डोनाल्ड ट्रंप आणि मीम्सची भिंत; 'ये दीवार टूटती क्यूँ नही'!

डोनाल्ड ट्रंप आणि नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांची पत्नी मेलॅनिया ट्रंप भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सध्या सुरू आहे.

या दोन दिवसात ते दिल्ली आणि अहमदाबादचा दौरा करतील. अहमदाबादमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गावर एक झोपडपट्टी येते. ही झोपडपट्टी लपवण्यासाठी एक भिंत उभारण्यात येणार आहे. मात्र, स्थानिकांकडून याला विरोध होतोय. ही झोपडपट्टी अहमदाबाद एअरपोर्टहून साबरमती आश्रमाच्या मार्गावर आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

या प्रकारामुळे सोशल मीडियावर अनेक मीम्स शेयर केले जात आहेत.

डोनाल्ड ट्रंप आणि नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Yashesh Yadav/Facebook

फोटो कॅप्शन, ये दिवार तूटती क्यूँ नही

एका प्रसिद्ध जाहिरातीत ये दिवार तुटती क्यूँ नही असं वाक्य होतं. एका नेटिझनने त्याची आठवण करून दिली आहे.

डोनाल्ड ट्रंप आणि नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Social media

फोटो कॅप्शन, प्रसिद्ध जाहिरात
यामध्ये एका बाजूला झोपडपट्टी, तर दुसऱ्या बाजूला सुखवस्तू जीवन जगणारी माणसं दाखवण्यात आलीय.

फोटो स्रोत, Social media

फोटो कॅप्शन, यामध्ये एका बाजूला झोपडपट्टी, तर दुसऱ्या बाजूला सुखवस्तू जीवन जगणारी माणसं दाखवण्यात आलीय.
यामध्ये भारतमाता विकासाच्या प्रतीक्षेत आहे, पण त्यामध्ये नरेंद्र मोदी येत आहेत, असं दाखवण्यात आलंय.

फोटो स्रोत, Social media

फोटो कॅप्शन, यामध्ये भारतमाता विकासाच्या प्रतीक्षेत आहे, पण मध्ये नरेंद्र मोदी येत आहेत, असं दाखवण्यात आलंय.
यामध्ये नरेंद्र मोदी देशातील विकास दिसू नये म्हणून भिंत बांधताना दिसत आहेत.

फोटो स्रोत, Satish Acharya/Social Media

फोटो कॅप्शन, यामध्ये नरेंद्र मोदी देशातील विकास दिसू नये म्हणून भिंत बांधताना दिसत आहेत.
'गरिबी हटाओ, वॉल बनाओ,' अशा आशयाचं गुजरात मॉडेल या फोटो दाखवण्यात आलंय.

फोटो स्रोत, Manjul

फोटो कॅप्शन, 'गरिबी हटाओ, वॉल बनाओ,' अशा आशयाचं गुजरात मॉडेल या फोटो दाखवण्यात आलंय.
यामध्ये नरेंद्र मोदींच्या बाहू भिंतीच्या आहेत आणि ते या बाहूंद्वारे डोनाल्ड ट्रंप यांचं स्वागत करत आहेत, असं सूचित करण्यात आलंय.

फोटो स्रोत, Social media

फोटो कॅप्शन, यामध्ये नरेंद्र मोदींच्या बाहू भिंतीच्या आहेत आणि ते या बाहूंद्वारे डोनाल्ड ट्रंप यांचं स्वागत करत आहेत, असं सूचित करण्यात आलंय.
मोदा म्हणतात, इथं स्मार्ट सिटी आहे, तर ट्रंप विचारतात, भिंतीपलीकडे काय आहे?

फोटो स्रोत, Junaid

फोटो कॅप्शन, मोदी म्हणतात, इथं स्मार्ट सिटी आहे, तर ट्रंप विचारतात, भिंतीपलीकडे काय आहे?

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)