंच नाही तर भाजपच्याही 2 आमदारांनी काँग्रेसच्या पारड्यात मत टाकलं होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)